मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोरोना नाही, 'हे' 5 जिवाणू आहे सर्वात जास्त धोकादायक, देशात सर्वाधिक मृत्यू यामुळेच झाले!

कोरोना नाही, 'हे' 5 जिवाणू आहे सर्वात जास्त धोकादायक, देशात सर्वाधिक मृत्यू यामुळेच झाले!

कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांत भारतात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोरोना हा भारतातील सर्वात प्राणघातक रोगजनकांपैकी नाही.

कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांत भारतात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोरोना हा भारतातील सर्वात प्राणघातक रोगजनकांपैकी नाही.

कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांत भारतात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोरोना हा भारतातील सर्वात प्राणघातक रोगजनकांपैकी नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 नोव्हेंबर : जगभरातील अनेक देशांमध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांत कोरोनाने थैमान घातलं. काही देशांमध्ये कोरोनासह मंकी पॉक्स, झिका, इबोला यासारख्या विषाणूजन्य रोगांचा मोठ्या प्रादुर्भाव दिसून आला. एकूणच विषाणूजन्य आजारांमुळे मृत्युंचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला. एकीकडे विषाणूजन्य रोगांमुळे जगभरात ही स्थिती असताना दुसरीकडे जीवाणूजन्य आजारांमुळेही मृत्यू होत असल्याचं दिसून येतं. भारतात 2019 मध्ये जीवाणूजन्य सर्वाधिक मृत्यू झाल्याचं ‘द लॅंसेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलं आहे. सर्वसाधारणपणे पाच प्रकारच्या बॅक्टेरिया अर्थात जिवाणूंचा भारतीयांना सर्वात जास्त धोका असल्याचं या अहवालातील आकडेवारीवरून दिसतं.

कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांत भारतात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोरोना हा भारतातील सर्वात प्राणघातक रोगजनकांपैकी नाही. ‘द लॅंसेट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार ई-कोलाय, एसपी न्यूमोनिया, के. न्यूमोनिया, एस. ऑरियस आणि ए.बॉमनी या पाच जीवाणूंचा सर्वांत धोकादायक रोगजनकांमध्ये समावेश आहे. या अहवालानुसार, या पाच जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गाने 2019 मध्ये भारतात 6.8 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. डायरिया आणि न्यूमोनियाशी संबंधित ई-कोलायमुळे सर्वाधिक 1.6 लाख लोक मृत्युमुखी पडले. याशिवाय एसपी न्यूमोनियामुळे 1.4 लाख, के. न्यूमोनियामुळे 1.3, एस. ऑरियसमुळे 1.2 लाख आणि ए.बॉमनीमुळे 1.1 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

(चिकूला स्वस्त समजून हलक्यात घेऊ नका; हिवाळ्यात तर होतात दुप्पट फायदे)

'या नवीन डाटामुळे प्रथमच जीवाणू संसर्गाने उद्भवलेली जागतिक सार्वजनिक आरोग्य आव्हानं समोर आली आहे. वाढत्या संसर्गावर काम करताना ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यावर गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे', असं वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील इन्स्टिट्युट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (आयएचएमई) चे सहाय्यक लेखक आणि संचालक डॉ. ख्रिस्तोफर मरे यांनी सांगितलं.

(Soar Throat : घशाची खवखव, वेदना त्वरित होईल दूर; करा हे सोपे रामबाण उपाय)

‘द लॅंसेट’चा हा अहवाल 33 प्रजातींमध्ये जीवाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूवर आधारित आहे. 2019 मध्ये भारतात जीवाणू संसर्गामुळे 13.7 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. वर नमूद केलेल्या पाच जीवाणूंच्या संसर्गाव्यतिरिक्त साल्मोनेला टायफी, नॉन-टायफॉइड साल्मोनेला आणि स्यूडोमोनास एरुगिनोसा यांसारखे जीवाणूदेखील लोकांचा जीव घेत आहेत. हे जीवाणू केवळ भारतातच मृत्यूसाठी कारणीभूत ठरत नसून, दुसऱ्या देशांमध्येही यामुळे मृत्यू होत आहेत. लँसेटच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर संसर्गामुळे दरवर्षी सुमारे 1.3 कोटी लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी निम्म्याहून अधिक मृत्यू ई-कोलाय, एसपी न्यूमोनिया, के. न्यूमोनिया, एस. ऑरियस आणि ए.बॉमनी या जिवाणूंच्या संसर्गामुळे झाले आहेत.

First published:

Tags: Marathi news