ब्राझिलिया, 03 ऑगस्ट : महिलांना जसं सुंदर दिसण्याचा मोह असतो तसा पुरुषांना बॉडी बनवण्याचा. त्यासाठी काही पुरुष जीममध्ये जातात तर काही लोक झटपट बॉडी बनवण्यासाठी शॉर्टकट निवडतात. एका बॉडीबिल्डरनेही वयाच्या पन्नाशीत बॉडी बनवण्याच्या हौसेपोटी असाच शॉर्टकट निवडला आणि 55 व्या वाढदिवशीच त्याला मृत्यूने गाठलं. त्याने हवी तशी बॉडी बनवली पण त्याचा मृत्यू झाला.
ब्राझीलचा बॉडीबिल्डर वाल्दिर सेगातोने मसल्स वाढवण्यासाठी असा मार्ग निवडला ज्याने थेट त्याला मृत्यूच्या दारात नेलं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार 2016 साली वाल्दिर म्हणाला होता, लोक मला श्वार्जनेगर, हल्क आणि ही-मॅन बोलतात तेव्हा मला हे ऐकायला खूप आवडतं. मी आता माझे बाइसेप्स डबल केले आहेत पण मला आणखी मोठे बाइसेप्स हवे आहेत.
हे वाचा - बॉलिवूड सेलिब्रिटी नाश्त्यात खातात चविष्ट पदार्थ, हेल्दी राहण्यासाठी तुम्हीही करा डाएटमध्ये सामील
23 इंच बाइसेप्स बनवण्यासाठी त्याने स्वतःच एक खतरनाक ऑईल इंजेक्शन घेतलं. स्ट्रोक आणि इन्फेक्शनचा धोका असतानाही तो बाइसेप्स आणि बॅक मसल्स वाढवण्यासाठी बऱ्याच कालावधीपासून सिंथॉल इन्जेक्शन घेत होता. 6 वर्षांपूर्वी डॉक्टरांनीही त्याला बॉडी बनवण्याच्या इंजेक्शनचा वापर करण्यापासून सावध केलं होतं. यामुळे नव्हर्स डॅमेज होऊन अनेक जीवघेण्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो असं सांगितलं होती. तरी तो इंजेक्शन वापरत राहिला.
त्याचे मसल्स 23 इंच झाले. लोक त्याला द मॉन्सटर म्हणू लागले. ज्याचा त्याला खूप अभिमान वाटत होता. सोशल मीडियावर आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचे बरेच फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करायला आणि स्वतःला वाल्दिर सिन्थॉल म्हणायचा. पण या नादात त्याने आपला जीव गमावला.
हे वाचा - काय आहे ट्रिपल व्हेसल डिसीज आणि हृदयासाठी कसा ठरतो घातक? ही आहेत लक्षणे
रिपोर्टनुसार एका स्थानिक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार मृत्यूच्या दिवशी त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्याने त्याच्या आईला मदतीसाठी बोलावलं होतं. "सकाळी सहाच्या सुमाराच घराच्या मागून तो रेंगत आला. त्यानंतर खिडकी ठोकवून माझ्या आईला मदतीसाठी बोलावलं. मी मरत आहे माझी मदत करा असं तो बोलू लागला. आवाज ऐकून माझी आई उठली. त्यानंतर त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण रिसेप्शन जवळच त्याला हार्ट अटॅक आला आणि तो कोसळला", अशी ही व्यक्ती म्हणाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.