बंद पडलेलं हृदय पुन्हा झालं सुरू, डॉक्टरांनी असा केला चमत्कार; VIDEO VIRAL

बंद पडलेलं हृदय पुन्हा झालं सुरू, डॉक्टरांनी असा केला चमत्कार; VIDEO VIRAL

डॉक्टरांनी हे हृदय यकृत रूग्णांकडे प्रत्यारोपण केले. जर हा प्रत्यारोपण यशस्वी झाला तर अमेरिकेत अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या बर्‍याच लोकांसाठी हा एक नवीन आशेचा किरण असेल.

  • Share this:

वॉशिंगटन, 04 डिसेंबर : डॉक्टरांना देव का म्हटलं जातं याचा एक धडधडीत पुरावा समोर आला आहे. रुग्णाला वाचवण्यासाठीच्या अथक प्रयत्नातून डॉक्टरांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. मृत शरीरातून मिळालेल्या हृदयाचे पुनरुज्जीवन डॉक्टरांनी केले आहे. आता या हृदयात रक्त प्रवाहदेखील सुरू झाला आहे आणि ऑक्सिजन देखील प्रसारित केलं जात आहे. डॉक्टरांच्या या कामामुळे त्यांचं सगळीकडे कौतूक होत आहे.

मेट्रो यूके डॉट कॉमच्या हवाल्याने, डॉक्टरांनी हे हृदय यकृत रूग्णांकडे प्रत्यारोपण केले. जर हा प्रत्यारोपण यशस्वी झाला तर अमेरिकेत अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या बर्‍याच लोकांसाठी हा एक नवीन आशेचा किरण असेल. हल्ली हृदय प्रत्यारोपण करणं सामान्य झालं आहे. अशा परिस्थितीत, प्रत्यारोपणासाठी अनेकदा अवयवांची कमतरता असते.

इतर बातम्या - Video Viral: शेपटीवरून गाडी नेल्यामुळे रागावला कोब्रा, पाठलाग करून बाईकवर बसला

हा चमत्कार Duke University च्या एका सर्जनने केला आहे. या प्रत्यारोपणाला डोनेशन-आफ्टर-डेथ (डीसीडी) असे म्हटले जाते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे मृत हृदय काढून टाकले गेले आणि त्याचे हृदय पुन्हा कार्य करण्यायोग्य बनले आहे.

हार्ट ट्रान्सप्लांटेशन प्रोग्रामचे संचालक डॉ. जेकब निआल श्रोडर यांनी या हृदय सुरू असल्याचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. 2009पासून ही पद्धत यूकेमध्ये अवलंबली जात आहे. परंतु अमेरिकेत हा प्रयोग प्रथमच यशस्वी झाला आहे. तर यामध्ये ज्याने दान दिले गेले आहे आणि ज्याला हृदय दान दिले गेले आहे ते दोघांना एकमेकांना ओळखत नाही.

इतर बातम्या - कुटुंबाची सामूहिक आत्महत्या: दीड वर्षांआधी झालं होतं दुसरं लग्न, एका फोननंतर फॅमिली संपली

First published: December 4, 2019, 5:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading