मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

केसांच्या दुर्गंधीचा कंटाळ आलाय? हे 2 होममेड स्प्रे ठरतील तुमच्यासाठी उपयोगी

केसांच्या दुर्गंधीचा कंटाळ आलाय? हे 2 होममेड स्प्रे ठरतील तुमच्यासाठी उपयोगी

अनेकदा घामामुळे केसांना वास येऊ लागतो आणि प्रत्येकजण तुमच्यापासून दूर जाऊ लागतो त्यावेळी आपली चांगलीच अडचण होते. केस तेलकट होणाऱ्या लोकांना सहसा ही समस्या जाणवते.

अनेकदा घामामुळे केसांना वास येऊ लागतो आणि प्रत्येकजण तुमच्यापासून दूर जाऊ लागतो त्यावेळी आपली चांगलीच अडचण होते. केस तेलकट होणाऱ्या लोकांना सहसा ही समस्या जाणवते.

अनेकदा घामामुळे केसांना वास येऊ लागतो आणि प्रत्येकजण तुमच्यापासून दूर जाऊ लागतो त्यावेळी आपली चांगलीच अडचण होते. केस तेलकट होणाऱ्या लोकांना सहसा ही समस्या जाणवते.

  • Published by:  News18 Desk

Homemade Spray To Get Rid Of Smelly Hair : पावसाळ्यात केसातून घाम येणे, केस गळणे, कोंडा होणे इत्यादी सामान्य समस्या आहेत. पण, अनेकदा घामामुळे केसांना वास येऊ लागतो आणि प्रत्येकजण तुमच्यापासून दूर जाऊ लागतो त्यावेळी आपली चांगलीच अडचण होते. केस तेलकट होणाऱ्या लोकांना सहसा ही समस्या जाणवते. अशा केसांमध्ये घामाचा वास अगदी सामान्य आहे. व्यग्र जीवनशैलीमुळे केस वारंवार धुणे सोपे नसते. अशा परिस्थितीत जर तुम्ही केसांचा हा वास काढून टाकण्यासाठी हेअर स्प्रे वापरत असाल तर ते तुमच्या केसांना खूप नुकसानकारक ठरू शकते. यासाठी आपण घरच्या घरी हेअर स्प्रे बनवू शकतो, ज्यामुळे केसांना कोणताही धोका होणार नाही आणि दुर्गंधीही कमी होईल.

1. गुलाब पाणी स्प्रे

गुलाब पाणी केसांसाठी खूप उपयुक्त आहे. ते टाळूसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते आणि कोरडेपणा देखील दूर करते. टाळूवर येणारा जास्त तेलकटपणा निघून जावू शकतो आणि केसांमधून येणारी दुर्गंधी देखील कमी करते.

हे असे बनवायचे

यासाठी आपल्याला 1 कप गुलाब पाणी आणि 3 चमचे लिंबाचा रस लागेल. तुम्ही हे दोन्ही एका स्प्रे बाटलीमध्ये भरा आणि जेव्हा तुम्हाला हवे असेल तेव्हा तुमच्या केसांवर होममेड हेअर स्प्रे वापरा. हे लक्षात ठेवा की, जर तुम्ही केसांमध्ये कोणतेही रासायनिक उपचार केले असतील तर त्यात लिंबू घालू नका.

2. कॉफी रोझमेरी हेअर स्प्रे

टाळूच्या त्वचेसाठी कॉफी खूप फायदेशीर आहे. हे टाळूमधून बाहेर पडणारे तेल नियंत्रित करते आणि घामाचा वास देखील निघून जातो. कॉफी केसांच्या मुळांना उत्तेजित करते, ज्यामुळे केसांची चांगली वाढ होते. रोझमेरी अत्यावश्यक तेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमचे केस घनदाट आणि मजबूत बनवण्याचे काम करतात.

असे बनवा

हे करण्यासाठी 1 कप कॉफीचे पाणी आणि रोझमेरी तेलाची आवश्यकता असेल. सर्वप्रथम कॉफी पावडर एक ग्लास पाण्यात उकळा. 2 मिनिटांनी गॅस बंद करा आणि थंड होईपर्यंत थांबा. आता त्यात रोझमेरी तेलाचे 4 ते 5 थेंब घाला. आता ते एका स्प्रे बाटलीमध्ये ठेवा आणि गरज असेल तेव्हा वापरा. जर तुम्ही तुमच्या केसांमध्ये कोणतेही रासायनिक उपचार केले असतील तर हे स्प्रे वापरू नका.

हे वाचा - ओ गुरू..नवज्योतसिंह सिद्धूंनी केला कॅप्टनचा पत्ता कट; Amrinder Singh यांनी दिला CM पदाचा राजीनामा

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)

First published:

Tags: Woman hair, Women hairstyles