मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

दारु पिणाऱ्यांना पडतात भयानक स्वप्नं, सोडल्यावर होतो चमत्कार; वाचा सविस्तर

दारु पिणाऱ्यांना पडतात भयानक स्वप्नं, सोडल्यावर होतो चमत्कार; वाचा सविस्तर

दारु पिणाऱ्या व्यक्तींच्या झोपेवर वाईट परिणाम होत असून त्यांना अत्यंत (Alcohol drinker get dangerous nightmares says experts) भयानक स्वरुपाची स्वप्नं पडत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर: दारु पिणाऱ्या व्यक्तींच्या झोपेवर वाईट परिणाम होत असून त्यांना अत्यंत (Alcohol drinker get dangerous nightmares says experts) भयानक स्वरुपाची स्वप्नं पडत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दारु प्यायल्यानंतर ताणतणाव (Alcohol and stress relation) कमी होतात आणि शांत झोप लागते, असा अनेकांचा समज असतो. मात्र हा गैरसमज असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. दारु आणि झोप यांचं एकमेकांशी शत्रूत्वाचं नातं असून दारुड्या व्यक्तीला कधीही शांत झोप लागू शकत नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

काय आहे कारण?

मॅट्रेस कंपनी ओटी च्या झोपेबाबतच्या तज्ज्ञांनी झोप आणि अल्कोहोल यांचं एकमेकांशी विरोधाचं नातं असल्याचं सांगितलं आहे. जी व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त दारूचं सेवन करते, त्या व्यक्तीच्या मेंदूवर दारूचा परिणाम झालेला असतो. त्यामुळे अशा व्यक्तीला शांत झोप लागत नाही. दारुच्या नशेत झोपलेल्या व्यक्तीला अनेक स्वप्नं पडत राहतात, मात्र ती लक्षात राहत नसल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

स्वप्नं आणि मेंदू

दारु न पिणाऱ्या व्यक्तींना जी स्वप्नं पडतात, ती झोप पूर्ण झाल्यावरही लक्षात राहतात. मेंदू आरोग्यपूर्ण स्थितीत असल्यामुळे स्वप्ने लक्षात ठेवण्याची मेंदूची क्षमता अबाधित असते. मात्र दारुच्या नशेत झोपणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूवर दारूचा अंमल झालेला असल्यामुळे त्यांना स्वप्नं लक्षात राहत नसल्याचं तज्ज्ञ सांगतात.

मेंदूवर जर कुठलाही ताण किंवा प्रभाव नसेल, तरच शांत झोप होऊ शकते. त्यावर जर अल्कोहोलचा प्रभाव असेल, तर मेंदूला ताजंतवानं होण्यात अडथळे येत असल्याचं दिसून आलं आहे.

हे वाचा- धक्कादायक! मोबाईल पाहून पाहून आता घरच्यांनाही ओळखेना; तरुणाची भयंकर अवस्था

दारुमुळे पडतात भयंकर स्वप्नं

दारुचे आपल्या मेंदूवर नकारात्मक परिणाम होतात. दारुमुळे वर्तमानकाळातील प्रश्नांपासून सुटका होत असल्याचा आभास निर्माण होत असला, तरी त्यामुळे झोपेत मात्र मेंदूवर परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे साधारणतः दारुच्या नशेत पडणारी स्वप्नं ही अधिक भयंकर स्वरुपाची असतात. त्यामुळे व्यक्तींना सलग झोप लागत नाही आणि स्वप्नांमुळे त्यांना वारंवार जाग येत राहते. मात्र नेमकं काय घडलं हे लक्षात ठेवण्यासाठी मेंदू तल्लख नसल्यामुळे स्वप्नं लक्षात राहत नसल्याचा दावा तज्ज्ञ करतात. मात्र दारु पिणं बंद केल्यावर लगेच स्मरणशक्ती सुधारते आणि स्वप्नं लक्षात राहायला सुरुवात होते, असं तज्ज्ञ म्हणतात.

First published:

Tags: Alcohol, Health, Lifestyle