मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Bad Habits: सकाळी उठल्यावर चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, होऊ शकतं नुकसान

Bad Habits: सकाळी उठल्यावर चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, होऊ शकतं नुकसान

सकाळी उठल्यानंतर (avoid these mistakes in the morinign) केलेल्या काही चुका या दिवसभरासाठी महागात पडण्याची शक्यता असते.

सकाळी उठल्यानंतर (avoid these mistakes in the morinign) केलेल्या काही चुका या दिवसभरासाठी महागात पडण्याची शक्यता असते.

सकाळी उठल्यानंतर (avoid these mistakes in the morinign) केलेल्या काही चुका या दिवसभरासाठी महागात पडण्याची शक्यता असते.

  मुंबई, 22 ऑक्टोबर : सकाळी उठल्यानंतर (avoid these mistakes in the morinign) केलेल्या काही चुका या दिवसभरासाठी महागात पडण्याची शक्यता असते. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण ज्या प्रकारे दिवसाला सुरुवात करतो, त्याचा (Good start of morning makes a day) परिणाम दिवसभर जाणवत असतो. दिवसाची सुरुवात जर चांगली झाली, तर अख्खा दिवस चांगला जाण्याची शक्यता असते. सुरुवात करा चांगली अनेकजण सकाळची सुरुवात चांगली आणि आरोग्यदायी करण्याची संधी गमावतात आणि काही चुका करतात. त्या चुकांमुळे अख्खा दिवस हा रागात आणि आळसात जाण्याची शक्यता असते. सकाळी जाग आल्यानंतर उशीरापर्यंत बेडवर लोळत पडणे, उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचं सेवन करणे, व्यायाम चुकवणे यासाऱख्या चुकांमुळे आपला दिवस खराब जाण्याची शक्यता अधिक असते. या चुका नेमक्या कुठल्या हे लक्षात ठेवलं, तर त्या टाळणं सोपं जाऊ शकतं. पहिली चूक – ब्रेकफाट न करणं अनेकजण सकाळी ब्रेकफास्ट करायचं टाळतात. ब्रेकफास्ट हा दिवसातील सर्वात महत्वाचा घटक असून तो टाळल्यामुळे शरीराचं मोठं नुकसान होतं. दिवसभरासाठी शरीराला पहिली उर्जा देणारा ब्रेकफास्ट हा हेल्दी आणि चौरस असणं गरजेचं आहे. शरीराला ऊर्जा देणं आणि आणि वेगवेगळ्या आजारांशी लढण्याचं काम पहिला ब्रेकफास्ट करत असतो. त्यामुळे तो कधीच चुकवू नका, असा सल्ला डॉक्टर देतात. दुसरी चूक – तासनतास बेडवर लोळणे सकाळी जाग आल्यानंतर ताबडतोब उठा आणि बेडमधून बाहेर या, असा महत्त्वाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. झोप होऊनही बेडवर लोळत पडल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण बिघडत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. एका जागी पडून राहिल्यामुळे रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन दिवसभर सुस्ती येण्याची शक्यता असते. त्यामुळे जाग आल्या आल्या उठा आणि पुढच्या कामाला लागा, असा संदेशच या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. तिसरी चूक – रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे सकाळी उठल्यावर अनेकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. अर्था आयुर्वेद आणि ऍलोपथी या दोन्ही शाखा चहाला विरोध करत नाहीत. मात्र रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिमाम शरीराला जाणवण्याची शक्याता असते. त्याऐवजी अगोदर कोमट पाण्यात लिंबू आणि चमचाभर मध घालून प्यायल्यास शरीराला ऊर्जा आणि उत्साह मिळायला मदत होते, असं संशोधकांचं मत आहे. हे वाचा- काजोलने पती अजय देवगणबद्दल सांगितले दोन सिक्रेट!वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
   चौथी चूक – व्यायाम न करणे
  अनेकजण सकाळी उठून व्यायाम करत नाहीत. यामुळे शरीरातील आळस जात नाही. जर सकाळी उठून नियमित व्यायाम केला, तर दिवसभर मन फ्रेश राहण्याची शक्यता अधिक असते.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Health, Lifestyle, Types of exercise

  पुढील बातम्या