मराठी बातम्या /बातम्या /heatlh /डोळ्याखाली डार्क सर्कल आहेत? असू शकतं या गंभीर आजाराचं लक्षण, करू नका दुर्लक्ष

डोळ्याखाली डार्क सर्कल आहेत? असू शकतं या गंभीर आजाराचं लक्षण, करू नका दुर्लक्ष

बर्‍याच वेळा डोळ्यांभोवताली डार्क सर्कल (Dark Circle) सौंदर्यात अडथळा बनतात. कमी झोप, जास्त थकवा आणि तणाव यामुळे डार्क सर्कल्स येतात. डार्क सर्कल येऊ नयेत यासाठी योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ते शक्य होत नाही. डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात परंतु, ती थकवा किंवा तणावामुळे असतील म्हणून आपण फारसं लक्ष देत नाही.

पुढे वाचा ...

  मुंबई,13 मे-  बर्‍याच वेळा डोळ्यांभोवताली डार्क सर्कल (Dark Circle) सौंदर्यात अडथळा बनतात. कमी झोप, जास्त थकवा आणि तणाव यामुळे डार्क सर्कल्स येतात. डार्क सर्कल येऊ नयेत यासाठी योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ते शक्य होत नाही. डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात परंतु, ती थकवा किंवा तणावामुळे असतील म्हणून आपण फारसं लक्ष देत नाही. मात्र, डार्क सर्कल होण्याची कारणं वेगळीही असू शकतात तसंच त्यातून गंभीर आजार होऊ शकतात, असंही अलीकडे समोर आलंय. आज आपण डार्क सर्कल हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात, हे जाणून घेणार आहोत.

  डायबेटिस-

  डायबेटिस (Diabetes) म्हणजे मधुमेह झाला की शरीरात रक्तातील साखरेची पातळी (Sugar Level) वाढू लागते. रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण खूप धोकादायक असते. कारण ते शरीरातील नसांपर्यंत आवश्यक पोषकद्रव्यं वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नुकसान पोहोचवतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणं महत्त्वाचं आहे. रक्तातील साखरेच्या वाढत्या पातळीची लक्षणं त्वचेवरही दिसतात. डार्क सर्कल, त्वचा ढिली पडणं आणि डोळ्यांना सूज (Eyes Swelling) येणे, ही काही मुख्य लक्षणं तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्याचं दर्शवतात. डायबेटिसमुळे ग्लायकेशन प्रक्रियेचं नुकसान होतं. त्यामुळे त्वचेचा ताण कमी होऊ लागतो आणि डोळ्याभोवती डार्क सर्कल दिसू लागतात. कमी स्ट्रेचमुळे त्वचा खूप ढिली होते. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

  मानेभोवतीची त्वचा काळी पडणं-

  जर तुमच्या मानेभोवतीच्या त्वचेचा रंग डार्क (Dark Circle on Neck) होऊ लागला असेल तर याचा अर्थ तुमच्या रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढली आहे. या स्थितीला मेडिकल भाषेत अकॅन्थोसिस निग्रिकन्स असं म्हणतात. अकॅन्थोसिस निग्रिकन्स हे देखील डायबेटिसचे लक्षण असू शकतं.

  डायबेटिसची इतर लक्षणं-

  तोंड येणं - डायबेटिसच्या रुग्णांमध्ये हे लक्षण फार कमी जाणवतं. परंतु काहींना तोंड येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. डायबेटिसच्या रुग्णाला शरीराच्या कोणत्याही भागावर फोड येऊ लागतात. जळल्यानंतर किंवा पोळल्यानंतर त्वचेची सालपटं निघताना होणाऱ्या त्रासापेक्षा या फोडांचा त्रास कमी असतो.

  त्वचा कडक होणं - डायबेटिसमुळे रुग्णाच्या शरीराच्या काही भागांवरील त्वचा खूप जड (Tight Skin) किंवा कडक होते, त्यामुळे हालचाल करताना खूप त्रास होतो. मधुमेह जास्त काळ कंट्रोल न केल्यास बोटांची त्वचा दगडासारखी कडक होते. काहींचे गुडघे, कोपरं आणि घोट्याभोवतीची त्वचा खूप कठीण होते. त्यामुळे कधीकधी रुग्णांना हात पाय वाकवण्यात किंवा सरळ करण्यात अडचणी येतात.

  स्किन इन्फेक्शन - डायबेटिसच्या रुग्णांना स्किन इन्फेक्शनच्या (Skin Infection) समस्येलाही सामोरे जावे लागू शकते. डायबेटिसमुळे होणारा हा त्वचेचा संसर्ग शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. त्यामुळे वेदनादेखील होतात.

  तुम्हालाही डार्क सर्कल कायम होत असतील तर ते डायबेटिसचं लक्षण असू शकतं. त्यामुळे तपासणी करून घ्या अन्यथा इतर गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle