मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Cancer Symptoms: तुमचा आवाज तर बदलला नाहीये ना? या लक्षणांकडे चुकुनही करू नका दुर्लक्ष, असू शकतो कॅन्सर

Cancer Symptoms: तुमचा आवाज तर बदलला नाहीये ना? या लक्षणांकडे चुकुनही करू नका दुर्लक्ष, असू शकतो कॅन्सर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Health News Marathi: या आजाराची सुरुवातीच्या टप्प्यातली लक्षणं ओळखता आली, तर तो धोकादायक स्थितीत पोहोचण्यापूर्वीच रोखता येऊ शकतो.

मुंबई, 26 फेब्रुवारी : कॅन्सर (Cancer) अर्थात कर्करोग हा जीवघेणा आजार मानला जातो. कॅन्सर नेमका कशामुळे होतो आणि त्यावरचे ठोस उपाय कोणते, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, या आजारावर सुरुवातीच्या टप्प्यात उपचार (Treatment) घेतल्यास रुग्णाचं आयुष्य वाढू शकतं. निदान आणि औषधोपचाराला उशीर झाल्यास कॅन्सर बळावण्याची शक्यता अधिक असते. प्रत्येक आजाराची जशी ठरावीक लक्षणं असतात, तशी कॅन्सरचीही असतात. कोणतंही लक्षण दीर्घ काळ जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे.

कॅन्सर या आजारात शरीरातल्या कोणत्याही भागाच्या पेशी (Cells) अनियंत्रितपणे विभाजित होऊ लागतात. त्यानंतर तो शरीराच्या अन्य भागात पसरू लागतो. या आजाराची सुरुवातीच्या टप्प्यातली लक्षणं ओळखता आली, तर तो धोकादायक स्थितीत पोहोचण्यापूर्वीच रोखता येऊ शकतो. दीर्घकाळ कोणताही शारीरिक त्रास जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता, तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कॅन्सर पहिल्या टप्प्यात असताना त्याचं निदान झालं, तर त्यावर उपचार करणं तुलनेनं सोपं जातं. दुसऱ्या टप्प्यात निदान झालं तर उपचार करणं काहीसं मुश्किल होतं आणि कॅन्सर तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असेल, तर कोणतेही उपचार फारसे लागू पडत नाहीत. याविषयीची माहिती `झी न्यूज हिंदी`ने दिली आहे.

कॅन्सरच्या प्राथमिक लक्षणांविषयी बोलायचं झालं, तर एखाद्या व्यक्तीला मूत्रविसर्जनावेळी (Urine) वेदना न जाणवता रक्त येत असेल, विनाकारण अ‍ॅनिमिया होत असेल किंवा हिमोग्लोबीन वाढत असेल, स्नायूंच्या आकारात बदल होत असेल तर ही कॅन्सरची लक्षणं असू शकतात. जास्त प्रमाणात जुलाब (Loose Motion) होणं आणि स्टूलमधून रक्तस्राव होणं, हेदेखील कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

वाचा : घासून घासून महिलेने दातांची अक्षरशः लावली वाट; पाहून डेंटिस्टही झाले शॉक

शरीरातल्या कोणत्याही भागात गाठ (Tumor) आल्यास आणि तिचा आकार सातत्याने वाढत असेल तर तो कॅन्सरचा संकेत असतो. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं ती गाठ काढून टाकणं किंवा औषधोपचारांच्या साह्यानं ती समूळ नष्ट करणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती तंबाखू सेवन करत असेल आणि ते करताना काही त्रास जाणवत असेल, तसंच वारंवार डोकेदुखीची समस्या निर्माण होत असेल तर हे लक्षणदेखील कॅन्सरचं असू शकतं.

एखाद्या व्यक्तीला वारंवार पोटदुखीचा (Abdominal pain) त्रास होत असेल, वजन कमी होत असेल आणि त्यात काविळीची (Jaundice) लक्षणं जाणवत असतील, तर तातडीने तपासणी करून घेणं आवश्यक आहे. कारण अशी लक्षणं कॅन्सरची असण्याची शक्यता असते. दीर्घ काळ खोकला येत असेल, म्युकसमधून रक्त पडत असेल, विनाकारण वजन कमी होऊन आवाजावरही परिणाम झाल्याचं जाणवत असेल, तर ही लक्षणं फुफ्फुसाच्या कॅन्सरची (Lung Cancer) असू शकतात. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तपासण्या तातडीने कराव्यात.

वाचा : रात्र-रात्रभर झोप येत नाही? ही ट्रिक वापरून 60 सेंकदात व्हाल गुडूप,एकदा करून बघा

शरीरावर अधिक प्रमाणात चामखीळ असतात. याला moles असंही म्हणतात. एखाद्या चामखिळामध्ये अनपेक्षित बदल दिसत असेल किंवा नव्याने चामखीळ येताना काही त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. काही वेळा चामखिळाचं रूपांतर गाठीमध्ये होणं किंवा रक्तस्राव होणं अशी लक्षणंही दिसतात. ही सर्व लक्षणं कॅन्सरची असू शकतात. या बदलांचं वेळीच निदान करून घेणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Cancer, Disease symptoms, Health, Health Tips