मराठी बातम्या /बातम्या /heatlh /रात्री झोप लागत नाही? दुधात तूप घालून प्या...; जाणून घ्या तूप खाण्याचे 6 फायदे

रात्री झोप लागत नाही? दुधात तूप घालून प्या...; जाणून घ्या तूप खाण्याचे 6 फायदे

रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी गरमागरम दुधात एक चमचा तूपर घालून ते प्यायलं, तर त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. याचे काय काय फायदे होतात, ते पाहू या.

रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी गरमागरम दुधात एक चमचा तूपर घालून ते प्यायलं, तर त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. याचे काय काय फायदे होतात, ते पाहू या.

रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी गरमागरम दुधात एक चमचा तूपर घालून ते प्यायलं, तर त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. याचे काय काय फायदे होतात, ते पाहू या.

  मुंबई 28 मे: रात्रीची चांगली झोप आरोग्य चांगलं राखण्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण चांगलं आरोग्य हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. शरीर आरोग्यपूर्ण राखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातात. कोरोना महामारीच्या काळात तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याला खूपच महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण प्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना कोरोना संसर्गाचा धोका कमी असतो, हे सिद्ध झालं आहे.

  या सगळ्या गोष्टी विचारात घेता आरोग्य चांगलं राहण्यासाठी रात्रीची झोप चांगली लागणं आवश्यक आहे. भारतीय आयुर्विज्ञान सांगतं, की शरीराच्या आरोग्यासाठी तुपाचा आहारात वापर असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे रोजच्या आहारात तूप असणं लाभदायक मानलं जातं. रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी गरमागरम दुधात एक चमचा तूपर घालून ते प्यायलं, तर त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. याचे काय काय फायदे होतात, ते पाहू या.

  रोज प्या 'तुळशीचं दूध'; Stress जाईल पळून! कसं करायचं, कधी प्यायचं?

  - उत्तम त्वचा : दुधात तूप मिसळून ते रोज पिणं त्वचेच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. कारण दूध आणि तूप हे नैसर्गिक मॉइश्चरायझर (Moisturiser) म्हणून काम करतात. त्यामुळे ते त्वचेचं पोषण करतात. रोज दूध-तूप प्यायल्यास त्वचेची शुष्कता (Dryness of Skin) कमी होते आणि त्वचा तेजस्वी, आरोग्यपूर्ण बनते.

  - लैंगिक समस्या दूर : दूध-तूप रोज आहारात असल्यास लैंगिक शक्तीची (Sex Power) वृद्धी होते, तसंच वीर्याच्या निर्मितीतही वाढ होते. शरीराचा उष्मा कमी करण्याचं काम दूध-तूप करत असल्यामुळे सेक्स-टाइम (Sex Time) वाढण्यास मदत होते. त्यामुळे लैंगिक समस्यांचा सामना करत असलेल्या व्यक्तींनी दररोज रात्री गरम दुधात तूप घालून प्यावं.

  Diabetes च्या औषधांना कंटाळलात; हे घरगुती उपायही करून पाहा

  - चयापचयाला प्रोत्साहन : दूध-तूप आहारात असेल, तर पचनशक्तीही सुधारते. चयापचय क्रिया (Metabolism) सुधारते. त्यामुळे पोटात गॅसेस होण्याचं, तसंच तोंड येण्याचं प्रमाण कमी होतं.

  - सांधेदुखी कमी : सांधेदुखी (Joint Pain) असणाऱ्यांना लवकरात लवकर वेदनांपासून मुक्ती हवी असेल, तर दुधात तूप घालून प्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे सांध्यांमधली दुखी कमी होते. हाडं मजबूत होण्यासही मदत मिळते.

  - चांगली झोप (Sleep): ताण कमी करून मूड चांगला राखण्यासाठी तूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. एक कप दुधात तूप घालून प्यायल्यावर रिलॅक्सेशन (Relaxation) मिळतं आणि झोप येण्यास मदत मिळते.

  - पोटाच्या समस्या दूर : दुधात तूप घालून प्यायल्यामुळे शरीरात विकरं (Enzymes) स्रवायला मदत होते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. ही विकरं खाद्यपदार्थांचं पचन सुलभपणे करण्यास मदत करतात.

  First published:
  top videos

   Tags: Health, Health Tips