मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

केस राहतील मजबूत आणि काळेभोर; संपूर्ण पोषण आणि वाढीसाठी भृंगराज असे वापरा

केस राहतील मजबूत आणि काळेभोर; संपूर्ण पोषण आणि वाढीसाठी भृंगराज असे वापरा

भृंगराजच्या पानांपासून बनवलेल्या हेअर मास्क आणि तेलाचा योग्य वापर करून आपण केसांशी संबंधित अनेक समस्यांवर मात करू शकतो. जाणून घेऊया हेअर केअरमध्ये भृंगराजचा वापर आणि त्याचे काही फायदे.

भृंगराजच्या पानांपासून बनवलेल्या हेअर मास्क आणि तेलाचा योग्य वापर करून आपण केसांशी संबंधित अनेक समस्यांवर मात करू शकतो. जाणून घेऊया हेअर केअरमध्ये भृंगराजचा वापर आणि त्याचे काही फायदे.

भृंगराजच्या पानांपासून बनवलेल्या हेअर मास्क आणि तेलाचा योग्य वापर करून आपण केसांशी संबंधित अनेक समस्यांवर मात करू शकतो. जाणून घेऊया हेअर केअरमध्ये भृंगराजचा वापर आणि त्याचे काही फायदे.

    मुंबई, 08 ऑगस्ट : सुंदर आणि मजबूत केसांसाठी बहुतेक लोक केसांची विशेष काळजी घेण्याकडे लक्ष देतात. काही लोक केसांवर महागडे हेअर प्रोडक्ट वापरतात. तर केसांना निरोगी ठेवण्यासाठी अनेकांचा घरगुती उपायांवर विश्वास असतो. मात्र, औषधी घटकांनी समृद्ध असलेले भृंगराज (Bhringraj) केसांसाठीही अत्यंत फायदेशीर ठरू शकते. केसांची निगा राखण्यासाठी भृंगराज वापरून आपण केस मजबूत आणि सुंदर बनवू (Hair care tips) शकता. भारतीय आयुर्वेदात भृंगराज हा औषधी गुणधर्मांचा खजिना मानला जातो. दुसरीकडे, भृंगराजच्या पानांपासून बनवलेल्या हेअर मास्क आणि तेलाचा योग्य वापर करून आपण केसांशी संबंधित अनेक समस्यांवर मात करू शकतो. जाणून घेऊया हेअर केअरमध्ये भृंगराजचा वापर आणि त्याचे काही फायदे. अशा प्रकारे केसांवर भृंगराज लावा - भृंगराज हेअर मास्क - भृंगराज हेअर मास्क बनवण्यासाठी प्रथम भृंगराजची पाने बारीक करून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये खोबरेल तेल मिसळा आणि केसांना चांगले लावा. अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने आणि सौम्य शॅम्पूने केस धुवा. तसेच, शॅम्पूनंतर कंडिशनर लावायला विसरू नका. चांगल्या परिणामांसाठी भृंगराज हेअर मास्क आठवड्यातून 1-2 वेळा लावा. भृंगराज तेल - केसांना भृंगराज तेल लावण्यासाठी गरम पाण्यात टाकून टॉवेल पिळून घ्या. आता हा टॉवेल 5-7 मिनिटे डोक्यावर ठेवा आणि नंतर टॉवेल काढून हलक्या हातांनी भृंगराज तेल लावून केसांना मसाज करा. त्यानंतर 2 तासांनी केसांना शॅम्पू करा. केसांच्या वाढीसाठी उपयुक्त - भृंगराजचे हेअर मास्क आणि तेल डोक्याच्या स्कीनचे रक्ताभिसरण सुधारण्याचे काम करते. त्यामुळे केसांची वाढ सुधारते. यासोबतच केस काळे, लांब आणि दाट होऊ लागतात. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर टक्कल नाही पडणार - केसांची निगा राखण्यासाठी नियमितपणे भृंगराज तेलाने मसाज करून टक्कल पडण्यापासून वाचू शकता. विशेषत: झोपण्यापूर्वी टाळूला भृंगराज तेल लावल्याने टाळूतील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते. त्यामुळे केसही वाढू लागतात. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा केस गळती थांबेल - भृंगराजचा वापर केसगळती कमी करण्यासाठी आणि केस मुळापासून मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी आठवड्यातून दोनदा झोपण्यापूर्वी केसांना भृंगराज तेल लावावे आणि सकाळी उठल्यानंतर केस धुवावेत. यामुळे आपली केस गळती कमी होईल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Woman hair

    पुढील बातम्या