मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

आता आकडेवारी आली समोर; कोरोना लॉकडाउनमध्ये कॅन्सरग्रस्तांची अशी झाली होती फरफट

आता आकडेवारी आली समोर; कोरोना लॉकडाउनमध्ये कॅन्सरग्रस्तांची अशी झाली होती फरफट

या काळात साथीच्या प्रसार रोखण्यासाठी सर्व देशांनी वेळोवेळी लॉकडाऊनही केलं. पण इतर आजार असलेल्या रुग्णांना लॉकडाऊनमुळं बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं.

या काळात साथीच्या प्रसार रोखण्यासाठी सर्व देशांनी वेळोवेळी लॉकडाऊनही केलं. पण इतर आजार असलेल्या रुग्णांना लॉकडाऊनमुळं बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं.

या काळात साथीच्या प्रसार रोखण्यासाठी सर्व देशांनी वेळोवेळी लॉकडाऊनही केलं. पण इतर आजार असलेल्या रुग्णांना लॉकडाऊनमुळं बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : 2019 च्या अखेरीपासून जगात कहर माजवलेल्या कोरोना महामारीतून लोक अजूनही सावरलेले नाहीत. भारतासह अनेक देश अजूनही यासाठी संघर्ष करत आहेत. या काळात साथीच्या प्रसार रोखण्यासाठी सर्व देशांनी वेळोवेळी लॉकडाऊनही केलं. पण इतर आजार असलेल्या रुग्णांना लॉकडाऊनमुळं बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं. आता एका ताज्या अभ्यासामध्ये असं आढळून आलंय की, कोरोना लॉकडाऊनदरम्यान जगभरातील 7 पैकी 1 कर्करोगाच्या रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही.

यूकेमधील बर्मिंघम विद्यापीठातील (Birmingham University) संशोधकांनी केलेल्या अभ्यासात, जगभरातील सुमारे 5,000 सर्जन आणि भूलतज्ज्ञांनी (Surgeon and Anesthetist) 61 देशांतील 466 रुग्णालयांमधील 20,000 रुग्णांमध्ये सर्वात सामान्यपणे आढळणारे कर्करोगाचे 15 महत्त्वाचे प्रकार (Most common solid cancer types) तपासले.

या अभ्यासाचे निष्कर्ष द लॅन्सेट ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित झालेत. त्यात असं म्हटलंय की, लॉकडाऊनमुळं कर्करोगाच्या पूर्वनियोजित शस्त्रक्रियांवरही परिणाम झाला. मग भलेही त्या वेळी स्थानिक कोविड प्रकरणांची संख्या काहीही असो. अभ्यासात असं आढळलंय की कमी उत्पन्न असलेल्या देशांतील रुग्णांवर बहुधा शस्त्रक्रिया न झाल्या असण्याची शक्यता आहे.

हे वाचा - कोकणात हप्तेबाजी सुरू, हप्ते घेणाऱ्यांच्या नावाचा उद्या भांडाफोड करणार : नारायण राणे पुन्हा आक्रमक

कडक लॉकडाऊन लागला असताना सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ शस्त्रक्रियेची वाट पाहणाऱ्या अनेक रुग्णांना त्यांच्या पूर्वनियोजित शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. दुसरीकडे, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, कर्करोगाच्या पुढे गेलेल्या अवस्थेतील (अ‌ॅडव्हान्स्ड स्टेज) अनेक रुग्णांना तातडीनं गरज असतानाही शस्त्रक्रिया करता आल्या नाहीत.

शस्त्रक्रिया वेळेवर झाली असती तर ...

अभ्यासात सहभागी असलेल्या संशोधकांनी म्हटलंय की, सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. परंतु, त्याचा इतर रुग्णांवरही परिणाम झाला. लॉकडाऊनमुळं कर्करोगाच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यास विलंब झाला आणि परिणामी कर्करोग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूंचं प्रमाण वाढलं. वेळेवर शस्त्रक्रिया केली असती तर असे अनेक मृत्यू टाळता आले असते, असं संशोधकांना आढळलंय.

हे वाचा - ‘चला, तुम्हाला काम देतो’ डोंगरावर नेत महिलेसोबत भयावह कृत्य; पुण्यातील धक्कादायक घटना

भविष्यासाठी मिळाला धडा

संशोधकांनी कोलोरेक्टल, अन्ननलिका, जठरासंबंधी, डोके आणि मान, स्तन, यकृत, स्वादुपिंड, प्रोस्टेट, मूत्राशय, मूत्रपिंड, स्त्रीरोगविषयक सॉफ्ट-टिश्यू सारकोमा, बोनी सार्कोमा आणि इंट्राक्रॅनियल मॅलिग्नॅन्सीसह कर्करोगाच्या प्रौढ रुग्णांच्या डेटाचं विश्लेषण केलं. यावरून लॉकडाऊनचे काही दुष्परिणाम पाहता भविष्यासाठी महत्त्वाचे धडे मिळाले आहेत, असं संशोधकांचं म्हणणं आहे. या प्रकरणांमध्ये रुग्णांना पुरेसे उपचार मिळत राहिले. या अभ्यासातून समोर आलेल्या बाबी सरकारला भविष्यात अशा कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेण्यास मदत करतील.

First published:

Tags: Cancer, Lockdown