मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

गर्भातील 'श्रावणबाळ'; पोटात असतानाच चिमुकल्या लेकाने वाचवला आईचा जीव

गर्भातील 'श्रावणबाळ'; पोटात असतानाच चिमुकल्या लेकाने वाचवला आईचा जीव

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

आईने बाळाला जन्म देण्याआधीच बाळाने आईला नवं आयुष्य दिलं आहे.

    ब्रिटन, 29 मे : सामान्यपणे एक आई आपल्या बाळाला जन्म देत असते. पण अशा मायलेकाची चर्चा आहे, जिथं बाळानेच आईला नवा जन्म दिला असं म्हणण्यास हरकत नाही. आईच्या पोटात असतानाच या चिमुकल्या लेकाने आपल्या आईचा जीव वाचवला (Baby saved mother's life) आहे. त्याच्या अस्तित्वामुळे त्याच्या आईला आपल्याला गंभीर आजार असल्याचं वेळेत निदान झालं. यूकेतील लिव्हरपूलमध्ये राहणारी 30 वर्षांची क्लेअर हिलटॉन-एलिसन. जिनं प्रेग्नन्सीत आपल्या बाळाने आपला जीव वाचवला असा दावा केला आहे. तिच्या बाळामुळेच तिला असलेल्या ब्रेस्ट कॅन्सरचं (Woman detects breast cancer in pregnancy) निदान झालं आणि तिला वेळीच उपचार घेता आले. प्रेग्नन्सीत क्लेअरच्या शरीरात बदल होते, त्यामुळे ती आपल्या शरीरातील या बदलांना दररोज तपासत होती, त्याचा अनुभव घेत होती. ती सातत्याने आपले ब्रेस्टही चेक करायची  नोव्हेंबर, 2020 क्लेअर प्रेग्नन्सीच्या 31 व्या आठवड्यांत होती. तेव्हा तिला तिच्या उजव्या ब्रेस्टला वाटाण्याच्या आकाराची एक गाठ असल्याचं दिसलं. ती तात्काळ डॉक्टरांकडे गेली. तिच्या काही तपासण्या झाल्या आणि डिसेंबरमध्ये तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालं. यामुळे तिच्या पायाखालची जमीन घसरली. पण अद्याप या जगात न आलेल्या बाळासाठी तिने कॅन्सरशी लढा देण्याचं ठरवलं. हे वाचा - जन्मानंतर कोरोनाने जन्मदातीला हिरावलं; मिनिटभरात दूध देण्यासाठी धावल्या शेकडो आई डेली मेलच्या रिपोर्टनुसार क्लेर म्हणाली, माझ्या मनात भावांनाचा कल्लोळ होता. एका मिनिटाला मी दुःखी व्हायचे आणि दुसऱ्या मिनिटाला मी त्यावर धीट होऊन कॅन्सरशी लढा देण्याचा निश्चय करायचे. मध्येच मला रागही यायचा कारण माझं हे पहिलं बाळ होतं, त्याच्या जन्माआधीच असं का झालं, हे माझ्यासोबत का झालं असं वाटायचं. पण नंतर मग प्रेग्नन्सीमुळे, माझ्या बाळामुळेच माझं आयुष्य वाचलं याचं समाधानही होतं. जर प्रेग्नंट नसते तर मी ब्रेस्ट नियमित तपासले नसते आणि नंतर मला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं असतं पण तोपर्यंत कदाचित उशीर झाला असता. क्लेअरवर कॅन्सरवरील उपचार सुरू झाले. आपल्या उपचाराचा बाळावर परिणाम होणार नाही याची असेच उपचार तिने घेतले. फेब्रुवारी, 2021 ला  तिची प्रसूती झाली. तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला. ज्या बाळामुळे तिच्या कॅन्सरचं निदान झालं आता तेच बाळ तिला कॅन्सरवरील उपचारांच्या वेदनांना विसरण्याचं आणि कॅन्सरशी लढण्याचंही बळ देतं आहे. हे वाचा - 10 वर्षांनी हलला पाळणा; कोरोनाने 6 महिन्यांतच हिरावला आनंद, चिमुकलीचा घेतला जीव प्रेग्नन्सीत केमोथेरेपी घेणं तसं कठीणच होतं. पण मला माझ्या बाळासाठी हे करायचं होतं, ज्याला मी अजूनही भेटले नव्हते. आता त्याच्या जन्मानंतर मला खूपच बळ मिळालं आहे. त्याच्यामुळे मला कॅन्सरवरील उपचारांना सामोरं जातं येतं. त्याच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करता येतं.  त्याने माझ्यामध्ये सकारात्मकता निर्माण केली आहे. माझ्या कॅन्सरला मला माझ्या आईपणावर भारी पडू द्यायचं नाही, असं क्लेरी म्हणाली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Breast cancer, Cancer, Pregnancy

    पुढील बातम्या