मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

मधासोबत मुलतानी मातीचा असा करा वापर, त्वचेवर आश्चर्यकारक फायदे दिसून येतील

मधासोबत मुलतानी मातीचा असा करा वापर, त्वचेवर आश्चर्यकारक फायदे दिसून येतील

मध हा अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल घटकांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. तर मुलतानी माती मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे.

मध हा अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल घटकांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. तर मुलतानी माती मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे.

मध हा अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल घटकांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. तर मुलतानी माती मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : त्वचेला नैसर्गिकरित्या चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी सामान्यतः लोक अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर करतात. मुलतानी माती आणि मध हे देखील त्यापैकीच एक. अर्थात, मुलतानी माती आणि मधाचा वापर त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. परंतु, तुम्ही कधी मधासोबत मुलतानी माती वापरली आहे का? नसेल तर मधात मुलतानी माती मिसळून त्वचेवर लावण्याचे फायदे (Multani Mitti with Honey Benefits) जाणून घ्या.

मध हा अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल घटकांचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. तर मुलतानी माती मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे. त्यामुळे मुलतानी माती आणि मधाच्या मदतीने आपण त्वचेच्या अनेक समस्यांवर मात करू शकता. मुलतानी माती मधासोबत लावण्याचे काही फायदे खाली दिले आहेत.

त्वचा थंड राहते -

मुलतानी मातीमध्ये मध मिसळल्याने त्वचेच्या जळजळीपासून आराम मिळतो तसेच त्वचा थंड राहते. विशेषतः उन्हात बाहेर जाण्यापूर्वी मध आणि मुलतानी मातीचा फेस पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावल्याने तुमच्या त्वचेला उष्णतेच्या दुष्परिणामांपासून वाचवता येते. त्वचेवर लालसरपणा येण्याचा धोकाही कमी होतो.

त्वचा चमकेल -

मुलतानी मातीचा वापर त्वचेचा रंग सुधारण्याचे काम करतो. दुसरीकडे, मुलतानी मातीमध्ये मध घालून आपण टॅनिंग आणि सनबर्नपासून देखील आराम मिळवू शकता. तसेच त्वचा अधिक गोरी होऊ शकते.

पुरळ जातील -

कधीकधी त्वचेवर मुरुम आणि पुरळांची समस्या वाढते. अशा परिस्थितीत मध आणि मुलतानी मातीचा फेस पॅक खूप प्रभावी ठरू शकतो. अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्माने समृद्ध मध पिंपल्स-मुरुमे दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. दुसरीकडे, मुलतानी माती चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

हे वाचा - झोपेच्या गोळ्यांची सवय हानिकारक; शरीरावर असा होतो गंभीर परिणाम

मुलायम त्वचेचे रहस्य -

मधामध्ये असलेले मॉइश्चरायझिंग एजंट त्वचेचा कोरडेपणा दूर करून ओलावा टिकवून ठेवण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत मुलतानी माती आणि मधाचा पॅक नियमितपणे लावल्याने त्वचेची आर्द्रता कायम राहते. त्यामुळे तुमची त्वचा कोमल आणि मुलायम राहते.

हे वाचा - Daily Horoscope: नव्या कामाची सुरुवात करण्याचा आजचा दिवस; 'या' राशींना होणार लाभ

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

First published:

Tags: Skin, Skin care