Home /News /heatlh /

रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी बेलपत्र उपयुक्त, जाणून घ्या फायदे

रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी बेलपत्र उपयुक्त, जाणून घ्या फायदे

भगवान शंकराला आवडणारे बेलपत्र (Aegle Marmelos) औषधी गुणांनीही युक्त आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत बेलाचा वापर पूर्वापार औषध म्हणून केला जात आहे. तापावर बेलपत्र गुणकारी ठरते, तसंच ते मधुमेहावरही अत्यंत फायदेशीर आहे.

मुंबई, 9 मार्च : भगवान शंकराला आवडणारे बेलपत्र (Aegle Marmelos) औषधी गुणांनीही युक्त आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत बेलाचा वापर पूर्वापार औषध म्हणून केला जात आहे. तीन पानं एकत्र असणारे बेलपान ब्रम्हा, विष्णू आणि शंकर यांचं प्रतीक मानलं जातं, तर काही कथांमध्ये भगवान शंकरांचे त्रिनेत्र म्हणून बेलपान ओळखले जाते. भगवान शंकराला आवर्जून बेलपत्र वाहिली जातात. या धार्मिक प्रथांमागे काही शास्त्रीय कारणं असलेली आढळतात. बेल शंकराला प्रिय म्हणून लोकप्रिय करण्यामागेही एक कारण आहे, ते म्हणजे बेल अतिशय औषधी आहे. तापावर बेलपत्र गुणकारी ठरते, तसंच ते मधुमेहावरही अत्यंत फायदेशीर आहे. वेबएमडीनं (WEBMD) दिलेल्या माहितीनुसार, बेलपानाचं शास्त्रीय नाव एजेल मार्मलोस (Aegle Marmelos) आहे. बेलपानात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पौष्टिक तत्व असतात. प्रथिनं आणि खनिजांचा साठा यात असतो. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, रायबोफ्लोबीन, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी1, बी6, बी 12 यात मोठ्या प्रमाणात असतात. आयुर्वेदानुसार, मानवी शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. यापैकी कोणत्याही एका दोषाचं शरीरातलं प्रमाण असंतुलित झालं की काही विकार निर्माण होतात. या दोषांचे नियंत्रण करण्यासाठी बेलपान अत्यंत प्रभावी ठरते. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रोल नियंत्रित करते : मधुमेह (Diabetes), रक्तदाब (blood pressure), कोलेस्ट्रोल (Cholesterol) आणि हृदयाशी संबधित आजार दूर करण्यात बेलपान अत्यंत फायदेशीर ठरते. पचन संस्था चांगली ठेवते : पोट साफ करण्यासाठी बेल अत्यंत गुणकारी आहे. यामधील लक्सेटीव्ह गुणधर्म असल्यामुळे पचन संस्था अत्यंत व्यवस्थित राहते. चेहरा आणि केसाचे आरोग्य चांगले राहते : बेलपानात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंटस असतात. याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तुकतुकीत होते. चेहऱ्यावर डाग असतील, घामामुळे दुर्गंध येत असेल तर बेलपानाचा फेसपॅक या सर्व समस्या दूर करण्यास मदत करतो. बेलपानाचा ज्यूस प्यायल्यास किंवा याची पाने खाल्ल्यास केस गळण्याची समस्याही दूर होते. केस चमकदार आणि दाट होतात. बेलफळाचे सरबत : उन्हाळ्यात बेलाच्या फळाचे सरबत प्यायल्यास शरीराचे तापमान अगदी नियंत्रित राहते. याला समर कुलर ड्रिंकही म्हणतात. बेलफळातील गर काढून त्यात दोन ग्लास पाणी घालावे, एक लिंबू, चार-पाच पुदिन्याची पानं आणि चवीनुसार साखर घालून सरबत बनवावे. उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास उष्णतेनं होणाऱ्या आजारांपासून सुटका होईल.
First published:

Tags: Diabetes, Health, Health Tips, Tips for diabetes, Wellness

पुढील बातम्या