मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

पचन नीट होत नाही, पोटाच्या अनेक आजारांवर हिंगाचे पाणी आहे बेस्ट; असं तयार करा

पचन नीट होत नाही, पोटाच्या अनेक आजारांवर हिंगाचे पाणी आहे बेस्ट; असं तयार करा

Benefits Of heeng water- हिंगामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हिंग पाण्यात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि चयापचय गतिमान होण्यास मदत होते.

    मुंबई, 12 ऑगस्ट : मसाल्यातील प्रमुख घटक असलेला हिंग आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हिंगाच्या वापराने आपण पचनशक्ती देखील मजबूत करू शकता आणि त्याच वेळी वजन कमी करण्यात चांगला फायदा मिळवू शकता. हिंगामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हिंग पाण्यात मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि चयापचय गतिमान होण्यास मदत होते. जाणून घेऊया हिंगाच्या (Benefits Of Heeng Water) पाण्याचे फायदे- वजन कमी करण्यासाठी हिंग फायदेशीर - आजकाल तरुणांमध्ये वजन कमी करण्याची क्रेझ आहे. तरुण लोक वजन कमी करण्यासाठी व्यायामशाळेत जाऊन घाम गाळतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच आपले स्नायू त्यामुळे मजबूत होतात. पण, अनेकांना माहीत नसेल की, हे काम तुम्ही घरी बसूनही करू शकता. TOI च्या माहितीनुसार, घराच्या किचनमध्ये असणारा हिंग आपले वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतो. हिंगामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवता येते, हृदयही निरोगी ठेवण्यासाठी ते फायदेशीर आहे. पाचक प्रणाली होते मजबूत - NetMed.com नुसार, हिंगाच्या वापरामुळे पचनक्रिया मजबूत राहते आणि शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. थंडी असताना हिंगाचा वापर सर्दी झाल्यास हिंगाचे पाणी प्यावे. बदलत्या ऋतूत थंडीमुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हिंग श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करण्यास फायदेशीर आहे. हे वाचा - बेसन वापरून असं करा फेशिअल; घरच्या घरी निखळ-सुंदर होईल चेहऱ्याची त्वचा डोकेदुखी - डोकेदुखीच्या वेळी हिंगाचे पाणी प्यावे, हिंगामध्ये दाहक-विरोधी तत्व असते, ज्यामुळे डोकेदुखी दूर होते. डोक्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज आली असेल तर ती कमी करण्यास मदत होते. त्यामुळे हिंगाचे पाणी वेळोवेळी घ्यावे. हे वाचा - तुम्हालाही आहे हाय कोलेस्ट्रॉलची चिंता? 'या' 5 तेलांचा स्वयंपाकात करा समावेश हिंगाचे पाणी कसे बनवायचे - हिंगचे पाणी बनवण्यासाठी आधी एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात चिमूटभर काळ्या मिठासोबत हिंग मिसळा. हे तयार केलेले द्रावण रिकाम्या पोटी प्यावे, याचा आरोग्याला फायदा तर होतोच, पण पोटाशी संबंधित सर्व आजारांपासून आराम मिळतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या