तोंडाची दुर्गंधी हे आरोग्याच्या असंतुलनाचं लक्षण; अशी काळजी घ्या आणि रहा फ्रेश

तोंडाची दुर्गंधी हे आरोग्याच्या असंतुलनाचं लक्षण; अशी काळजी घ्या आणि रहा फ्रेश

आपण जे अन्न खातो ते आपल्या तोंडात चावले जाते आणि त्याचे तुकडे होतात. ते तुमच्या रक्तप्रवाहात शोषले जाते आणि फुफ्फुसांपर्यंत जाते. त्यामुळं श्वासोच्छवासादरम्यान फुफ्फुसांबाहेर निघणाऱ्या हवेवर त्याचा परिणाम होतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : तोंडाच्या दुर्गंधीला (bad breath under your mouth) वैद्यकीय भाषेत हॅलिटोसिस असेही म्हणतात. याला तोंडाची स्वच्छता नसणे किंवा तोंड, दात, हिरड्या, घसा किंवा पाचक प्रणालीमध्ये आरोग्य समस्या असणे अशी कारणं असू शकतात. आपण जे अन्न खातो ते आपल्या तोंडात चावले जाते आणि त्याचे तुकडे होतात. ते तुमच्या रक्तप्रवाहात शोषले जाते आणि फुफ्फुसांपर्यंत जाते. त्यामुळं  श्वासोच्छवासादरम्यान फुफ्फुसांबाहेर निघणाऱ्या हवेवर त्याचा परिणाम होतो.

आपण तीव्र वास असलेले पदार्थ (लसूण किंवा कांदे) खाल्ले तर त्याचा वास वास बराच वेळपर्यंत तोंडाला येत राहतो. दात घासणे आणि फ्लॉसिंग किंवा अगदी माऊथवॉशचा वापर केला तरी अशी पदार्थांचा वास केवळ तात्पुरता लपवला जाऊ शकतो. मात्र, जोपर्यंत हे पदार्थ तुमच्या शरीरातून बाहेर जात नाहीत, तोपर्यंत त्यांचा वास पूर्णपणे जाणार नाही. याशिवाय, इतर काही सामान्य पदार्थ आहेत, ज्यांच्यामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. त्यात चीज, पास्टरमी, काही मसाले, संत्र्याचा रस किंवा सोडा, अल्कोहोल यांचा समावेश आहे

तोंडाच्या दुर्गंधीची इतरही अनेक कारणं असू शकतात:

  1. तोंड कोरडं पडणे: कोरडं तोंड हे दुर्गंधीचं एक प्रमुख कारण आहे. तोंडातील बॅक्टेरिया बाहेर काढण्यासाठी आणि श्वासोच्छवास ताजातवाना राखण्यासाठी तोंडातील लाळ अत्यंत महत्त्वाची असते.
  2. पाचन समस्या: अ‌ॅसिड रिफ्लक्स, पचनक्रिया बिघडणे, आतड्यांसंबंधी विकार आणि बद्धकोष्ठता यासारख्या अनेक पाचन समस्यांमुळे सल्फर वायू तोंडात जमा होतो. याच्यामुळं दुर्गंधी येऊ शकते.
  3. धूम्रपान: सिगारेटमध्ये अगोदरच अनेक विषारी द्रव्यं आणि रसायनं असतात. याच्यामुळं तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते. या पदार्थांचा दुर्गंध आणि बिघडलेल्या तोंडाच्या आणि पचनक्रियेच्या आरोग्यामुळं श्वासातून दुर्गंधी येऊ लागते.
  4. तोंडाच्या स्वच्छतेचा अभाव : जेव्हा तोंडात मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया जमा होऊ लागतात, तेव्हा श्वासाला दुर्गंधी येऊ लागते. कारण हे जीवाणू सल्फर संयुगं सोडतात. यांचा सडलेल्या अंड्यांसारखा वास असतो. त्यामुळे तोंडाला खराब वास येऊ लागतो.
  5. कॉफी किंवा अल्कोहोल पिणे: या दोन्ही पेयांना एक प्रकारची बराच काळ टिकून राहणारी चव असते. आपण ही पेये प्यायल्यापासून कित्येक तास ती तोंडात राहते. कॉफी आणि अल्कोहोल ही दोन्ही पेये लाळेचं उत्पादन कमी करतात. याचा अर्थ असा की, आपले तोंड लाळेमुळं नैसर्गिकरीत्या साफ होत असतं, ते होऊ शकत नाही. यामुळं खराब गंध निर्माण करणारे बॅक्टेरिया जितक्या वेळा पाहिजे तितके धुतले जात नाहीत. यामुळं दुर्गंधी येते.

आपले तोंड ही शरीराची एक खिडकी आहे. त्यामुळं तोंडाची दुर्गंधी हे आरोग्याच्या असंतुलनाचं लक्षण आहे, ज्यावर उपचार करणं आवश्यक आहे. या असंतुलनाचं कारण शोधून काढून त्यावर वेळीच योग्य उपचार केले गेले पाहिजेत.

तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता:

ओवा, तुळस आणि अजमोदासारख्या कच्च्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

दुर्गंधीविरूद्ध सर्वोत्तम संरक्षण मानली जाणारी महत्वाची अँटीऑक्सिडेंटस आणि पोषक तत्त्वं अखंड वापर होणारी धान्यं (Whole Grains), फळं, भाज्या, गाजर, खरबूज आणि लिंबूवर्गीय पदार्थांमध्ये आढळतात.

हे अन्न आपल्याला आपलं पचनक्रियेचं आरोग्य राखण्यासाठी आणि आपल्या पचनमार्ग आण श्वसनमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक असलेले तंतुमय पदार्थही (फायबर) देते. कारण तोंडाला आणि श्वासाला दुर्गंधी येण्याच्या आतापर्यंतच्या कारणांमध्ये सर्वांत महत्वाचं कारण बिघडलेली पचनक्रिया हेच असतं

Published by: News18 Desk
First published: September 17, 2021, 10:13 AM IST

ताज्या बातम्या