डॉक्टरांनी काढून टाकला त्याच्या पोटचा ‘गोळा’, दोन महिन्यांत झाला होता जीवघेणा

डॉक्टरांनी काढून टाकला त्याच्या पोटचा ‘गोळा’, दोन महिन्यांत झाला होता जीवघेणा

कोलकात्यात राहणाऱ्या (10 kg tumor found in the stomach of a man) एका व्यक्तीच्या पोटात त्याच्याही नकळत एक गोळा तयार झाला.

  • Share this:

कोलकाता, 14 ऑक्टोबर : बदलत्या जीवनशैलीमुळे (Lifestyle deceases) अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. कामाच्या बदलेलल्या वेळा, उलटसुलट शिफ्ट, सतत बदलत जाणारी जेवणाची आणि झोपेची वेळ याचा माणसांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. कधी कुणाला कुठला आजार जडेल, काही सांगता येत नाही. कोलकात्यात राहणाऱ्या (10 kg tumor found in the stomach of a man) एका व्यक्तीच्या पोटात त्याच्याही नकळत एक गोळा तयार झाला. सुरुवातीला त्याला किरकोळ पोटदुखीचा (Pains in stomach) त्रास होत होता. मात्र बघता बघता 2 महिन्यात हा गोळा इतका वाढला, की त्याला प्रेगनेंट असल्याचं सांगत चिडवू लागले होते.

तपासणीत समजलं सत्य

कोलकात्यात राहणाऱ्या अर्णबने सुरुवातीला त्याच्या आरोग्याची तपासणी केली. त्यावर त्याच्या पोटात गोळा आढळला नव्हता. काही इतर कारणांमुळे पोटात दुखत असावं, असा अंदाज बांधून डॉक्टरांनी त्याला औषधं दिली होती. मात्र पुढच्या 2 महिन्यात हा गोळा इतका वाढला की अर्णबचं पोट कमालीचं फुगलं. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आणि चालताही येईना. अखेर त्याने पुन्हा एकदा डॉक्टरांना भेटून तपासणी करून घेतली. त्यानंतर मात्र त्याला धक्का बसला.

कॅन्सर असल्याचं उघड

त्याच्या पोटात वाढणारा मांसाचा गोळा हा भलामोठा ट्युमर असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तातडीनं ऑपरेशन करून हा गोळा काढून टाकण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. चार तास चाललेल्या ऑपरेशननंतर त्याच्या पोटातून गोळा काढण्यात आला. बाहेर काढलेल्या गोळ्याचं वजन हे जवळपास 10 किलो होतं. अत्यंत जिकीरीचं असणारं हे ऑपरेशन यशस्वीरत्या पार पडल्यामुळे अर्णबचा जीव वाचला.

उपचार सुरूच राहणार

अर्णबच्या पोटातून कॅन्सरचा गोळा काढण्यात आला असला, तरी त्याच्यावर कॅन्सरचे उपचार सुरूच राहतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्याला ठराविक दिवसांनी लिक्विड डाएट दिलं जाणार असून किमोथेरपी केली जाणार आहे.

Published by: desk news
First published: October 14, 2021, 4:42 PM IST

ताज्या बातम्या