नवी दिल्ली, 31 मार्च : ब्लॅक कॉफीचे पिण्याचे (black coffee benefits for health) आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कॉफीचा फक्त वास देखील आपला मूड ठीक करू शकतो. कॉफी प्यायल्यानं तणाव आणि कंटाळा देखील नाहीसा होतो. अंगातील सुस्ती घालवण्यासाठी लोक कॉफीचा उपयोग करतात. पण, कदाचित अनेकांना माहीत नसेल की, कॉफी पिण्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. वजन कमी करणे असो किंवा स्मरणशक्ती वाढवणे असो, त्यावर ब्लॅक कॉफी (black coffee) प्रभावी मानली गेली आहे.
बहुतेक लोकांना कॉफी पिणे आवडते. कॉफी विविध प्रकारे तयार केली जाते आणि लोक या पेयाचा आनंद घेतात. कॉफीमध्ये साखर आणि दूध मिसळले नाही तर ती आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.
ब्लॅक कॉफीमध्ये आढळणारे घटक
मॅंगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 3, रिबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी 2) ब्लॅक कॉफीमध्ये आढळतात. या व्यतिरिक्त, ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण आढळते, जे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
ब्लॅक कॉफी पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे का?
आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक कॉफी प्यायल्याने मेंदूचे कार्य सुधारते, याचा अर्थ असा की यामुळे मेंदूला कार्य करण्यास मदत होऊ शकते. कॉफीचे सेवन वजन कमी करण्यासही मदत करते.
हे वाचा - शाळेत मुलांचा Confidence कमी पडण्यात पालकांच्या या चुका ठरतात कारण, वेळीच बदला
ब्लॅक कॉफीचे तीन उत्तम फायदे
1. ब्लॅक कॉफी यकृत निरोगी बनवते
आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी म्हणतात की, रोज ब्लॅक कॉफी प्यायल्याने यकृत निरोगी राहते. जे लोक दररोज 2 ते 3 कप ब्लॅक कॉफी पितात. त्यांच्यामध्ये यकृताशी संबंधित समस्यांचा धोका 80 टक्क्यांनी कमी होतो.
2. ब्लॅक कॉफी मेमरी वाढवते
कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे मेंदू उत्तेजित होतो. कॅफीन मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरच्या कार्यावर परिणाम करते. न्यूरॉन्स जलद कार्य करून मूड चेंज करतात. कॉफी पिण्याने मूड चांगला तर होतोचे शिवाय ऊर्जा मिळते आणि स्मरणशक्ती वाढवते.
हे वाचा - पुरुषांनो तुमच्यासाठी धोक्याची आहे रात्र; संशोधनातून धक्कादायक बाब समोर
3. वजन कमी करण्यास मदत होते
ब्लॅक कॉफीचे सेवन केल्याने वजन कमी करता येते. त्यात कॅफीन नावाचा घटक असतो, जो चयापचय सुधारू शकतो. म्हणजेच अन्नातून ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया सुधारते. एका संशोधनानुसार, चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारी उत्तेजक द्रव्ये ऊर्जा संतुलित करू शकता आणि थर्मोजेनेसिस प्रभाव निर्माण करून लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coffee, Health Tips