मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

काळजी घ्या! हृदयविकाराचा झटका आलेल्यांमध्ये 50 टक्के डायबेटिसचे रुग्ण

काळजी घ्या! हृदयविकाराचा झटका आलेल्यांमध्ये 50 टक्के डायबेटिसचे रुग्ण

heart

heart

आहारात पोषकतत्त्वांचा अभाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे अगदी कमी वयातही डायबेटिस होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

    मुंबई, 18 ऑगस्ट : डायबेटिस (Diabetes) होण्याचं प्रमाण सध्या प्रचंड वाढलं आहे. डायबेटिस झालेल्या व्यक्तींनी आवश्यक ती काळजी न घेतल्यास अनेक आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशभरात डायबेटिसवर संशोधनही सुरू आहे. ग्लोबल हेल्थ जर्नलने (Global Health Journal) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आलेल्या 50 टक्के रुग्णांना आधीपासून डायबेटिस असल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे, रुग्णांना डायबेटिस असल्याचं माहितीही नव्हतं. वैज्ञानिक भाषेत अशा प्रकारच्या ब्लाकेजला एसटी एलिव्हेशन मायोकॉर्डियल इन्फ्रेक्शन (STEMI) असंही म्हटलं जातं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, जानेवारी 2019 ते फेब्रुवारी 2020 या दरम्यान दिल्लीतील जी.बी. पंत रुग्णालय व जनकपुरी सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयात 3,523 रुग्णांवर या संदर्भात अभ्यास केला गेला. यातील 855 म्हणजेच 24 टक्के रुग्णांना स्वत: ला डायबेटिस असल्याची माहिती होती. उर्वरित लोक मात्र या गोष्टीपासून अनभिज्ञ होते. काळजी घेतल्यास कमी होतो धोका दोन रुग्णालयांतील रुग्णांवर झालेल्या अभ्यासात अनेकांना त्यांच्या डायबेटिसच्या आजाराबद्दल माहिती नव्हती. डायबेटिस असताना योग्य काळजी घेतली गेली नाही तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढत असते. डायबेटिसची माहिती रुग्णांना झाली आणि त्यांनी आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यक ती काळजी घेतली तर हृदयविकाराचा धोका कमी होत असल्याचं डॉ. मोहीत गुप्ता यांनी सांगितलं. वेळोवेळी तपासणी आवश्यक डॉ. मोहीत गुप्ता म्हणाले, ‘18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींनी वेळोवेळी डायबेटिसची तपासणी करायला हवी. यामुळे हृदयविकाराचा व इतर आजारांचा धोका कमी होतो. जी. बी. पंत रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, 49 टक्के डायबेटिस होण्याच्या उंबरठ्यावरील रुग्ण (Pre-Diabetic), 53 टक्के नव्याने आढळलेले डायबेटिक पेशंट, 48 टक्के आधीपासून डायबेटिस असलेल्या रुग्णांमध्ये डाव्या बाजूला व्हेंट्रिक्युलर डिस्फंक्शन (Ventricular Dysfunction) होत असल्याचं लक्षात आलं आहे. सामान्य व्यक्तींच्या तुलनेत डायबेटिस पेशंटना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 42 टक्के अधिक असते. आहारात पोषकतत्त्वांचा अभाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे अगदी कमी वयातही डायबेटिस होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आहारावर नियंत्रण, दररोज न चुकता औषधोपचार व व्यायाम करत राहिल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. वयाच्या 18 वर्षानंतर वेळोवेळी तपासणी करून डायबेटिस आहे की नाही याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. डायबेटिसशी निगडीत संकेत मिळत असतील तरी त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
    First published:

    पुढील बातम्या