Home /News /heatlh /

केसांच्या अनेक समस्यांवर कारलं आहे गुणकारी; कोंडा घालवण्यासाठी ठरेल उपयोगी

केसांच्या अनेक समस्यांवर कारलं आहे गुणकारी; कोंडा घालवण्यासाठी ठरेल उपयोगी

कारल्याचा रस तुमच्या केसांना अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतो. कारल्यात जीवनसत्त्वे बी 1, बी 2, बी 3 आणि सी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट, फॉस्फरस, जस्त आणि मॅंगनीज सारखी पोषक घटक आहेत, जे केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतात.

पुढे वाचा ...
    Bitter Gourd For Hair Care : आयुर्वेदात कारल्याचा उत्तम औषध म्हणून वापर केला गेला आहे. आरोग्यासाठी ही अतिशय फायदेशीर भाजी आहे. पण कारल्याच्या कडू चवीमुळं त्याची भाजी अनेकांना खाईला आवडत नाही. जर तुम्हालाही कारले खाणे सोयीचे वाटत नसेल, तर तुम्ही ते केसांच्या काळजीसाठी नक्कीच वापरू शकता. हे केसांसाठी जेवढे फायदेशीर आहे तेवढेच आरोग्यासाठीही आहेच. कारल्याचा रस तुमच्या केसांना अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतो. कारल्यात जीवनसत्त्वे बी 1, बी 2, बी 3 आणि सी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट, फॉस्फरस, जस्त आणि मॅंगनीज सारखी पोषक घटक आहेत, जे केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतात. कारल्यांचा केसांच्या आरोग्यासाठीचा फायदा जाणून घेऊया. 1. केस होतील चमकदार जर तुमचे केस निस्तेज वाटत असतील तर तुम्ही त्यांना चमकदार बनवण्यासाठी कारल्याचा रस वापरू शकता. कारल्याचा रस कापसाच्या मदतीनं केसांच्या मुळांमध्ये लावा आणि कोरडे झाल्यानंतर ते धुऊन टाका. यामुळं तुमच्या केसांमध्ये चमक दिसू लागेल. 2. केस गळती थांबेल जर तुमचे केस पावसाळ्यात खूप गळत असतील तर कारल्याच्या रसामध्ये साखर मिसळा आणि केसांच्या मुळांवर लावा. असे केल्याने केस गळणे कमी होईल. आपण हे आठवड्यातून तीन दिवस करू शकता. 3. केसांचा चिकटपणा घालवा पावसाळ्यात केसांमध्ये जास्त चिकटपणा निर्माण होतो, ज्यामुळे ते खूप चिकट होतात. जर तुम्हाला ही समस्या टाळायची असेल तर दोन चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर एक कप कारल्याच्या रसामध्ये मिसळा आणि आठवड्यातून दोनदा वापरा. यामुळे तुम्हाला अतिरिक्त केसांच्या चिकटपणापासून आराम मिळू शकतो. 4. कोंडाही होईल कमी कारल्याचा तुकडा घ्या आणि केस आणि मुळांवर घासून लावा. आपण त्याचा रस देखील यासाठी वापरू शकता. यामुळं कोंडा बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे तुम्हाला दिसेल. हे वाचा - प्रेमविवाहानंतर पतीच जीवावर उठला; अमानुष कृत्यानं 8 वर्षांच्या संसाराचा झाला हृदयद्रावक शेवट 5. पांढऱ्या केसांसाठीही उपयोगी जर तुम्ही ताज्या कारल्याचा रस काढून केसांवर लावला तर तुमचे केस पांढरे होणार नाहीत. तुमचे केस पांढरे होत असतील तर तुम्ही आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता. (सूचना : या लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची कोणतीही हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Woman hair

    पुढील बातम्या