आज जागतिक रक्तदाता दिवस : रक्तदानाबद्दलच्या या गोष्टी लक्षात ठेवा

World Blood Donor Day: रक्तदानाबद्दलची जागरूकता (Awareness) मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी 14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो.

World Blood Donor Day: रक्तदानाबद्दलची जागरूकता (Awareness) मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी 14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो.

  • Share this:
मुंबई, 14 जून: 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' (Blood Donation) अशा पाट्या तुम्ही हॉस्पिटल किंवा अन्य ठिकाणी वाचल्या असतील. रक्तदानामुळे माणसाचा जीव वाचू शकतो. आता तर प्रगत तंत्रज्ञानामुळे रक्तातल्या वेगवेगळ्या घटकांचाही वेगवेगळ्या रुग्णांकरिता वापर करणं शक्य होतं. रक्तदानाबद्दलची जागरूकता (Awareness) मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी 14 जून हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने रक्तदानासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं क्रमप्राप्त ठरतं. 'टाइम्स नाऊ हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. सर्वसाधारणपणे एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात जवळपास पाच लिटर रक्त असतं. रक्तदान करताना त्यातलं फक्त 450 मिलिलीटर रक्त काढून घेतलं जातं. तेवढं रक्त संबंधित व्यक्तीच्या शरीरात पुन्हा 24 ते 48 तासात तयार होतं. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. म्हणूनच रक्तदान करणारी व्यक्ती निरोगी आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची असणं आवश्यक असतं. पुरुषांना दर तीन महिन्यांनी आणि स्त्रियांना दर चार महिन्यांनी रक्तदान करता येतं. रक्तदान केल्यानंतर काही जणांना थकवा (Weakness) आल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे रक्तदानानंतर लगेचच कडक उन्हात जाणं टाळावं. भरपूर पाणी प्यावं, फळं खावीत, ज्यूस प्यावा, पौष्टिक आहार घ्यावा. रक्तदान करण्यापूर्वी कोणतंही व्यसन करू नये. रक्तदानाच्या 24 तास आधी धूम्रपान (Smoking) करू नये. तसंच रक्तदानानंतरही किमान तीन तास धूम्रपान करू नये, रक्तदानाच्या 48 तास आधी मद्यपान (Drinking) करू नये. कारण त्यामुळे रक्तातलं अल्कोहोल दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जाऊ शकतं. हेही वाचा- ''राजकारणात पैसाच बोलतो आहे'', काळ्या पैशांवरुन शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल एचआयव्ही, हिपॅटायटिस, सिफिलीस, टीबी अशा दुर्धर व्याधींनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत. तसंच कोणताही गंभीर आजार झाला असेल, तर त्यातून पूर्ण बरं झाल्यानंतर 14 दिवसांपर्यंत रक्तदान करू नये. वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना रक्तदान करता येत नाही. गर्भवती महिला किंवा नुकताच बाळाला जन्म दिलेल्या महिला किंवा नुकताच गर्भपात झालेल्या महिला सहा महिने ते वर्षभरापर्यंत रक्तदान करू शकत नाहीत. त्यांच्या शरीरातल्या लोहाची झीज झालेली असते. त्यामुळे हिमोग्लोबीनची (Haemoglobin) तपासणी केल्यानंतरच त्यांना रक्तदान करता येतं. दातांवर उपचार केल्यानंतर 24 तासांपर्यंत, तसंच टॅटू काढल्यानंतर सहा तासांपर्यंत रक्तदान करू नये, असा सल्ला दिला जातो. या सगळ्या गोष्टींचं भान राखल्यास रक्तदान हा एक उत्तम अनुभव बनतो.
Published by:Pooja Vichare
First published: