Home /News /heatlh /

डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं नाहीशी करायची आहेत का? यावर बदाम तेल आहे गुणकारी

डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं नाहीशी करायची आहेत का? यावर बदाम तेल आहे गुणकारी

बदामाच्या तेलात भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते इथल्या त्वचेला बरे करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, यात दाह-विरोधी गुणधर्म आहेत. याच्यामुळं डोळ्यांखालील सूज कमी होऊ शकते.

    Virgin Almond Oil For Dark Circles :  शरीर थकल्यानंतर किंवा तणाव, अ‌ॅलर्जी, आजार, चांगल्या झोपेची कमतरता यासारख्या समस्यांचा सामना करावा लागल्यानंतर डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसू लागतात. काही वेळा ही काळी वर्तुळं येतात आणि नैसर्गिकरित्या सहज निघूनही जातात. मात्र, काही वेळा ती घालवण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतरही ती जात नाहीत. या समस्येवर बदाम तेल उपयुक्त आहे. पाहुया, याचा वापर कसा करावा.. बदामाचे फायदे खरं तर, बदामाच्या तेलात भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते इथल्या त्वचेला बरे करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, यात दाह-विरोधी गुणधर्म आहेत. याच्यामुळं डोळ्यांखालील सूज कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त, यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन केदेखील आहेत.याच्यामुळं या ठिकाणची नाजूक त्वचा बरी होण्यास मदत करते. असा करा बदाम तेलाचा वापर नेहमी व्हर्जिन बदाम तेल घ्यावे. रात्री चेहरा चांगला स्वच्छ धुवून यानं डोळ्याखालील भागात हलक्या हातानं मालिश करावे. रात्रभर तसंच राहू देऊन आणि सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवावा. आपण याचाही करू शकता वापर 1. गुलाब पाणी गुलाब पाण्यात कापूस भिजवून डोळ्यांखाली लावा. जेव्हा ते सुकते, तेव्हा इथल्या त्वचेवर बदामाच्या तेलाचे काही थेंब लावून काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर राहू द्या. 2. एवोकॅडोसह वापर एक पिकलेला एवोकॅडो मॅश करा आणि त्यात बदामाचे तेल 6 ते 8 थेंब घाला. डोळ्यांभोवती काळजीपूर्वक लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 15-20 मिनिटे तसंच राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. 3. मधासह वापर मध आणि बदामाचे तेल समान प्रमाणात घ्या आणि मिश्रण डोळ्यांभोवती लावा. हलक्या हातानं 2-3 मिनिटं मालिश करा. रात्रभर तसंच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी साध्या पाण्याने धुवा. 4. लिंबाच्या रसासह वापर एक चमचा बदाम तेलात ताज्या लिंबाचा रस काही थेंब मिसळा. हे मिश्रण डोळ्यांखाली लावा आणि दोन मिनिटे हलक्या हाताने मालिश करा. रात्रभर असेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ पाण्याने धुवा. (अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. हिंदी न्यूज 18 त्याची पुष्टी करत नाही. हे लागू करण्यापूर्वी, कृपया संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या