मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोरोना लस घेतल्यानंतर काहीच साइड इफेक्ट नाही, म्हणजे लस परिणामकारक नाही हे खरं का? काय Side Effects समजायचे नॉर्मल?

कोरोना लस घेतल्यानंतर काहीच साइड इफेक्ट नाही, म्हणजे लस परिणामकारक नाही हे खरं का? काय Side Effects समजायचे नॉर्मल?

साइड इफेक्ट दिसतात म्हणजे लस शरीरात परिणाम करत आहे. परंतु, लसीचे कोणेतही दुष्परिणाम न दिसण्याची देखील शक्यता आहे. यावर तज्ज्ञांचं काय मत आहे वाचा..

साइड इफेक्ट दिसतात म्हणजे लस शरीरात परिणाम करत आहे. परंतु, लसीचे कोणेतही दुष्परिणाम न दिसण्याची देखील शक्यता आहे. यावर तज्ज्ञांचं काय मत आहे वाचा..

साइड इफेक्ट दिसतात म्हणजे लस शरीरात परिणाम करत आहे. परंतु, लसीचे कोणेतही दुष्परिणाम न दिसण्याची देखील शक्यता आहे. यावर तज्ज्ञांचं काय मत आहे वाचा..

नवी दिल्ली, 28 एप्रिल : भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या (corona)दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. या स्थितीत लस हा सर्वात प्रभावी उपाय आहे. मात्र काही राज्यांमध्ये लॉकडाऊनमुळे लसीकरणाचा (Vaccination)वेग काहीसा मंदावला आहे. तसेच लसीच्या दुष्परिणामांबाबत (Side Effects)लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. साइड इफेक्ट दिसतात म्हणजे लस शरीरात परिणाम करत आहे. परंतु, लसीचे कोणेतही दुष्परिणाम न दिसण्याची देखील शक्यता आहे. यावर तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

कोरोना लसीचे दुष्परिणाम काय आहेत (Common side effects of corona vaccine)

लस घेतल्यानंतर, लस टोचलेल्या ठिकाणी वेदना,थकवा,डोकेदुखी,ताप,उलट्या अशी लक्षणे दिसत आहेत. यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर ती रोगप्रतिकार शक्तीच्या (Immune Power)अनुषंगाने दिसणारी चिन्हे आहेत. त्यामुळे घाबरुन जाण्याचं काहीही कारण नाही,असे तज्ज्ञ लोकांना वारंवार सांगत आहेत.

दुष्परिणाम ही सामान्य गोष्ट (if i don't show any side effect is the vaccine ineffective?)

दुसऱ्या लसींप्रमाणे कोरोना प्रतिबंधक लसीच्या अनुषंगाने देखील लोकांच्या मनात खूप साऱ्या शंका आहे. अन्य लसींप्रमाणे या लसीचे देखील दुष्परिणाम दिसून येतात. मात्र या दुष्परिणामांचा प्रभाव फार काळ टिकत नाही.

एक मोठी शंका (All you need to know about corona vaccine side effects)

कोरोना प्रतिबंधक लसीच्या अनुषंगाने रोगप्रतिकार शक्तीच्या यंत्रणेबाबत लोकांच्या मनात प्रश्न आहेत. जसे की लस घेतल्यावर काहीच दुष्परिणाम दिसले नाहीत तर याचा अर्थ असा आहे का लस रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात अपयशी ठरली आहे का?

Alert: RT-PCR चाचणी निगेटिव्ह, तरीही कोरोनाची लक्षणं दिसतायत? काय करायचं?

या दुष्परिणामांमागील सत्य काय आहे

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,असे काहीही नाही किंवा अशी काही शक्यता देखील दिसत नाही. लसीचा कोणताही दुष्परिणाम न दिसणे ही देखील लसीचे दुष्पपरिणाम दिसण्यासारखीच एक सामान्य गोष्ट आहे. याचा पुरावा लसीच्या ट्रायल्स दरम्यान आढळून आला आहे. फायझरच्या (Pfizer)लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरु होते तेव्हा लस टोचलेल्या 50 टक्के स्वयंसेवकांमध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत.

आणि लसीचा हा एक परिणामही

या ट्रायल दरम्यान 90 टक्के स्वयंसेवकांमध्ये विषाणू विरोधात लढण्यासाठीची रोग प्रतिकारक क्षमता तयार झाल्याचे दिसून आले. मॉडर्ना (Moderna)लसीबाबत हेच सांगता येईल. ही लस घेतल्यानंतर 10 पैकी 1 व्यक्तीमध्ये लसीचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. त्यानंतर ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचे दिसून येत आहे.

Covishield आणखी स्वस्त; Serum institute ने जारी केली कोरोना लशीची नवी किंमत

रोगप्रतिकारक शक्ती अशी तयार होते

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती विषाणूपासून संरक्षण करते. ज्या अधिकृत कोरोना प्रतिबंधक लसी आहेत,त्या स्पाईक प्रोटीन (Spike Protein)नावाच्या विषाणू प्रोटीनचा उपयोग करतात. हे प्रोटीन कोरोना विषाणूच्या बाह्य भागात असते. ही लस नैसर्गिक विषाणूची नक्कल करते आणि रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करते.

617 कोरोना व्हेरिएंट्सवर भारी COVAXIN; भारतीय कोरोना लशीबाबत अमेरिकन तज्ज्ञांचा मोठा दावा

1 ते 2 दिवसात संपतात दुष्परिणाम

रोगप्रतिकारक शक्ती या स्पाईक प्रोटीन वर हल्ला करते. यामुळे जळजळ,आजारपणांसह वेदना जाणवतात. रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादामुळे आपल्या शरीरात सामान्य दुष्परिणाम दिसतात,जे साधारण 2 दिवसात नाहीसे होतात. लसीचे दोनही डोस घेतल्यानंतर दिर्घकालीन रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. या दिर्घकालीन रोगप्रतिकार शक्तीला अनुकूल रोगप्रतिकारक शक्ती असंही म्हणतात. यात कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत. अन्य काही आजारांमुळे काही लोकांमध्ये अत्यंत तुरळक प्रमाणात किंवा दुष्परिणाम दिसतही नाहीत. मात्र याचा अर्थ असा नव्हे की लस काम करत नाही. एकंदरीतच असे म्हणता येईल की लसीच्या कार्यक्षमतेचा दुष्परिणामांशी (Side Effect)काहीही संबंध नाही.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus