मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Shocking! आधी डोळ्यांची दृष्टी गेली नंतर जीव; अज्ञात आजाराचे 48 तासांत 5 बळी

Shocking! आधी डोळ्यांची दृष्टी गेली नंतर जीव; अज्ञात आजाराचे 48 तासांत 5 बळी

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

एक विचित्र अज्ञात आजार पसरत असल्याने नागरिक दहशतीत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India

पाटणा, 27 ऑक्टोबर : कोरोनाचं भय अद्याप संपलं नाही. कमी झालेली कोरोनाची प्रकरणं आता पुन्हा वाढू लागली आहेत. त्यात आता आणखी एका अज्ञात आजारामुळे नागरिक दहशतीत आहेत. लोक अचानक आजारी पडत आहेत. सुरुवातीला त्यांना डोळ्यांनी दिसणं बंद होतं आणि नंतर त्यांचा जीव जातो. या आजाराने 48 तासांत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील हे विचित्र प्रकरण आहे. खडारी गावात अज्ञात आजार पसरला आहे. ज्यात काही जणांनी आपला जीव गमावला तर आणखी काही लोक आजारी आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आजाराने ग्रस्त लोकांचं शरीर नशेत आखडावं तसं आखडलं जातं. त्यांच्या शरीरातून संवेदना होतात.

हे वाचा - घरात राहिलेल्या कोरोना रुग्णासोबत धक्कादायक कृत्य; VIDEO पाहूनच होईल संताप

लाइव्ह हिंदुस्तानच्या वृत्तानुसार दिवाळीदिवशी एका 35 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर 30 ते 40 वयोगटातील 3आणि 22 वर्षांच्या तरुणाचा जीव गेला.

First published:

Tags: Bihar, Health, Lifestyle