मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोलेस्ट्रॉल वाढणे हा आजार जन्मजात देखील असू शकतो, या लक्षणांवरून वेळीच ओळखा

कोलेस्ट्रॉल वाढणे हा आजार जन्मजात देखील असू शकतो, या लक्षणांवरून वेळीच ओळखा

Familial hypercholesterolemia: पालकांच्या जनुकांमधून मुलांमध्ये प्रसारित केले गेले तर मुलांमध्ये कोलेस्ट्रॉल अगदी सुरुवातीपासूनच वाढू लागते. या आजाराला फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया म्हणतात.

Familial hypercholesterolemia: पालकांच्या जनुकांमधून मुलांमध्ये प्रसारित केले गेले तर मुलांमध्ये कोलेस्ट्रॉल अगदी सुरुवातीपासूनच वाढू लागते. या आजाराला फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया म्हणतात.

Familial hypercholesterolemia: पालकांच्या जनुकांमधून मुलांमध्ये प्रसारित केले गेले तर मुलांमध्ये कोलेस्ट्रॉल अगदी सुरुवातीपासूनच वाढू लागते. या आजाराला फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया म्हणतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : शरीरात कोलेस्ट्रॉल असणे अत्यंत आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल पेशींच्या निर्मितीसह शरीरातील अनेक प्रक्रियांमध्ये भाग घेत असतं. कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात हार्मोन्स तयार होतात. पण, त्याचे जास्त प्रमाण शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. वास्तविक, रक्तवाहिन्यांमध्ये चिकट पदार्थाच्या रूपात कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हृदयावर दाब वाढतो आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार होतात. सामान्यतः कोलेस्ट्रॉल वाढण्यास आपण खात असलेले अन्न जबाबदार असल्याचे मानले जाते, परंतु काहीवेळा ते जन्मजात (अनुवांशिक) कारण देखील असू शकते. जर ते पालकांच्या जनुकांमधून मुलांमध्ये प्रसारित केले गेले तर मुलांमध्ये कोलेस्ट्रॉल अगदी सुरुवातीपासूनच वाढू लागते. या आजाराला फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया म्हणतात. हायपरकोलेस्टेरोलेमिया असलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

हायपरकोलेस्टेरोलेमियामुळे

मेयो क्लिनिकच्या मते, कौटुंबिक हायपरकोलेस्टेरोलेमिया हे जनुकांमधील उत्परिवर्तनामुळे होते जे आई किंवा वडील किंवा दोन्ही पालकांच्या जनुकांमधून मुलामध्ये जातात. या स्थितीत, रोग जन्माच्या वेळी होतो. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊन हृदयविकार होऊ शकतो.

हे वाचा - कधी करू शकतो गर्भपात; अबॉर्शनसाठी कोणती पद्धत असते सुरक्षित?

हायपरकोलेस्टेरोलेमियाची लक्षणे -

हायपरकोलेस्टेरोलेमियामुळे लहान वयातच रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे धमन्या पातळ आणि कडक होतात. अतिरिक्त कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे काहीवेळा ते त्वचेवर आणि डोळ्यांखाली जमा होऊ लागते. याशिवाय हात आणि पायांच्या शिरा जाड आणि कडक होऊ लागतात. तेथे कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागते. जेव्हा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप वाढते तेव्हा डोळ्यातील बाहुलीभोवती एक पांढरी किंवा तपकिरी रिंग तयार होते, जी सामान्यतः वृद्ध लोकांमध्ये दिसून येते. यामुळे कॉर्नियाचे गंभीर आजार होऊ शकतात.

हे वाचा - हेअर ट्रान्सप्लांटमुळे तरुणाचा मृत्यू ; दिल्लीत घडली विचित्र घटना

उपचार काय -

कौटुंबिक हायपरकोलेस्टेरोलेमियाची लक्षणे वयाच्या 20 वर्षांपूर्वी दिसून येतात. जर पालकांना हा आजार असेल तर मुलांना 10-12 वर्षे वयापासून डॉक्टरांना दाखवावे. डॉक्टर स्टॅटिन, इझेटिमिब सारख्या औषधांनी उपचार करतात. याशिवाय या आजाराने त्रस्त व्यक्तीने वजन नियंत्रित ठेवावे लागेल. या रोगासाठी वनस्पती-आधारित अन्न, फळे आणि हिरव्या पालेभाज्या फायदेशीर आहेत. सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटपासून लांब राहिल्यास या आजाराच्या तीव्रतेपासून वाचू शकता.

First published:

Tags: Health, Health Tips