बीजिंग, 06 डिसेंबर : कोरोनाची महासाथ येऊन दोन वर्षे उलटली. कोरोनाचा सर्वात आधी उद्रेक चीनमध्ये झाला तरी तो नेमका कुठून आला हे अद्यापही समजू शकलेलं नाही. याबाबत बऱ्याच शक्यता वर्तवल्या जात आहे. काहींच्या मते कोरोनाचा मुख्य स्रोत वटवाघूळ आहे, तर काहींच्या मते हा लॅबमध्ये तयार केलेला मानवनिर्मित व्हायरस आहे. चीनने कोरोनाबाबत आपल्यावरील या आरोपांचं खंडनही केलं आहे. दरम्यान महासाथीच्या दोन वर्षांनंतर आता एका शास्त्रज्ञाने याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
वुहान लॅबमध्ये काम करणाऱ्या अमेरिकेच्या एका शास्त्रज्ञाने कोरोनाबाबत मोठी माहिती दिली आहे. अँड्र्यू हफ असं या शास्त्रज्ञाचं नाव. डॉ. हफ 2014 ते 2016 सालापर्यंत इकोहेल्थ अलायन्समध्ये काम करत होते. 2015 साली ते कंपनीचे उपाध्यक्षही राहिले होते. अमेरिकेन सरकारसाठी ते शास्त्रज्ञ म्हणून या रिसर्च प्रोग्रामवर सिक्रेट पद्धतीने काम करत होते. त्यांनी चीनच्या वुहान लॅबमध्येही काम केलं आहे.
हे वाचा - महाराष्ट्रातील स्त्रियांच्या आरोग्याची स्थिती चिंताजनक; 100 पैकी दोन महिलांना आहे अॅनिमिया
इकोहेल्थ एलायन्स, नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ हेल्थकडून मिळालेल्या फंडिंगमार्फत 10 वर्षांपेक्षा अधिक कालावधी वटवाघळात असलेल्या विविध कोरोनाव्हायरसचा अभ्यास करत होते. त्याचवेळी त्यांचा वुहान लॅबशी संबंध आला. द ट्रुथ अबाऊट वुहानमध्ये त्यांनी कोरोनाबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
द सनच्या रिपोर्टनुसार अँड्र्यू हफ यांनी सांगितलं की, कोव्हिड 19 एक मानवनिर्मित व्हायरस आहे. जो वुहान लॅबमधून लीक झाला होता. हा खतरनाक व्हायरस वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोललॉजीमधून लीक करण्यात आला होता. कोरोना महासाथ खतरनाक जेनेटिक इंजिनीअरिंगचा परिणाम होता. कोरोनाव्हायरस जेनेटिकली इंजिनीअर्ड व्हायरस आहे आणि तो इथूनच बाहेर पडला की चीनला पहिल्या दिवसापासून माहिती होते.
हे वाचा - किडनी ट्रान्सप्लांट कसं होतं? एका Kidney वर सामान्य आयुष्य जगता येतं?
या लॅबला अमेरिकेकडूनही खूप निधी मिळत होता. इकोहेल्थ अलायन्स आणि विदेशी प्रयोगशाळेजवळ पुरेशी जैव सुरक्षा, बायो सिक्युरिटी आणि रिस्क मॅनेजमेंटसाठी पुरेसे नियंत्रणाचे उपाय नव्हते. त्यामुळेच वुहान लॅबमधून हा व्हायरल लिक झाला. याशिवाय हा व्हायरस लीक होण्यात अमेरिकन सरकारही दोषी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Health, Lifestyle