• Home
  • »
  • News
  • »
  • heath
  • »
  • लैंगिक स्फूर्ती देणारं Viagra पुरुषांना देतंय दीर्घायुष्य; कसं ते वाचा

लैंगिक स्फूर्ती देणारं Viagra पुरुषांना देतंय दीर्घायुष्य; कसं ते वाचा

व्हायग्रा (viagra) घेतलेले पुरुष दीर्घ आयुष्य जगले, असं संशोधना दिसून आलं आहे.

  • Share this:
मुंबई, 28 मार्च : लैंगिक समस्यांचं निराकारण करणारं व्हायग्रा (Viagra) पुरुषांचं आयुष्यही वाढवू शकतं, असं एका संशोधनात आढळलं आहे. 'ब्लू पिल' (Blue Pill) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हायग्राची शास्त्रज्ञांनी कोरोनरी आर्टरी डिसीज (Coronary Artery Disease) असलेल्या पुरुषांवर चाचणी घेतली. त्यात असं आढळलं, की व्हायग्रा घेतलेले पुरुष तुलनेने दीर्घ आयुष्य जगले आणि त्यांना पुन्हा नव्याने हृदयविकाराचा झटका (Heart Disease) येण्याची शक्यताही कमी झाली. निरोगी पुरुषांमध्ये नपुंसकत्व (Impotence) हे हृदयविकाराचं खूप आधीचं लक्षण असू शकतं. कोरोनरी आर्टरी डिसीज असलेल्या पुरुषांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हायग्रा घेतल्याचा फायदा होऊ शकेल, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. त्यावर दोन प्रकारच्या औषधांचे उपाय करता येतात. एक म्हणजे अल्प्रोस्टॅडिल (Alprostadil) हे इंजेक्शन दिल्यास रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि त्यामुळे लिंगात ताठरता येते. दुसरा उपाय म्हणजे अशा पुरुषांना पीडीई फाइव्ह इन्हिबिटर्स अर्थात व्हायग्रासारखी औषधं दिली जातात. ती तोंडाने घेतली जातात आणि ती लिंगातल्या फॉस्फोडिस्टरेज फाइव्ह (PDE5) या विकरांना (Enzymes) रोखतात, त्यामुळे रक्तप्रवाह वाढून लिंगात ताठरता येते. हे वाचा - फक्त 2 मिनिटांत ओळखा तु्म्हाला डायबेटिज आहे की नाही? व्हायग्रासारख्या औषधामुळे रक्तदाब कमी होतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका असलेल्या पुरुषांना ती घेण्याची शिफारस पूर्वी केली जात नव्हती. (लिंगात ताठरता येत नसलेल्यांसाठी (Erectile Dysfunction) व्हायग्रा या औषधाची शिफारस केली जाते.) पण 2017  मध्ये स्वीडनमधल्या कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधल्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं, की ज्या पुरुषांना पूर्वी हृदयविकाराचा झटका आला आहे, ते पीडीई फाइव्ह इन्हिबिटर्स सहन करू शकतात आणि त्यांच्या आयुष्याचा कालावधी वाढूही शकतो. त्या संशोधनाच्या पुढील संशोधन आता करण्यात आलं. त्यात कोरोनरी आर्टरी डिसीज स्थिर स्वरूपात असलेल्या 18 हजार 500 पुरुषांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी 16 हजार 500 जणांना व्हायग्रा देण्यात आलं, तर 2000 जणांना अल्प्रोस्टॅडिल देण्यात आलं होतं. (कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिनीमध्ये मेदयुक्त घटक जमा होतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.) त्यात असं आढळलं, की अल्प्रोस्टॅडिल घेतलेल्यांच्या तुलनेत व्हायग्रा घेतलेल्या पुरुषांचं आयुष्य अधिक होतं, तसंच त्यांच्यात नव्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होती. ज्यांना व्हायग्राचे जास्त डोस देण्यात आले होते, त्यांना त्याचा यासाठी अधिक उपयोग झाला. हे वाचा - तुमचा ब्लड ग्रुप तर हा नाही ना? मग तुम्हाला आहे हार्ट अटॅकचा धोका 'डेलीमेल'च्या रिपोर्टनुसार हा अभ्यास करणारे डॉ. मार्टिन होल्झमॅन (Dr. Martin Holzmann) यांनी सांगितलं, 'नपुंसकत्वाची समस्या वयोमानानुसार वाढत जाते आणि आता आमच्या संशोधनातून असं दिसतं आहे, की पीडीई फाइव्ह इन्हिबिटर्स प्रकारची औषधं हृदयविकारापासून संरक्षण करू शकतात आणि आयुष्य वाढवू शकतात,  या दोन्ही गोष्टींचा संबंध आहे, ही गोष्ट यातून स्पष्ट झाली. पण नेमकं कारण कळलेलं नाही. पीडीई फाइव्ह इन्हिबिटर्स घेतलेल्या व्यक्ती अल्प्रोस्टॅडिल घेतलेल्यांपेक्षा मुळातच तुलनेने अधिक हेल्दी असाव्यात आणि त्यामुळे धोका कमी झाला असावा, अशीही शक्यता आहे. व्हायग्राचा उपयोग हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी झाला हे सिद्ध करायचं असेल, तर पीडीई फाइव्ह इन्हिबिटर्स घेतलेले आणि न घेतलेले असे दोन गट करावे लागतील. अशा अभ्यासासाठी आताच्या अभ्यासातून नक्की दिशा मिळेल.', असंही मार्टिन म्हणाले.
Published by:Priya Lad
First published: