मराठी बातम्या /बातम्या /heatlh /खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारी ही Chef स्वतः मात्र पदार्थ साधा चाखूही शकत नाही कारण...

खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारी ही Chef स्वतः मात्र पदार्थ साधा चाखूही शकत नाही कारण...

ही शेफ चमचमीत पदार्थ बनवते आणि आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करते. पण त्यापैकी एकाही पदार्थाची तिने चव चाखली नाही.

ही शेफ चमचमीत पदार्थ बनवते आणि आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करते. पण त्यापैकी एकाही पदार्थाची तिने चव चाखली नाही.

ही शेफ चमचमीत पदार्थ बनवते आणि आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करते. पण त्यापैकी एकाही पदार्थाची तिने चव चाखली नाही.

ब्रिटन, 01 जून:  गृहिणी असो किंवा शेफ त्यांनी एखादा पदार्थ बनवला की त्याची चव ही चाखलीच जाते. पण एक शेफ अशी आहे, जी लोकांना चमचमीत पदार्थ बनवून खायला घालते, त्यांच्या जिभेचे चोचले पुरवते पण स्वतः मात्र पदार्थ साधा चाखूही शकत नाही. गेले काही वर्षे तिने ठोस पदार्थ खाल्लेलाच नाही.

ब्रिटनची शेफ लोरेटा हार्मेस (Loretta Harmes) चमचमीत पदार्थ बनवते आणि आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करते. पण ती या पदार्थांची चव चाखू शकत नाही. सहा वर्षांपूर्वी भुने आलू खाल्ले होते. हा तिने खाल्लेला शेवटचा पदार्थ. त्यानंतर तिनं असं काही खाल्लंच नाही.

लोरेटाला एहलर्स-डानलोस सिंड्रोम (Ehlers-Danlos Syndrome - hEDS) आहे. हा एक आनुवंशिक आजार आहे. हा आजार 13 विकारांचा समूह आहे. जो संयोजी उतींना प्रभावित करतो. कित्येक वर्षे चुकीचं निदान झालं. 23 वर्षीय हार्मेसला खूप वर्षांनी या आजाराचं निदान झालं. तोपर्यंत या आजाराने तिच्या पोटाला आंशिक रुपाने पॅरालाइज्ड केलं होतं.  हार्मेसच्या आतड्यांच्या संयोजी उतींना नुकसान पोहोचलं होतं.

हे वाचा - कुरकुरीत कीडे, चॉकलेटमधील टोळ...; Insect food ला अन्न सुरक्षा संस्थेचीही मंजुरी

बीबीसीशी बोलताना लोरेटाने सांगितलं, खाल्ल्यानंतर तिच्या पोटात वेदना व्हायच्या. 2015 साली तर तरल पदार्थांवरच जिवंत होती. तेव्हा एका आतड्यांच्या डॉक्टरने तिला ठोस आहार घेण्यास सांगितलं. तिने काही वर्षांपूर्वी खाल्लेला भुना आलू तिने खाल्लेला शेवटचा पदार्थ होता. जेव्हा तिला पहिल्यांदाच या आजाराचं निदान झालं.

वयाच्या पंधराव्या वर्षात तिनं एनोरेक्सियाशी लढा दिला. पण हा आजार एक वर्षांपेक्षाही कमी काळ होता. संपूर्ण किशोरवयात तिला पचनसंबंधी समस्या होती. पण तरी ती खायची. तिला पुन्हा एनोरेक्सिया झाला. तिचं वजन खूप कमी झालं. जवळपास 25 किलोग्रॅमपेक्षाही कमी झालं.

हे वाचा - प्रेग्नंट व्हायचंय, लैंगिक संबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती?

आज तिला टीपीएन लावण्यात आलं आहे. 18 तास तिला यावरच राहवं लागतं. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ती म्हणते हा तरल पदार्थ माझ्या पचनप्रणालीत चांगल्या प्रकारे मिसळतो आणि रक्तप्रवाहात जातो.  मी खाण्यास सक्षम नाही, यामुळे मला त्रास नाही. पण इतक्या वर्षांपासूनच्या वेदनेपासून मी मुक्त झाली हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे, असं ती सांगते.

First published:

Tags: Health, Lifestyle, Serious diseases