मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोरोना महासाथीत Alzheimer च्या रुग्णांना मोठा दिलासा; आजारावरील नव्या औषधाला मंजुरी

कोरोना महासाथीत Alzheimer च्या रुग्णांना मोठा दिलासा; आजारावरील नव्या औषधाला मंजुरी

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तूप खायलाच हवं. नियमित खाल्ल्यास स्मरणशक्ती काढते आणि मानसिक आजार कमी होतात.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तूप खायलाच हवं. नियमित खाल्ल्यास स्मरणशक्ती काढते आणि मानसिक आजार कमी होतात.

दोन दशकांनंतर आलेलं हे अल्झायमरवरील (Alzheimer) पहिलं नवं औषध आहे.

वॉशिंग्टन, 08 जून : सध्या कोरोनाव्हायरसवर वेगवेगळी औषधं शोधली जात आहेत. याचदरम्यान अल्झायमरच्या (Alzheimer) रुग्णांना मोठा दिलासा मिळालेला आहे. या आजारावरील नव्या औषधाला मंजुरी देण्यात आली आहे. दोन दशकांनंतर आलेलं हे पहिलं नवं औषध आहे. अल्झायमरवरील या पहिल्या औषधाला अमेरिकेच्या एफडीएने मंजुरी दिली आहे. ज्यामुळे लाखों रुग्णांना फायदा होईल.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (Food And Drug Administration) सोमवारी अल्झायमरवरील (Alzheimer Disease) उपचारासाठी ‘एडुहेल्म’ या औषधाला (Aduhelm) अटी शर्तींसह मंजुरी दिली आहे. यामुळे हे अमेरिकेच्या औषध नियामकाने मंजूर केलेलं अल्झायमरवरील पहिलं औषध ठरलं असून सुमारे दोन दशकांत या आजारासाठीवर बनवण्यात आलेले हे पहिलंच नवीन औषध आहे. हे औषध बायोजेन (Biogen) या कंपनीने बनवलं आहे. बायोजेन ही केम्ब्रिजमधील बायोटेक्नोलॉजी फर्म असून, तिची जपानी भागीदार ईसाईने हे औषध विकसित केलं आहे.

हे वाचा - डेल्टानंतर भारतात आणखी एक भयंकर कोरोना; पुण्यात सापडला सर्वात घातक स्ट्रेन

याहू न्यूजनुसार अल्झायमर या आजाराचा शोध पहिल्यांदा 115 वर्षांपूर्वी एक जर्मन मनोवैज्ञानिक एलोईस अल्झायमर यांनी लावला होता. हा एक मेंदूचा विकार आहे, जो हळूहळू लक्षात ठेवण्याची आणि विचार करण्याची क्षमता नष्ट करतो. दरम्यान, अल्झायमर आजाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता या आजारावर एक औषध उपलब्ध झालेलं आहे. 2003 नंतर अल्झायमरसाठी अधिकृतरित्या मान्यता मिळालेले पहिलं नवं औषध आहे. यामुळे हजारो लोक या औषधाचा लाभ घेऊ शकतील अशी आशा आहे.

एफडीएने सांगितलं की, 3482 रुग्णांवर या औषधाची चाचणी केली गेली. रुग्णांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तीन स्वतंत्र अभ्यासांमध्ये एडुहेल्मचा प्रभाव पाहण्यात आला. त्यानंतर या औषधाला अधिकृत मंजुरी दिली गेली. तसंच एफडीएच्या सेंटर फॉर ड्रग इव्हॅल्यूएशनचे संचालक (Director of the FDA's Center for Drug Evaluation) डॉ. पॅट्रीजिया कॅवाजोनी म्हणाले की, ‘एडुहेल्मला मान्यता द्यावी की नाही यावर लोकांमध्ये बरेच वादविवाद झाले आहेत आणि बऱ्याचदा वैज्ञानिक डेटाचा अर्थ लावण्याच्या प्रकारांमध्ये असं होतं असतं.’

हे वाचा - Corona : कोल्हापूर-रत्नागिरी वगळता बहुतांश ठिकाणी दिलासाच, रिकव्हरी रेट 95%

एफडीएच्या मंजुरीनंतर या औषधाला परवानगी देण्यावरून वादविवाद समोर येत आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात एफडीएने पेरिफेरल आणि सेंट्रल नर्व्हस सिस्टम ड्रग्स एडवायझरी कमिटीच्या (Peripheral and Central Nervous System Drugs Advisory Committee) 11 सदस्यांची नेमणूक केली होती. या औषधावरील शोध निबंध सादर झाल्यानंतर 11 सदस्यांपैकी 10 जणांनी या औषधाच्या मंजुरीविरोधात मतदान केलं होतं. दरम्यान, या नव्या औषधाला मिळालेल्या मंजुरीमुळे अल्झायमरच्या हजारो रुग्णांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: Health, Medicine, Mental health