वॉशिंग्टन, 19 मे : सकाळी उठल्या उठल्या कुणी कोमट पाणी, कुणी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून, कुणी चहा, कुणी कॉफी तर कुणी ज्युस पितं. पण अमेरिकेतील एक महला मात्र सकाळी उठताच यापैकी काहीही न पिता चक्क स्वतःची लघवी पिते (Woman drink her own urine). फक्त वाचूनच हे विचित्र वाटतं आहे ना? बरं या महिलेला तसा कोणताही मानसिक आजार वगैरे नाही की ज्यामुळे ती हे करते. आपण काय करत आहोत याची पूर्ण शुद्ध तिला आहे. खरंतर आपण असं केल्याने अनेक आजारांपासून मुक्त झालो आहोत, असा अजब दावाच या महिलेने केला आहे.
यूएसच्या कॅलिफोर्नियातील सॅन डिआगो (San Diego) शहरात राहणारी 32 वर्षांची ग्रेस जोनस (Grace Jones) गेल्या दोन आठवड्यांपासून ती युरिन थेरेपी (urine therapy) करते आहे. ती आपली लघवी पिते, आपल्या त्वचा-केसांवर चोळतो, डोळ्यातही आयड्रॉपप्रमाणे टाकते. सोशल मीडियावर तिला हा विचित्र उपाय सापडला.
यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली झाली, अँझायटी आणि ़डिप्रेशन अशा मानसिक समस्या कमी झाल्या, एक्झेमा ही त्वचेची समस्या दूर झाली. उच्च रक्तदाब कमी झाला, पचनसंबंधी समस्या दूर झाली आणि वजन कमी होण्यास मदत झाली, असा दावा या महिलेने केला आहे.
हे वाचा - Remedisivir चोरलं आणि त्याऐवजी कोरोना रुग्णांना...; नर्सिंग स्टाफचा भलताच प्रताप
डेली मेलच्या रिपोर्टनुसार ग्रेस सांगते, मला माझ्या रक्तदाबाच्या औषधांपासून सुटका हवी होती. त्यासाठी मी सोशल मीडियावर पर्यायी उपाय शोधत होते. तेव्हा मला इन्स्टाग्रामवर युरिन थेरेपीबाबत माहिती मिळाली आणि मी त्याचा अवलंब केला. सकाळी उठल्यानंतर मी एक ग्लासभर लघवी पिते. या प्रयोगानंतर मला आता रक्तदाबाची औषधं घेण्याची गरजच पडत नाही. माझ्या त्वचेच्या समस्या दूर झाल्या. माझे केस हेल्दी दिसतात. मी 30 पाऊंड वजन घटवलं आहे. मला डिप्रेशन, अँझायटीही नाही.
ग्रेसच्या मॉर्निंग रूटीनमध्ये या युरिन थेरेपीशिवाय प्लँट बेस्ड डाएटचा समावेश आहे. तिने अल्कोहोलचं सेवनही सोडलं आहे. या दोन्ही बाबी एकंदरच आरोग्यासाठी, वजन कमी होण्यासाठी फायदेशीर आहे. पण ग्रेस आपल्यात झालेल्या बदलाचं क्रेडिट युरिन थेरेपीला देते.
ग्रेसने आपल्या कुटुंबातील काही सदस्यांना आणि मित्रमैत्रिणींना आपल्या या विचित्र उपायाबाबत सांगितलं आहे. त्यांनी मी काय करते आहे हे माहिती नाही, मला वेड लागलं आहे किंवा मी आजारी पडले आहे, मी स्वतःला हानी पोहोचवत आहे, अशा बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे आपला बॉयफ्रेंड काय म्हणेल या चिंतेने तिने त्याला हे सांगितलं नाही.
हे वाचा - सिंगापूरहून येणारी विमानं थांबवा, मुलांना धोका; केजरीवालांची केंद्राला विनंती
वैद्यकीय क्षेत्रात युरिन थेरेपी हा वादग्रस्त विषय आहे. काही डॉक्टरांच्या मते, लघवी प्यायल्याने इन्फेक्शन होऊ शकतं, कारण त्यामध्ये शऱीरातील विषारी घटक असतात. त्यामुळे हा प्रयोग घातक ठरू शकतो. तर काही जणांच्या मते, लघवी पूर्ण शुद्ध असते. आधी यकृत आणि नंतर किडनी अशा दोन अवयवांमधून ती शुद्ध होऊन येते. त्यामुळे ती फायदेशीर आहे. पण काही बाबतीत त्याचा धोका असू शकतो, असंही या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही मात्र हा प्रयोग चुकूनही करू नका. आरोग्याच्या कोणत्याही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.