मराठी बातम्या /बातम्या /हेल्थ /

उपवासावेळी जेवणात का वापरलं जातं सैंधव मीठ?

उपवासावेळी जेवणात का वापरलं जातं सैंधव मीठ?

काळं मीठ म्हणजेच हिमालयन सॉल्ट या नावानेही ओळखलं जातं.

काळं मीठ म्हणजेच हिमालयन सॉल्ट या नावानेही ओळखलं जातं.

उपवासावेळी अनेक जण सामान्य मिठाऐवजी सैंधव मिठाचा (Rock salt) वापर करताना दिसतात.

मुंबई, 2 जून: मीठ (Salt) हा आहारातील (Diet) महत्त्वाचा घटक आहे. अन्नपदार्थ चविष्ट व्हावा, यासाठी मिठाचा वापर केला जातो. तसंच पापड, लोणचं, मासे आदी पदार्थ दीर्घ काळ टिकावेत यासाठीदेखील मीठ वापरलं जातं. मात्र उपवासावेळी अनेक जण सामान्य मिठाऐवजी सैंधव मिठाचा (Rock salt) वापर करताना दिसतात. यामागे नेमकं काय कारण आहे. आपण रोजच्या आहारात ज्या मिठाचा वापर करतो, ते मीठ सी सॉल्ट म्हणजे सागरी मीठ (Sea Salt) म्हणून ओळखलं जातं. हे मीठ सेवना योग्य व्हावं, यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेदरम्यान मिठावर अँटी कॉकिंग किंवा रासायनिक प्रक्रिया (Chemical Process) केल्या जातात. यामुळे या मिठातलं कॅल्शियम, पोटॅशिअम आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात घटतात. हे वाचा - हे तेल वजन वाढवत नाही तर कमी करतं, नियमित वापरणं ठरू शकतं फायदेशीर तर सैंधव मीठ म्हणजे रॉक सॉल्ट नैसर्गिकदृष्ट्या पूर्णतः शुद्ध (Purified) असतं. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. हे घटक शरीरासाठी उपयुक्त ठरतात. तसंच या मिठात खारेपणा, तसंच आयोडिनचं (Iodine) प्रमाण कमी असतं. यामुळे उच्च रक्तदाब, डोळ्यांची सूज असे विकार होत नाहीत. सैंधव मिठाचे फायदे - सैंधव हे हलकं आणि पाचक असतं. यामुळे पचनक्रिया सुधारते. तसंच रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. - सैंधव मिठाचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते. कारण यामुळे शरीराला आवश्यक पोषणमूल्यं आणि खनिजं शोषून घेण्यास मदत होते. - या मिठाच्या सेवनानं शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तसंच शरीरातील पीएच लेव्हल (pH Level) कायम राहण्यासही मदत होते. - सैंधव मीठ शरीरातील फॅट सेल्स (Fat Cells) काढून टाकण्यास मदत करते. तसंच भूक नियंत्रित ठेवते. वजन घटवण्यासाठीदेखील हे मीठ उपयुक्त ठरतं. हे वाचा - रोज प्या ताक, लस्सी इम्युनिटी, वजन याशिवाय अनेक आहेत Health Benefits वास्तविक सैंधव मीठ शुद्ध स्वरूपात उपलब्ध होतं. त्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते किंवा त्यात कोणतेही अन्य घटक मिसळलेले नसतात. त्यामुळे व्रतवैकल्यांदरम्यान सैंधव मिठाचं सेवन केलं जातं. तसंच व्रत करणाऱ्या व्यक्तीला पोषक घटकांची अधिक गरज असते. सैंधव मिठात आयर्न, झिंक, मॅग्नेशियमसह अन्य घटक असतात. त्यामुळे व्रत करणाऱ्या व्यक्तींच्या शरीराची गरज भागते.
First published:

Tags: Food, Health, Health Tips

पुढील बातम्या