मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

एका आईची व्यथा! बाळाला कुशीत घेताच त्वचेवर येतात वेदनादायी फोड; आपलं दूधही पाजू शकत नाही

एका आईची व्यथा! बाळाला कुशीत घेताच त्वचेवर येतात वेदनादायी फोड; आपलं दूधही पाजू शकत नाही

एका आईला अशा समस्येने ग्रासलं आहे, ज्यामुळे ती आपल्या बाळाला कुशीत घेऊच शकत नाही.

एका आईला अशा समस्येने ग्रासलं आहे, ज्यामुळे ती आपल्या बाळाला कुशीत घेऊच शकत नाही.

एका आईला अशा समस्येने ग्रासलं आहे, ज्यामुळे ती आपल्या बाळाला कुशीत घेऊच शकत नाही.

  • Published by:  Priya Lad

लंडन, 11 फेब्रुवारी : कोणतीही महिला जेव्हा प्रेग्नंट होते, तेव्हा 9 महिने ती आपल्या बाळाला आपल्या शरीरात अनुभवत असते. त्यानंतर ते या जगात कधी येईल याची प्रतीक्षा करत असते. बाळाचा जन्म झाल्यानंतर कोणतीही आई सर्वात आधी त्याला आपल्या कुशीत घेण्यासाठी, आपल्या छातीला कवटाळण्यासाठी आतूर असते. पण एका आईला अशा समस्येने ग्रासलं आहे, ज्यामुळे ती आपल्या बाळाला कुशीत घेऊच शकत नाही. कारण तिला बाळाचीच अॅलर्जी आहे  (Mother Allergic To Son). आईला बाळाची अॅलर्जी कशी काय असेल, याचं आश्चर्य तुम्हाला वाटेल.

यूकेतील हॅम्पशायरमधील फिओना हुकरचा (Fiona Hooker) अशा समस्येशी झुंजतेय ज्यामुळे ती आपला लेक बार्नीला आपल्या कुशीतही घेऊ शकत नाही. बाळाला कुशीत घेताच तिच्या शरीराला खाज येते. त्वचेवर मोठमोठे फोड येतात आणि त्यात तीव्र वेदना होतात.

द मिररच्या रिपोर्टनुसार, प्रेग्नन्सीचा 31 व्या आठवड्यापासून फिओनाच्या पोटावर लाल रंगाच्या चकत्या आल्या. कदाचित हे प्रेग्नन्सीमुळे असावं, डिलीव्हरी झाल्यानंतर हे बरं होईल, असं तिला सुरुवातीला वाटलं. पण तसं झालं नाही. उलट   बाळाच्या जन्मानंतर ही समस्या अधिकच गंभीर झाली. ती जेव्हा बाळाला आपल्या कुशीत घ्यायची तेव्हा तिच्या त्वचेला जास्तच खाज येऊ लागली. तिच्या त्वचेवर वेदनादायी असे फोड येऊ लागले.

हे वाचा - फक्त लेकीच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून बाबाने आपल्या छातीवर...; बापाचं असं प्रेम पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल

तिने सांगितलं, सुरुवातीला तिला छोटे फोड आले, असं का होत आहे ती तिला समजत नव्हतं. पण जेव्हा आपण बार्नीला कुशीत घेतो तेव्हा तिला खूप वेदना होत असल्याचं जाणवलं.

समस्या वाढली तसं तिनं डॉक्टरांकडे जाण्याचा ठरवलं. डॉक्टरांच्या मते, बार्नीच्या शरीरातील डीएनएमध्ये असं काही आहे, जे फिओनाच्या त्वचेवर परिणाम करत आहे.  फिओनाला दुर्मिळ असं ऑटोइम्युन प्रेग्नन्सी समस्या आहे. या वैद्यकीय भाषेत पेम्फिगोइड गेस्टेशनइस असं म्हणतात. 50 हजारांपैकी एका महिलेला ही समस्या असते.

हे वाचा - OMG! 13 वर्षीय मुलाने एकट्यानेच बनवले इतके पदार्थ; फक्त आकडा वाचूनच चक्कर येईल

मुलाला स्पर्श करता तिच्या त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे ती आपल्या लेकाला छातीजवळही घेऊ शकत नाही. त्याला आपलं दूध पाजू शकत नाही. एका आईसाठी यापेक्षा दुसरी दुःखाची आणि वेदनादायी गोष्ट काय असेल. यावर आता उपचार सुरू आहेत. या समस्येपासून लवकरच मुक्ती मिळे अशी आशा तिला आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle, Parents and child, Pregnant woman, Woman