मराठी बातम्या /बातम्या /heatlh /वाईनच्या दोन थेंबांमध्ये लपलाय हृदयाचा इलाज, वैज्ञानिकांनी सांगितले पिण्याचे नियम!

वाईनच्या दोन थेंबांमध्ये लपलाय हृदयाचा इलाज, वैज्ञानिकांनी सांगितले पिण्याचे नियम!

वाइन आरोग्याला चांगली असते (Wine good for health) हे आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. वैज्ञानिकांनीही हृदयासाठी वाइन फायदेशीर (Wine good for heart) असल्याचं स्पष्ट केलं आहे; पण कित्येक जण वाइनमधल्या अल्कोहोलमुळे (Alcohol in wine) ती पिणं टाळतात.

वाइन आरोग्याला चांगली असते (Wine good for health) हे आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. वैज्ञानिकांनीही हृदयासाठी वाइन फायदेशीर (Wine good for heart) असल्याचं स्पष्ट केलं आहे; पण कित्येक जण वाइनमधल्या अल्कोहोलमुळे (Alcohol in wine) ती पिणं टाळतात.

वाइन आरोग्याला चांगली असते (Wine good for health) हे आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. वैज्ञानिकांनीही हृदयासाठी वाइन फायदेशीर (Wine good for heart) असल्याचं स्पष्ट केलं आहे; पण कित्येक जण वाइनमधल्या अल्कोहोलमुळे (Alcohol in wine) ती पिणं टाळतात.

पुढे वाचा ...

  मुंबई, 10 सप्टेंबर : वाइन आरोग्याला चांगली असते (Wine good for health) हे आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. वैज्ञानिकांनीही हृदयासाठी वाइन फायदेशीर (Wine good for heart) असल्याचं स्पष्ट केलं आहे; पण कित्येक जण वाइनमधल्या अल्कोहोलमुळे (Alcohol in wine) ती पिणं टाळतात. याच व्यक्तींसाठी आता वैज्ञानिकांनी एक चांगली बातमी दिली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, अल्कोहोलयुक्त वाइनप्रमाणेच अल्कोहोल-फ्री वाइनही (Alcohol free wine) आरोग्याला तेवढीच फायदेशीर ठरू शकते. अँगलिया रस्किन युनिवर्सिटीने (Anglia Ruskin University) केलेल्या एका संशोधनामध्ये ही गोष्ट सिद्ध झाली आहे. पुरेशा प्रमाणात अल्कोहोल घेतल्यास त्याचा शरीरावर काय परिणाम होतो याबाबत या ठिकाणी संशोधन (Study on Alcohol) सुरू होतं.

  या संशोधनामध्ये 40 ते 69 वर्षं वयोगटातल्या तब्बल 4 लाख 50 हजार जणांना सहभागी करण्यात आलं होतं. ज्यांनी आठवड्याला 11 ग्लास वाइन प्यायली (How much wine should I drink) होती, त्यांच्यामध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी प्रमाणात दिसून आला. अजिबात वाइन न पिणाऱ्या आणि अति प्रमाणात वाइन पिणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत, पुरेशा प्रमाणात वाइन पिणाऱ्या व्यक्तींना हृदयरोग होण्याचा धोका 40 टक्के (Wine reduces chances of heart disease) कमी होता. विशेष म्हणजे, नॉन अल्कोहोलिक वाइन पिणाऱ्यांमध्येही अशाच प्रकारचे परिणाम दिसून आले.

  वाइन तिच्यामधल्या अल्कोहोलमुळे नाही, तर द्राक्षांमुळे आरोग्यकारक असते. द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, म्हणजेच पॉलीफेनॉल्स (Polyphenols) असतात. यामुळे हृदयाची इनर लायनिंग्स चांगल्या प्रकारे काम करतात. त्यामुळेच, अल्कोहोलयुक्त वाइनसोबतच, अल्कोहोल-फ्री वाइनही (Benefits of Alcohol free wine) आपल्या आरोग्याला तेवढीच फायदेशीर ठरते असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. आठवड्याला सुमारे 8 ते 11 ग्लास वाइन पिणाऱ्या व्यक्तींमध्ये चांगले परिणाम दिसून आल्याचं संशोधकांनी सांगितलं.

  या संशोधनातले प्रमुख संशोधक डॉ. रुडॉल्फ (Dr. Rudolph Schutte) यांनी सांगितलं, की द्राक्षांपासून तयार करण्यात आलेलं अल्कोहोल हृदयासाठी चांगलं असतं; मात्र त्यासोबतच द्राक्षांपासून तयार करण्यात आलेली अल्कोहोल-फ्री वाइनही हृदयासाठी चांगली ठरते. कारण, पॉलीफेनॉल्स या दोन्ही प्रकारच्या वाइन्समध्ये (Wine heart relation) आढळून येतात. दरम्यान, हे संशोधन केवळ वाइनबाबत नव्हे, तर इतर प्रकारच्या अल्कोहोलयुक्त पेयांबाबतही करण्यात आलं होतं. यामध्ये असंही आढळून आलं, की ज्या व्यक्ती बीअर, सायडर आणि स्पिरिटसारखी पेयं पितात, त्यांना कॅन्सर (Beer causes cancer) होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे केवळ ठराविक प्रमाणातच अल्कोहोलचं सेवन करण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

  First published:
  top videos