मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

OMG! सर्जरी केली तरी वाढतच राहते; चौपट लांब आहे या चिमुकल्याची जीभ

OMG! सर्जरी केली तरी वाढतच राहते; चौपट लांब आहे या चिमुकल्याची जीभ

जन्मल्यापासूनच या चिमुकल्याची जीभ लांब आहे.

जन्मल्यापासूनच या चिमुकल्याची जीभ लांब आहे.

जन्मल्यापासूनच या चिमुकल्याची जीभ लांब आहे.

वॉशिंग्टन, 12 फेब्रुवारी जसजसं वय वाढतं तसतसं आपल्या शरीराचे अवयवही वाढत जातात. पण या वाढीलाही मर्यादा असते. म्हणजे आवश्यक तितकीच या शरीराची वाढ होते. पण अमेरिकेतील एका चिमुकल्याची जीभ मात्र त्याच्या मानानं खूप मोठी आहे. विशेष म्हणजे सर्जरी केली तरी त्याच्या जिभेची वाढ होणं काही थांबत नाही. अमेरिकेतील तीन वर्षांचा चिमुकला ओवेन थॉमस. ओवेनचा जन्म 7 फेब्रुवारी 2018 ला झाला. तेव्हाच त्याची जीभ मोठी होती. ओवेनचा जन्म झाला त्यावेळी त्याची आई थेरेसाने डॉक्टरांना त्याच्या जीभेबद्दल विचारले. पण डॉक्टरांनी दुर्लक्ष करत त्याच्या जिभेला खूप सूज असल्यामुळे ती लांब दिसत असल्याचे तिला सांगितलं होतं. पण थेरेसाच्या नर्सने तिला याबाबत चौकशी कर असा सल्ला दिला होता. त्यानंतर डॉक्टरांनी ओवेनच्या तपासण्या केल्या असता त्याला बेकविथ-वाइडमन सिंड्रोम (Beckwith-Wiedemann syndrome) हा आजार झाल्याचे समजले. बेकविथ-वाइडमन सिंड्रोम हा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारामध्ये शरीरातील एखाद्या अवयवाची भरपूर वाढ होऊ लागते. 15 हजारांपैकी एका मुलालाच हा दुर्मिळ आजार होतो. या आजारामुळे ओवेनची जीभ जन्मल्यापासून वाढत आहे. हे वाचा - 'मला माझ्या नवऱ्याकडे जायचं आहे'; पतीसाठी ढसाढसा रडू लागली चिमुरडी, पाहा VIDEO ओवेनला श्वास घ्यायलादेखील त्रास होतो. बऱ्याचदा रात्री झोपताना ओवेन श्वास घ्यायला विसरतो आणि त्याला दम लागल्यासारखे होते. त्याला झोपेत असताना उल्टीसुद्धा झाली आहे. यानंतर थेरेसा आणि तिच्या पतीने घरामध्ये एक डिजिटल मॉनिटर आणला आहे. ज्याच्या माध्यमातून ते ओवेनचा हार्ट रेट आणि ऑक्सिजनची पातळी चेक करतात. अशावेळी ओवेनला काही त्रास होत असल्यास त्यांना समजते. आज तकच्या रिपोर्टनुसार थेरेसाने सांगितले की, 'या डिजिटल मॉनिटरमुळे ओवेनला कधी श्वास घ्यायला त्रास होत असल्याच तिला ताबडतोब समजते. या मॉनिटरमुळे ओवेनचा जीव बऱ्याचदा वाचला आहे. ओवेनच्या या आजारामुळे त्याला कॅन्सर होण्याची देखील शक्यता वाढली आहे. त्यामुळे दर तीन महिन्यांनंतर त्याची अल्ट्रासाउंड आणि रक्ताची तपासणी केली जाते.' हे वाचा - चीनमध्ये BBC World News च्या प्रसारणाला बंदी; नेमकं काय आहे कारण? काय आहे कारण? ओवेनच्या जिभेवर एक शस्त्रक्रिया देखील झाली आहे. त्याची जीभ दोन इंचाने कापण्यात आली होती. त्यामुळे ओवेनची झोपेत असताना श्वास न घेता येण्याची समस्या दूर झाली. ओवेनला आता आपल्या जीभेमुळे काही भीती नाही. डॉक्टरांचे असं म्हणणं आहे की, 'त्याच्या जिभेची वाढ अद्याप कमी झालेली नाही आणि ते एक कायमस्वरुपी तोडगा शोधत आहेत. जेणेकरून ओवेनच्या जिभेची वाढ कमी केली जाईल.
Published by:news18 desk
First published:

Tags: Health, Serious diseases, United States of America, USA

पुढील बातम्या