मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

बापरे! अपघातानंतर 50 किलोंचा झाला पाय; 90 तास 18 सर्जरी केल्या आणि आता...

बापरे! अपघातानंतर 50 किलोंचा झाला पाय; 90 तास 18 सर्जरी केल्या आणि आता...

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

10 वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातानंतर व्यक्तीला असा आजार झाला ज्यामुळे त्याच्या पायाचं वजन वाढलं.

नवी दिल्ली, 25 मार्च  : अपघातानंतर पायाला दुखापत झाली, पाय तुटल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण कधी अपघातानंतर पायाचं वजन वाढल्याचं तुम्ही पाहिलं आहे. एका व्यक्तीला अशा विचित्र समस्येला सामोरं जावं लागलं. एका अपघातानंतर त्याचा एक पाय तब्बल 50 किलो वजनाचा झाला (Man leg weight 50 kg due to rare disease). पायाचं वजन कमी करण्यासाठी 90 तास त्याच्यावर 18 सर्जरी करण्यात आल्या. अमित कुमार शर्मा नावाची व्यक्ती. 10 वर्षांपूर्वी तिचा अपघात झाला होता. त्यानंतर एका आजाराने अमितला एका आजाराने ग्रासलं. ज्यामुळे त्याचा पाय इतका मोठा आणि वजनदार झाला. पायाचा आकार इतका वाढला की झाडाचं खोड किंवा दगडच वाटू लागला. अमितला झालेला आजार म्हणजे लिम्फिडिमा (Lymphedema) अर्थात हत्तीरोग. हत्तीरोगाला वैद्यकीय परिभाषेत फायलेरियासिस (Filariasis) असंही म्हणतात. या आजारात रुग्णाच्या पायाचा (Leg) आकार काही दिवसांत प्रमाणापेक्षा मोठा होऊ लागतो आणि तो हत्तीच्या पायासारखा दिसू लागतो. एखाद्या घटनेत रुग्णाच्या काही रक्तवाहिन्या डॅमेज होतात. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन रक्त एकाच जागी जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे पायाचा आकार सातत्याने वाढत जातो आणि याचा परिणाम हृदय (Heart) आणि मेंदूवर (Brain) होऊ लागतो. हे एक प्रकारचे स्लो पॉयझन आहे, जे हळूहळू रुग्णाला मारते. हे वाचा - लहानपणापासून मेंदूत होता...; डोकेदुखीचं खरं कारण समजताच हादरली तरुणी या आजारावरील उपचारांसाठी अमित यांनी गेल्या 10 वर्षात खूप प्रयत्न केले. ते देशातील अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये गेले. यामुळे त्यांचा खिसा रिकामा झाला पण योग्य उपचार काही मिळाले नाहीत. या आजारामुळं त्यांना चालणं देखील अवघड झालं होतं. तसेच यामुळे त्यांनी नोकरीही गमावली होती. त्यांच्या कुटुंबात कमावणारे ते एकमेव असल्याने एकूण आर्थिक परिस्थिती खालावली होती. ऑगस्ट 2021 मध्ये अमित यांनी दिल्लीतील पटपडगंज येथील मॅक्स रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. या रुग्णालयातील डॉक्टरांना पायाची स्थिती दाखवल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. मॅक्स रुग्णालयातील 25 डॉक्टरांच्या टीमने अमित यांच्यावर 6 महिन्यांत 18 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या. या शस्त्रक्रियांसाठी 90 तासांहून अधिक कालावधी लागला. अमित मॅक्स रुग्णालयात प्रथम आले तेव्हा तेव्हा त्यांच्या पायाचं वजन सुमारे 50 किलो होतं. मात्र शस्त्रक्रियांनंतर पायाचं वजन 23 किलोवर आलं. शस्त्रक्रियांनंतर त्यांच्या पायाचं वजन 27 किलोने कमी झालं. हे वाचा - कसं शक्य आहे? ना प्रेग्नन्सीची लक्षणं, ना बेबी बम्प; रात्री पोटात वेदना झाल्या आणि सकाळी महिलेने अचानक दिला बाळाला जन्म आज तकच्या रिपोर्टनुसार मॅक्स रुग्णालयाचे एमडी डॉ. मनोज यांनी सांगितलं, "ही माझ्यासाठी नवीनच केस होती. अमित यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी उपचार घेतले होते. त्यामुळे त्यांची केस अधिक क्लिष्ट झाली होती. मात्र आम्ही केलेल्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, अमित आता चालू शकतात.येत्या काही दिवसांत अमित यांच्या दोन्ही पायांचा आकार जवळपास समान होईल"
First published:

Tags: Health, Lifestyle, Rare disease, Serious diseases

पुढील बातम्या