मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Diet Drinks Effects : सावधान! डाएट ड्रिंक्स घेत आहात? मग 'हे' वाचाच

Diet Drinks Effects : सावधान! डाएट ड्रिंक्स घेत आहात? मग 'हे' वाचाच

डाएट ड्रिंक्‍सचं सेवन केल्‍यानं तुम्‍हाला कोणतं नुकसान होऊ शकतं.

डाएट ड्रिंक्‍सचं सेवन केल्‍यानं तुम्‍हाला कोणतं नुकसान होऊ शकतं.

डाएट ड्रिंक्‍सचं सेवन केल्‍यानं तुम्‍हाला कोणतं नुकसान होऊ शकतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

आजकाल स्वतःच्या फिटनेसबाबत लोक जागरुक झालेत. फिटनेस राहावा, यासाठी अनेकजण डाएट फुड आणि ड्रिंक्स घेतात. परंतु, तुम्ही कधी विचार केला आहे का की, शून्य कॅलरीयुक्त पेय घेणं आरोग्याला फायद्यापेक्षा जास्त हानी पोहोचवू शकतं. खरं तर, दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता वाटणं साहजिक आहे. कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत बहुतेक लोक स्ट्रेसचे बळी ठरत आहेत. पण हे नेमकं का घडतं? याचा तुम्ही कधी निवांत बसून विचार केलाय. मुळात स्ट्रेस येण्याची अनेक कारणं असू शकतात, परंतु त्याचं मुख्य कारण चुकीचा आहार, तणावपूर्ण किंवा व्यस्त जीवनशैली हेदेखील आहे. जी पुढे जाऊन चिंता आणि डिप्रेशनला कारणीभूत ठरते.

या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराबाबत काळजी घेऊन जीवनशैलीत काही आवश्यक बदल करणं गरजेचं आहे. त्यासाठीच आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, डाएट ड्रिंक्‍सचं सेवन केल्‍यानं तुम्‍हाला कोणतं नुकसान होऊ शकतं.

डाएट आणि झिरो कॅलरी ड्रिंक्सचे दुष्परिणाम:

1. डायबेटिस

हेल्थ डॉट कॉमनुसार, डाएट सोडा प्यायल्याने तुम्हाला डायबेटिस आणि मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याचा 36 टक्के धोका असतो. यामुळे तुम्हाला उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोकाही वाढतो.

2. वजन

डाएट सोडा कॅलरी फ्री आहे, पण तो तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यास सक्षम असेलच असं नाही. हे पेय प्यायल्याने शरीरातील चरबीही वाढते.

3. नैराश्य

जे लोक दिवसातून 3-4 कप सोडा पितात, त्यांना इतर लोकांच्या तुलनेत नैराश्य येण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते, आणि त्यांना विविध आजार होण्याचा धोकाही असतो.

4. ब्लड शुगर लेव्हल

केवळ गोड पदार्थच नाही, तर गोड पेयांचं सेवन केल्याने रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार होतात. त्यामुळे तणावाची पातळी वाढते. कमी फायबरयुक्त आहारामुळे अपचन होण्याची आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.

ऑफिसचे काम, घरातील काम, दिवसभर होणाऱ्या धावपळीमुळे बहुतांश जणांना आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही. प्रत्येकाला फिट राहायचं आहे, पण त्यासाठी योग्य नियोजन करणं, कष्ट करणं याचं प्रमाण खूपच कमी आहे. अशावेळी अनेकदा योग्य नियोजन न करता अनेकजण डाएट फुड आणि ड्रिंक्स घेतली जातात. पण यामुळे स्ट्रेस, वजन वाढणं यासह अन्य गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच काळजी घेणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं ठरतं.

First published:

Tags: Lokmat news