मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Homeopathic औषध Drosera 30 जीवघेणं ठरू शकतं? काय म्हणाले डॉक्टर पाहा

Homeopathic औषध Drosera 30 जीवघेणं ठरू शकतं? काय म्हणाले डॉक्टर पाहा

कोरोनाच्या भितीने औषध घेतल्याने एकाच कुटूंबातले 8 जण दगावले

कोरोनाच्या भितीने औषध घेतल्याने एकाच कुटूंबातले 8 जण दगावले

एकाच कुटुंबातील 8 जणांचा ड्रोसेरा 30 (Drosera 30) हे होमिओपॅथिक औषध (Homeopathic medicine) घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. तर याच कुटूंबातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

  • Published by:  News18 Desk
बिलासपूर 06 मे : छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये होमिओपॅथिक (Homeopathic) औषधामुळे एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. या लोकांनी ड्रोसेरा 30 (Drosera 30)  घेतलं होतं, अशी माहिती बिलासपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या औषधात 91 टक्के अल्कोहोल होतं, असं त्यांनी सांगितलं. बिलासपूरच्या सिरगिट्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कोरमी (Kormi) गावात राहणाऱ्या या कुटुंबाने मंगळवारी रात्री हे औषध घेतलं. त्यातल्या 8 जणांचा घरीच मृत्यू झाला. त्यांच्यावर नातलगांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर 4 जण गंभीर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या लोकांचा मृत्यू खरंच होमिओपॅथिक औषधांमुळे झाला का? होमिओपॅथिक औषध जीवघेणं ठरू शकतं का? याबाबत डॉक्टरांची मतं जाणून घेतली. (‘औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भररस्त्यात चोपला पाहिजे’, रितेश देशमुख संतापला) होमिओपॅथिक डॉक्टर साक्षी सुमरानी यांनी सांगितलं, ड्रोसेरा 30 (Drosera 30)  या होमिओपॅथिक औषधाची पावर 30 ते 200 असेल तर ते औषध आरोग्यास हानिकारक ठरत नाही. यापेक्षा जास्त डोसचं सेवन केल्यास रुग्ण दगावत नाही मात्र रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल किंवा एखादा आजार बळावलेला असेल तर औषधामुळे उलटी होते किंवा मसविसर्जनात औषध बाहेर फेकलं जातं. पण आजपर्यंत या औषधाने मृत्यू झाल्याचं कोणतंही प्रकरण नाही आहे. तर, सिनीअर होमिओपॅथिक डॉक्टर राजीव सोळंकी यांच्या मते, ड्रोसेरा 30 (Drosera 30)  हे औषध लहान मुलांसाठी कफ किंवा खोकल्यासाठी वापरलं जातं. याचं योग्य मात्रेत सेवन केल्यास मृत्यू होत नाही. त्यांच्या मते हे औषध डॉक्टर डायलूट करूनच देतात. त्यामुळे कोणत्याही साईड इफेक्टची शक्यता नसते. (लग्नाच्या एक दिवसापूर्वीच मिळणार होता डिस्चार्ज; Corona Positive रुग्णाचा भयावह) तर सीएमओंच्या (CMO) मते या औषधामध्ये मोठ्या प्रमाणात अल्कोहोलची मात्रा आढळलेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून, मृत्यूचं खरं कारण लवकरच समोर येईल. सीएमओने दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण कुटुंबाने ड्रोसेरा 30 हे होमिओपॅथिक औषध घेतलं होतं. हे औषध काही प्रमाणात विषाप्रमाणे काम करतं.
First published:

Tags: Chattisgarh, Coronavirus, Medicine

पुढील बातम्या