मराठी बातम्या /बातम्या /heatlh /कोट्यवधी लोकांनी घेतल्यानंतर आता औषध निरुपयोगी असल्यचा साक्षात्कार, Side Effects सुद्धा बरेच

कोट्यवधी लोकांनी घेतल्यानंतर आता औषध निरुपयोगी असल्यचा साक्षात्कार, Side Effects सुद्धा बरेच

तुम्हीही कोरोना झाल्यावर Azithromycin घेतली असेल. मात्र कोरोनावरील उपचारासाठी या गोळीचा काहीच उपयोग नसल्याचं सिद्ध झालं आहे.

तुम्हीही कोरोना झाल्यावर Azithromycin घेतली असेल. मात्र कोरोनावरील उपचारासाठी या गोळीचा काहीच उपयोग नसल्याचं सिद्ध झालं आहे.

तुम्हीही कोरोना झाल्यावर Azithromycin घेतली असेल. मात्र कोरोनावरील उपचारासाठी या गोळीचा काहीच उपयोग नसल्याचं सिद्ध झालं आहे.

नवी दिल्ली, 29 जुलै: कोरोनाच्या (Corona) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ताप आल्यावर, कोरोनाचं कुठलंही लक्षण (Symptom) दिसल्यावर किंवा साधा खोकला (Cough) झाला तरी अनेकजण Azithromycin गोळ्या घेतात. अनेक डॉक्टरही कोरोनापासून बचाव करण्यासाठीच्या औषधांमध्ये या गोळ्यांचा समावेश करतात. मात्र प्रत्यक्ष कोरोनाविरुद्धच्या लढाईत या गोळ्यांचा काहीही उपयोग नसल्याचं सिद्ध झालं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (University of California) आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीनं (Stanford University) केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. या गोळीमुळे काही बाबतीत रुग्णांना आराम पडत असला, तरी प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग नसल्याचं दिसून आलं आहे.

काय आहे Azithromycin?

Azithromycin हे एक ब्रॉड-स्पेक्ट्रम अँटिबायोटिक आहे. याचाच अर्थ वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियल इन्फेक्शनविरोधात लढण्यासाठी याचा उपयोग होतो. साधारणतः आतापर्यंत याचा उपयोग श्वसनसंस्थेतील इन्फेक्शन, पोटातील इन्फेक्शन आणि टायफॉईडवरील उपचारांसाठी करतात.

मेडिकल स्टोअर्समध्ये सहज उपलब्ध

सहसा कुठलीही अँटिबायोटिक गोळी किंवा औषध हे डॉक्टरांच्या प्रिसक्रिप्शनशिवाय देता येत नाही. मात्र Azithromycin गोळ्या मेडिकलमध्ये सहजरित्या उपलब्ध होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे कुठल्याही छोट्यामोठ्या आजारासाठी लोक या गोळ्या विकत घेताना दिसतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेणं योग्य नसल्याचं सांगण्यात येतं.

हे वाचा -कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे दर वाढले, जाणून घ्या नवे दर

संशोधनातील निष्कर्ष

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीनं 263 स्वयंसेवकांना घेऊन हा प्रयोग केला. यातील 171 जणांना Azithromycin चा सिंगल डोस देण्यात आला, तर उरलेल्या 62 जणांना त्याच्यासारखीच प्लेसिबो गोळी देण्यात आली. 14 दिवसांनंतर सर्वांचे रिपोर्ट घेण्यात आले. त्यावेळी Azithromycin गोळी घेण्याऱ्यांच्या लक्षणांमध्ये काहीच फरक पडला नसल्याचं दिसून आलं, तर प्लेसिबो गोळी घेतलेल्यांमध्ये मात्र काहीशी सुधारणा झाल्याचं दिसून आलं.

First published:
top videos

    Tags: Corona updates, Coronavirus