मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांपेक्षा घरच्या कोंबड्यांची अंडीच धोकादायक; संशोधनातून धक्कादायक खुलासा

पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांपेक्षा घरच्या कोंबड्यांची अंडीच धोकादायक; संशोधनातून धक्कादायक खुलासा

पोल्ट्री फार्म आणि घरगुती कोंबड्यांच्या अंड्याबाबत संशोधन.

पोल्ट्री फार्म आणि घरगुती कोंबड्यांच्या अंड्याबाबत संशोधन.

कोंबड्यांच्या अंड्यांची तपासणी केली असता निम्म्याहून अधिक अंड्यांमध्ये शिसं जास्त प्रमाणात असल्याचं दिसून आलं आहे.

मुंबई, 19 ऑगस्ट : सध्याच्या काळात शहरी नागरिकांना ताजा, अगदी शेतातून काढलेला भाजीपाला, फळं मिळणं तसं अवघड आहे. अंड्यांच्या बाबतीतही तशीच काहीशी स्थिती आहे. ग्रामीण भागात (Rural Area) ताजा भाजीपाला, फळं, कोंबडीची अंडी आदी गोष्टी अगदी सहजपणे उपलब्ध होतात. ग्रामीण भागात अनेक शेतकरी शेतीपूरक म्हणून कोंबडीपालन करतात. त्यामुळे या भागात अंडीही (Eggs) ताजी उपलब्ध होतात; पण अंडी केवळ ताजी असून उपयोग नाही. कारण पोल्ट्री फार्मच्या (Poultry Farm) तुलनेत घरी पालन केलेल्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये शिसं (Lead) जास्त प्रमाणात असतं, असं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. जास्त प्रमाणात शिसं असलेली अंडी सेवन केल्यास त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अंड्यातलं शिसाचं वाढतं प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. घरी पालन केलेल्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये, व्यावसायिकरित्या उत्पादित केलेल्या अंड्यांच्या तुलनेत सरासरी 40 पट जास्त शिसं असतं, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून दिसून आलं आहे. ऑस्ट्रेलियात (Australia) सुमारे 4 लाख जण घरगुती स्वरूपात कोंबडीपालन करतात. या संशोधनात दोनपैकी एका कोंबडीच्या (Hen) रक्तात शिसं जास्त प्रमाणात असल्याचं दिसून आलं आहे. या कोंबड्यांच्या अंड्यांची तपासणी केली असता, निम्म्याहून अधिक अंड्यांमध्ये शिसं जास्त प्रमाणात असल्याचं दिसून आलं आहे. या संशोधनांतर्गत, ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमधल्या 55 घरांच्या बागेतल्या (Garden) मातीचं परीक्षण (Soil Testing) करण्यात आलं. कोंबड्यांना दिला जाणारा आहार आणि जनावरांना दिलं जाणारं पाणी या दोन्हींमधून शिसं शरीरात जात असल्याचं दिसून आलं. यानंतर Vegesafe च्या एका मोहिमेंतर्गत ऑस्ट्रेलियातल्या घरांमधल्या 25 हजारहून अधिक बागांमधल्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यात शिसं हे प्रमुख चिंतेचं कारण होतं. हे वाचा - काळजी घ्या! हृदयविकाराचा झटका आलेल्यांमध्ये 50 टक्के डायबेटिसचे रुग्ण कोंबडी किंवा इतर पक्ष्यांसाठी रक्तातल्या शिशाच्या पातळीसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वं नाहीत. पशुवैद्यकीय मूल्यांकन आणि संशोधनानुसार, 20 मायक्रोग्रॅम/ प्रति डेसीलीटर किंवा त्याहून अधिक पातळी कोंबड्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. घरगुती पालन केलेल्या 69 कोंबड्यांची चाचणी केली असता, त्यांच्यापैकी 45 टक्के कोंबड्यांच्या रक्तात (Hens Blood) शिशाचं प्रमाण 20 मायक्रोग्रॅम/डीएलपेक्षा अधिक असल्याचं दिसून आलं. त्यानंतर या कोंबड्यांच्या अंड्यांची तपासणी करण्यात आली. ऑस्ट्रेलिया, तसंच जगभरातल्या कोणत्याही देशात अंड्यांतल्या शिशाच्या प्रमाणाबाबत कोणतंही मानक नाही. तथापि, 19 व्या ऑस्ट्रेलियन टोटल डाएट स्टडीमध्ये दुकानातून विकत घेतलेल्या अंड्यांच्या एका लहान नमुन्यात 5 मायक्रोग्रॅम/डीएलपेक्षा कमी शिशाची पातळी असल्याचं दिसून आलं. घरगुती स्वरूपात पालन केल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या अंड्यात शिशाची सरासरी पातळी 301 मायक्रोग्रॅम प्रति किलोग्रॅम अशी होती. त्याच वेळी बाजारातून खरेदी केलेल्या 9 अंड्यांमध्ये हे प्रमाण 7.2 मायक्रोग्रॅम प्रति किलोग्रॅम असल्याचं दिसून आलं. बागेतल्या किंवा घराच्या अंगणातल्या जमिनीतल्या शिशाच्या पातळीनुसार, घरगुती पालन केलेल्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये शिशाची पातळी असू शकते. मातीमध्ये शिसं असल्यामुळे बहुतेक वेळा हे शिसं कोंबड्यांच्या शरीरात जातं. कारण त्या माती उकरतात आणि जमिनीवर टाकलेलं अन्न खातात. हे वाचा - Anti Diabetic: कडुलिंबाची पानं मधुमेहावर जालीम उपाय; इतक्या आजारांवर आहेत फायदेशीर शिशाची पातळी कमी असली तरी ती मानवी आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. यामुळे माणसांना हृदयविकार, कमी आयक्यू, किडनीचे आजार होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, लेड एक्सपोजरची (Lead Exposure) कोणतीही सुरक्षित पातळी अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. एकूणच कोंबड्यांच्या अंड्यातलं शिसं मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
First published:

Tags: Health, Lifestyle

पुढील बातम्या