मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

जोडीदार तुमची फसवणूक करत असेल तर या 4 प्रश्नांची थेट उत्तरे कधीच नाही देणार

जोडीदार तुमची फसवणूक करत असेल तर या 4 प्रश्नांची थेट उत्तरे कधीच नाही देणार

जोडीदारासोबत सर्व प्रकारच्या गोष्टी उघडपणे शेअर करत असाल तर तुमच्या दोघांमध्ये विश्वास आणि भावनिक बंध कायम राहतात. दुसरीकडे, तुमच्या दोघांमधील खुले संभाषण हे देखील दर्शवते की तुमचा एकमेकांवर किती विश्वास आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : नवरा-बायकोच्या चांगल्या नातेसंबंधासाठी दोघांमधील सर्व गोष्टी मनमोकळ्या असाव्यात, त्यात लपवा-छपवी असू नये. जोडीदाराला अंधारात ठेवणं, तिच्या/त्याच्यापासून काही लपवणं हे योग्य नाही. बेस्टलाइफमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात, नातेसंबंध तज्ज्ञ कॅलिस्टो अॅडम्स म्हणतात की जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सर्व प्रकारच्या गोष्टी उघडपणे शेअर करत असाल तर तुमच्या दोघांमध्ये विश्वास आणि भावनिक बंध कायम राहतात. दुसरीकडे, तुमच्या दोघांमधील खुले संभाषण हे देखील दर्शवते की तुमचा एकमेकांवर किती विश्वास आहे. जेव्हा जोडीदार फसवणूक करत असेल तेव्हा त्याला अशा खुल्या संभाषणात अडचण येऊ शकते. येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की फसवणूक करणारा जोडीदार कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळतो.

फसवणूक करणारा जोडीदार असे प्रश्न टाळतो -

मी तुझा फोन वापरू शकतो का?

सर्टिफाइड रिलेशनशिप थेरपिस्ट रबी स्लोमो स्लॅटकिन म्हणतात की, जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून काही लपवत असेल किंवा तुमच्यासोबत फसवणूक करत असेल तर तो त्याचा फोन तुम्हाला वापरू द्यायला नकार देईल. मी तुझा फोन वापरू का, असे विचारल्यास तो हजारो बहाणे मारून तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकतो.

इतका वेळ बाहेर का होतास?

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला असा थेट प्रश्न विचारला आणि जोडीदाराने लगेच एका वाक्यात उत्तर दिलं नाही तर कदाचित काहीतरी घोळ आहे. खोटं उत्तर देताना माणसाच्या वागण्यातला फरक दिसून येतो.

सुट्टीत इतका रस का?

विवाह आणि कौटुंबिक थेरपिस्ट कॅरोलिन मदन सांगतात की, जर तुमचा जोडीदार अचानक तुमच्या सुट्टीबद्दल जरा जास्तच रस दाखवू लागला किंवा तुम्ही कुठे जात आहात, कधी येणार आहात, कसे जाणार वगैरे विचारले किंवा तुमचा सगळा प्लॅन कसा असेल, असे प्रश्न विचारत असेल. तर तो तुमच्या सुट्टीत इतका रस का घेत आहे? हे एकदा विचारा. जर उत्तर देताना तो बचावात्मक वागला आणि प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळत असेल तर कदाचित तो फसवणूक करत असेल. तुम्ही नसताना दुसरा काहीतरी प्लॅन बनवण्याचा विचार असू शकतो.

हे वाचा - रोमान्समध्ये ब्रेक; शारीरिक संबंध थांबवल्यावर नेमकं काय होतं?

तू माझ्यासोबत चिटिंग करत आहेस का?

जर त्याने/तिने थंडपणे या प्रश्नाचे उत्तर दिले तर समजा सर्व काही ठीक आहे. परंतु, अचानक हा प्रश्न केल्यावर जर जोडीदार घाबरला किंवा अचानक बहाणे करू लागला तर काहीतरी घोटाळा आहे हे कळू शकतं.

First published:

Tags: Relationship, Relationship tips