Home /News /heatlh /

तुमचाही विश्वास बसणार नाही, या कंपनीने हवेपासून तयार केलं Vegan Meat

तुमचाही विश्वास बसणार नाही, या कंपनीने हवेपासून तयार केलं Vegan Meat

विज्ञानाच्या सहाय्याने काहीही अशक्य नाही, असं म्हटलं जातं. कारण विज्ञानातील प्रगतीमुळे निरनिराळे प्रयोग यशस्वी होत आहेत. अनेक नव्या गोष्टींची निर्मिती करणं शक्य होतं आहे. त्यापैकी एक म्हणजे वेगन मीटची (Vegan Meat) निर्मिती.

मुंबई, 25 मे : विज्ञानाच्या सहाय्याने काहीही अशक्य नाही, असं म्हटलं जातं. कारण विज्ञानातील प्रगतीमुळे निरनिराळे प्रयोग यशस्वी होत आहेत. अनेक नव्या गोष्टींची निर्मिती करणं शक्य होतं आहे. त्यापैकी एक म्हणजे वेगन मीटची (Vegan Meat) निर्मिती. वेगन मीट अर्थात केवळ वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर करून तयार केलेले खाण्यायोग्य मांस. इनहॅबिटॅट.कॉमनं त्यांच्या वृत्तात तशी माहिती दिली आहे. प्राणीज मांसाला पर्यायी कृत्रिम मांस तयार करण्यासाठीची एअर प्रोटिन ही एक अनोखी प्रक्रिया आहे. त्याद्वारे हवेतील घटकांचं प्रोटिनमध्ये रूपांतर केलं जातं शिवाय यातून मिथेन वायू उत्सर्जन होत नाही. एअर प्रोटिन मांसामुळे वृक्षतोड न करता (Deforestation), फॅक्टरी फार्मिंग आणि कार्बन उत्सर्जनाचे दुप्परिणाम न होता एक उत्तम पर्याय उपलब्ध होतो. चव, आणि पोषणमूल्यांशी तडजोड न करता तसंच पर्यावरणाला कोणताही धोका न पोहोचवता मिळणारा पर्याय म्हणजे एअर प्रोटिन (Air Protein) आहे, असं एअर प्रोटिन (Air Protein) कंपनीनं त्यांच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. अशा प्रकारच्या प्रयोगाची सुरूवात 1970 मधील अंतराळ कार्यक्रमावेळी (Space Program) झाली. अंतराळवीरांना खूप काळ अंतराळात राहावं लागतं. त्यांच्यासाठी हवेतील घटकांचं प्रोटिनमध्ये म्हणजेच प्रथिनांमध्ये कसं रुपांतर करता येईल, याबाबत शास्त्रज्ञांनी अभ्यास करायला सुरुवात केली. त्या संशोधनाचा प्राथमिक आधार घेऊन डॉ. लिसा डायसन आणि डॉ. जॉन रीड यांनी एअर प्रोटिनच्या टीमसोबत एअर प्रोटिन तयार करण्याची सर्वोत्तम पद्धत विकसित केली. हवेतील घटकांचा पदार्थांवरील परिणाम ही प्रक्रिया नवी नाही. योगर्टची निर्मिती (Yogurt), यीस्टचा वापर करून ब्रेडची निर्मिती, बिअरमधील किण्वन प्रक्रिया यातही हवेतील बॅक्टेरियांचा वापर करून नवीन पदार्थ तयार होतो. याचाच वेगळ्या पद्धतीनं वापर करून वेगन मीट अर्थात मांसही तयार करता येऊ शकतं, असं त्यांचं संशोधन सांगतं. एअर प्रोटिनच्या शास्रज्ञांनी (Scientists) विकसित केलेल्या पद्धतीने प्रत्यक्षात प्राणीज मांस तयार करण्यापेक्षा खूपच कमी वेळात एअर प्रोटिन हे कृत्रिम मांस तयार करता येतं. असं मांस तयार करणं, हे अन्नसुरक्षेच्या प्रश्नाचं उत्तर आणि जे मांसाहार कमी करू किंवा सोडू इच्छितात अशा व्यक्तींसाठी पर्यायी अन्न ठरू शकतं. हवेत असलेल्या कार्बनडाय ऑक्साईडचाच वापर करून एअर प्रोटिन पद्धतीमध्ये मांस तयार होतं त्यामुळे कार्बन उत्सर्जन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाला त्याचा तोटा नाही. ‘रेसिपी फॉर चेंज’ या (Recipe for Change) अभियानाला हवा, पाणी आणि अक्षय ऊर्जास्त्रोतांच्या माध्यमातून वास्तवात आणलं जातं असा एअर प्रोटिन कंपनीचा दावा आहे. यात काही तासांतच हवेतील घटकांपासून प्रथिनं तयार होतात. त्यावेळी ते प्रोटिन हवेतून गोळा केलं जातं, शुद्ध करून पिठाच्या स्वरूपात रुपांतरित करून वाळवलं जातं. हे पीठ नंतर कृत्रिम मांसाचे विविध प्रकार आणि फ्लेवर्स (Flavours) तयार करण्यासाठी वापरलं जातं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे काय एअर प्रोटिन तयार करताना किंवा तयार कृत्रिम मांसात कुठल्याही प्राणीजन्य पदार्थांचा, सोया, हॉर्मोन्स, कीटकनाशकं, तणनाशकं किंवा जीएमओचा वापर केलेला नसतो. ‘तयार झालेलं कृत्रिम मांस हे चविष्ट, अधिक पोषक आणि जीवाची हत्या केल्याची अपराधी भावनाविरहित असावं, यासाठी आम्ही मांस तयार करण्याची प्रक्रिया विचारपूर्वक पुन्हा डिझाईन (Redesign) केली आहे. आता पृथ्वीवरील (Earth) सर्वांत पर्यावरणपूरक मांस एअर प्रोटिन कंपनी तयार करत आहे आणि हेच कृत्रिम मांसाचं भविष्यातील स्वरूप आहे,’ असा दावा एअर प्रोटिन कंपनीने केला आहे.
First published:

पुढील बातम्या