मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

रोज साडेसात तासांपेक्षा कमी झोपता? वेळीच ओळखा धोका

रोज साडेसात तासांपेक्षा कमी झोपता? वेळीच ओळखा धोका

ज्यांची रोजची झोप साडेसात ते आठ तासांपेक्षा कमी असते,(8 hours daily sleep in necessary for healthy brain claims news research)त्यांना वार्धक्यात मेंदूशी संबंधित अऩेक विकारांना सामोरं जावं लागत असल्याचं नुकत्याच झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  desk news

ज्यांची रोजची झोप साडेसात ते आठ तासांपेक्षा कमी असते,(8 hours daily sleep in necessary for healthy brain claims news research)त्यांना वार्धक्यात मेंदूशी संबंधित अऩेक विकारांना सामोरं जावं लागत असल्याचं नुकत्याच झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप ही अत्यावश्यक बाब असून झोपेचं प्रमाण कमी असणाऱ्यांना काही तात्कालिक तर काही दीर्घकालीन त्रासांना सामोरं जावं लागत असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात.

काय आहे संशोधन?

वॉशिंग्टन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधऩानुसार झोपेचा आणि मेंदूच्या आरोग्याचा घनिष्ट संबंध असल्याचं दिसून आलं आहे. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. ब्रेंडेन लुसी यांनी दिलेल्या माहितीनुसार अपुरी झोप किंवा अशांत झोप ही मेंदूवर विपरित परिणाम करणारी ठरते. विचार करण्याची क्षमता, लक्षात ठेवण्याची क्षमता आणि निरीक्षण करण्याची क्षमता या सर्वांवर अपुऱ्या झोपेचा विपरित परिणाम होत असतो.

साडेसात तास आदर्श झोप

जास्त झोप आणि कमी झोप या दोन्ही बाबी मेंदूसाठी घातक असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. जर तुम्ही आठ तास झोपत असाल, तर साडेसात तासांचा अलार्म लावण्याचा सल्ला दिला गेला आहे. साडेसात तासांची झोप ही आदर्श झोप मानली जाते. मात्र प्रत्येक व्यक्तीचं वय, त्याच्या कष्टाचं स्वरुप आणि त्याची क्षमता यानुसार झोपेची गरज बदलू शकते. मात्र तरीही जी व्यक्ती साडेसात तासांची झोप घेते, तिचा मेंदू कमी झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत तल्लख राहत असल्याचं संशोधनातून दिसून आलं आहे.

झोपेचा होतो सकारात्मक परिणाम

झोप ही मानवासाठी वरदान असून झोपेत माणसाच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल होत असतात. हे बदल पूर्ण होण्यासाठी त्याला नैसर्गिक वेळ द्यावा लागतो. हे बदल होत असताना जर वारंवार झोपमोड होत असेल, तर ही बाब शरीरासाठी हानीकारक ठरण्याची शक्यता असल्याचं वैज्ञानिक सांगतात.

हे वाचा- अभ्यंगस्नान करा; पण कडकडीत गरम पाण्याने नको; थंडीत अति गरम पाण्याची अंघोळ घातक

प्रयोगातून झालं सिद्ध

झोपेचा मेंदूवर होणारा परिणाम तपासून पाहण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला. त्यात सरासरी 75 वर्षं वयाच्या 100 जणांवर प्रयोग करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर मेंदूच्या हालचाली मॉनिटर करणारं यंत्र बसवण्यात आलं. हा प्रयोग चार वर्ष चालला. त्यात ज्या नागरिकांनी साडेसात तासांच्या आसपास झोप घेतली, त्यांना अल्झायमर किंवा मेंदूशी संबंधित इतर आजारांचा त्रास झाला नाही, तर कमी झोप घेणाऱ्यांना या आजाराची लक्षणं दिसून आली. त्यावरून संशोधकांनी हा दावा केला आहे.

First published:

Tags: Lifestyle, Research, Sleep