मुंबई, 05 ऑगस्ट : व्यायामामुळे शरीर केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही मजबूत होते. बाह्य आरोग्यासोबतच आतील आरोग्यासाठीही रोजचा व्यायाम महत्त्वाचा आहे. मात्र, दमा असणाऱ्यांना व्यायाम करणे धोकादायक ठरू शकते. काही गोष्टींची खबरदारी घेतल्यास व्यायामानेही दमा आटोक्यात येऊ शकतो. दम्यामुळे माणसाला श्वास घेण्यास त्रास होणे, इनहेलरचा वारंवार वापर आणि हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर नियमित व्यायाम करून दम्याचे दुष्परिणाम टाळता येतात. दमा असताना व्यायाम करताना तंदुरुस्त राहण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी त्याविषयी (Exercise In Asthma) जाणून घ्या.
नेहमी इनहेलर सोबत ठेवा -
दम्याच्या रुग्णांनी नेहमी इनहेलर सोबत ठेवावे.
व्हेरी वेल हेल्थच्या माहितीनुसार, दम्याच्या रुग्णांनी व्यायाम करतानाही नेहमी इनहेलर बाळगावे. इनहेलरच्या मदतीने अचानक उद्भवणारी दम्याची लक्षणे नियंत्रित करता येतात.
या गोष्टीची काळजी घ्या -
अस्थमा अधिक बळावतो त्या वेळी व्यायाम करणे टाळावे. व्यायाम करण्यापूर्वी नेहमी दम्याचे निरीक्षण करा. दमा सामान्य असेल तेव्हाच हलका व्यायाम करून व्यायामाची सुरुवात करावी.
अस्थमा अॅक्शन प्लॅन -
दमा असणाऱ्यांनी व्यायाम करताना, प्रथम अस्थमा कृती योजनेचे पालन करावे. किती व्यायाम आणि कोणता व्यायाम करावा, सर्व तपशील दमा कृती आराखड्यातून अंतर्भूत केला पाहिजे. तसेच, कोणता व्यायाम केल्याने दम्याचा अटॅक येतो, तर त्याचा समावेश रेड झोनमध्ये करा आणि तो पुन्हा करू नका.
ट्रिगर -
दम्याचा व्यायाम करताना कोणत्याही प्रकारची स्थिती दम्याला चालना देऊ शकते. जसे एखाद्या दिवशी हवेत जास्त ओलावा असतो, तेव्हा बाहेर न जाता घरी व्यायाम करणे चांगले. असे केल्याने दम्याचा त्रास होणार नाही. यासोबतच मास्क घालणे, इनहेलर वापरणे किंवा नुसते चालणे यासारख्या काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
हे वाचा -
डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर
दम्याच्या वेळी हे व्यायाम करा
चालणे
योग
पोहणे
नृत्य
हे वाचा -
ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा
दमा असेल तर हे व्यायाम करू नये -
धावणे
एरोबिक्स
झुंबा
वजन उचलणे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.