Home /News /heatlh /

वजन कमी करण्यासाठी रताळी खायला लागली, 'ओव्हरडोस'मुळे चेहरा झाला नारंगी!

वजन कमी करण्यासाठी रताळी खायला लागली, 'ओव्हरडोस'मुळे चेहरा झाला नारंगी!

निरोगी आयुष्यासाठी व्यायामासोबतच पौष्टिक आहार घेणं गरजेचं असतं. मात्र पौष्टिक आहार शक्यतो तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावा. नाहीतर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात.

मुंबई, 22 मे : निरोगी आयुष्यासाठी व्यायामासोबतच पौष्टिक आहार घेणं गरजेचं असतं. मात्र पौष्टिक आहार शक्यतो तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावा. नाहीतर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. अमेरिकेतील ओहायो प्रांतातील सिनसिनाटी (Cincinnati, Ohio) इथे राहणाऱ्या अ‍ॅलिशा शोबे (Alysha Shobe) यांनी वजन कमी करण्यासाठी रताळी खायला सुरवात केली आणि बघताबघता त्यांच्या शरीराचा रंग नारिंगी झाला. 34 वर्षांच्या अ‍ॅलिशा यांनी पौष्टिक आहार घ्यायचा म्हणून रताळी खाल्ली होती. यामुळे त्यांच्या त्वचेचा रंग बदलून नारिंगी झाला. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणी व्यायाम करतं, तर कोणी डाएट बदलतं. अ‍ॅलिशा यांनीही बारीक होण्यासाठी डाएटचाच आधार घेतला. अ‍ॅलिशा शोबे या पूर्वी लठ्ठ होत्या. त्यावेळी त्यांचं एका मुलावर प्रेम होतं, पण लठ्ठपणामुळे त्या दोघांमध्ये बिनसलं. त्यानंतर 2019 त्यांनी बारीक होण्याचं त्यांनी मनावर घेतलं, असं युनिलेड वेबसाईटच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. जवळपास सहा महिने त्यांनी प्रत्येक पदार्थासोबत रताळी (Sweet Potato) आणि भोपळा खायला सुरुवात केली. त्यांनी फास्टफूड खाणं बंद करून आहारात केवळ भाज्यांचाच समावेश केला. एका दिवसात त्या 5 रताळी, त्यासोबत भोपळा (Pumpkin), मटार, बटरनट स्क्वॉश अशा भाज्या खात होत्या. सुरुवातीच्या चार महिन्यांतच लोकांना त्यांची त्वचा नारिंगी रंगाची (Orange Skin Color) झाल्याचं दिसू लागलं. अ‍ॅलिशा एका शाळेत शिक्षिका आहेत. तिथले विद्य़ार्थीही त्यांच्या त्वचेचा रंग बदलण्याबाबत त्यांना प्रश्न विचारत होते. पोटात बिघाड नसेल, तर त्वचेचा रंग नारिंगी होण्याचं काहीच कारण नाही, असं विद्यार्थीही त्यांना म्हणत होते. त्यानंतर आईनं त्यांची यासंदर्भात कानउघडणी केली, तेव्हा आपल्या त्वचेचा रंग खरोखरच पूर्ण बदलल्याची त्यांना जाणीव झाली. मग त्यांनी त्यांचं डाएट बदललं. त्यांचं वजनही कमी (Weight Loss) झालं होतं. पण त्यानंतर त्यांच्या त्वचेचा रंगही पूर्वीसारखा झाला. आहारातील रताळ्याचं प्रमाणं त्यांनी कमी केलं. पूर्वीप्रमाणे 5 रताळी त्या दिवसाला खात नाहीत. त्यामुळे त्यांच्या त्वचेचा नारिंगी रंग जाऊन त्वचा आधीसारखीच झाली. अ‍ॅलिशा शोबे यांच्याप्रमाणे न्यूट्रिशनच्या नावाखाली नको त्या गोष्टी खाणारे आपल्या आजूबाजूला अनेक आहेत. कोणत्याही पदार्थाचं अतिरेकी सेवन शरीरासाठी योग्य ठरत नाही. तसंच आपला आहार काय असावा, यासाठी वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं उपयुक्त ठरतं. अन्यथा शारीरिक समस्यांना तोंड द्यायला लागू शकतं.
First published:

पुढील बातम्या