मुंबई, 24 मार्च : 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना 1 एप्रिलपासून कोरोना लस (Corona Vaccine) देण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Government) घेतला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली. पात्र व्यक्तींनी तातडीने लसीकरणासाठी नावनोंदणी करावी आणि लस घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान आता कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करायची कशी, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर ही संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया कशी आहे समजून घ्या.
कोरोना लसीकरणासाठी कोविन पोर्टलमार्फत नोंदणी केली जाते आहे. कोविन सिस्टीम 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्ष आणि त्यावरील व्यक्तीच्या नोंदणीसाठी खुली असेल. अशा व्यक्तींना आॅनलाईन नोंदणीसाठी (Online Registration)1 एप्रिल 2021 पासून परवानगी असेल. 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या श्रेणीसाठी संबंधित व्यक्तीचा जन्म हा 1 जानेवारी 1977 पूर्वी झालेला असावा. यंत्रणेची अंमलबजावणी सोपी व्हावी यासाठी कोमोर्बिडीटीची (Comorbidity)अट काढून टाकण्यात आली आहे.
हे वाचा - मुंबईत कोरोनाचा महाविस्फोट; 24 तासांतील थरकाप उडवणारी आकडेवारी समोर
लाभार्थ्यांना पहिला डोस घेतल्याच्या तारखेनंतर 6 व्या किंवा 8 व्या आठवड्यात दुसरा डोस घेण्याचा सल्ला दिला जातो. 29 व्या दिवशी लशीच्या दुसऱ्या डोसचे ऑटो शेड्युलिंग करण्याच्या कोविन (Cowin) प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार चार ते आठ आठवड्यांच्या वाढीव अंतरानं दुसऱ्या डोसची तारीख ठरवण्याचं किंवा निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. जरी दुसऱ्या डोसची स्वयंचलित नोंदणी केली गेली असली तरी लाभार्थी वाढीव कालावधीदरम्यान सोयीनुसार एक दिवस आणि तारीख निवडू शकतात. तसंच www.cowin.gov.inया वेबसाईटवर जाऊन नियोजित वेळापत्रक निश्चित करू शकतात. पण 8 आठवड्यांपेक्षा जास्त उशीर न करण्याचा सल्ला दिला जात आहे. या कालावधीपेक्षा जास्त उशीर झाल्यास लाभार्थी असुरक्षित होऊ शकतो.
हे वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा 'ताप'; 9 जिल्ह्यांनी वाढवलं मोदी सरकारचं टेन्शन
लसीकरणानंतर लाभार्थ्यांनी लसीकरण प्रमाणपत्राची हार्ड कॉपी किंवा डिजीटल कॉपी-लिंक मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. खासगी रुग्णालयांमध्ये लाभार्थ्यांस आकारल्या जाणाऱ्या शुल्कातच याचा समावेश करण्यात आला आहे. प्रमाणपत्र (Vaccine Certificate)प्राप्ती झाले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी संबंधिताने 30 मिनिटे वाट पाहावी. प्रमाणपत्र घेतल्याशिवाय घरी जाऊ नये. जर रुग्णालय प्रमाणपत्र देत नसेल तर लाभार्थी 1075 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात.
एखाद्या लाभार्थ्यांने कोविनवर लसीकरणासाठी नोंदणी केली असेल तर त्याला खासगी किंवा सार्वजनिक रुग्णालयात नोंदणी करायची गरज नाही. जर एखाद्या रुग्णालयाने लसीकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही तर 1075 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.