Depression: ही देखील असू शकतात नैराश्याची लक्षणं, घरगुती उपाय ठरतील उपयुक्त

Depression: ही देखील असू शकतात नैराश्याची लक्षणं, घरगुती उपाय ठरतील उपयुक्त

How to deal with Depression: आजच्या जीवनशैलीत मानसिक तणाव ही एक सामान्य गोष्ट असली तरीही याचे पुढे जाऊन वाईट परिणाम होऊ शकतात, याचच रुपांतर नंतर नैराश्यामध्ये होत. सामान्य तणाव देखील कालांतराने गंभीर रुप धारण करू शकतो.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल: नैराश्याचं (Depression) मुख्य कारण हे मानसिक ताणतणाव (mental stress) हे आहे. आजच्या जीवनशैलीत मानसिक तणाव ही एक सामान्य गोष्ट असली तरीही याचे पुढे जाऊण वाईट परिणाम होऊ शकतात, व याचच रुपांतर नंतर डिप्रेशन मध्ये होत. सामान्य तणाव देखील कालांतराने गंभीर रुप धारण करू शकतो त्यामुळे वेळीच या तणावाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर डिप्रेशनच्या सुरुवातीचीं नक्की काय लक्षणं असतात, जाणून घेऊयात.

डिप्रेशनची अनेक कारणं असू शकतात. जसं की एकटेपणा, आयुष्यातून महत्त्वाची व्यक्ती निघून जाणे, नोकरी गमावणे, आर्थिक तणाव, एखादा आजार किंवा आयुष्यात अचानक झालेला बदल. कारण काहीही असू शकते.

नैराश्याची लक्षण जाणून घेणं गरजेचं आहे

डिप्रेशन मध्ये असलेली व्यक्ती शक्यतो एकटं राहणं पसंत करते, कुणाशाही बोलणं टाळते. आनंदी वातावरणातही ती व्यक्ती उदास दिसून येते. त्या व्यक्तीचं कोणत्याही कामात लक्ष लागत नाही, याशिवाय आत्मविश्वास देखील खालावलेला असतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिंता करणे, सतत झोपणे, सतत रागावणे, निर्णय क्षमता कमी असणे ही अशी काही नैराश्याची लक्षणं आहेत.

(हे वाचा - Coronavirus Symptoms: मला कोरोना होऊन तर गेला नाही ना? फक्त 5 लक्षणांवरून ओळखा)

नैराश्यापासून वाचण्यासाठी हे उपाय ठरतील फायद्याचे

डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीने एकटेपणापासून वाचलं पाहिजे. मित्र, नातेवाईक, कुटुंबीय यांच्याशी संवाद साधला पाहिजे. शॉपिंग तसेच पिकनिकचे प्लॅन्स करावेत, संगीत ऐकावे याशिवाय कोणत्या ना कोणत्या कामात स्वत:ला व्यस्त ठेवावे. दु:खद घटनांपासून स्वत:ला दूर ठेवावे. सकारात्मक रहावं तसेच योग, व्यायाम करावा. सकाळी आणि संध्याकाळी वॉक ला जावं. पुस्तके वाचावी तसेच धुम्रपान आणि नशा यांपासून दूर रहावे.

खाद्यशैलीतील हा बदल ही ठरेल उपयुक्त

जेवणात सकस तसेच पोषक तत्त्वांनी भरपूर असा आहार घ्यावा. ज्यूस, सूप, दूध आणि दही तसेच हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा. बीट हे अतिशय उत्तम पोषक तत्त्व असलेली फळभाजी आहे. त्याचे नियमीत सेवन नक्कीच उपयोगी ठरेल. ऑलिव्ह किंवा ऑलिव्ह ऑइलचं सेवन करावं. काजू पेस्ट दूधात मिसळून घ्यावी. दोन-तीन वेलची रोज खाव्यात. लिंबू, हळद आणि मध एकत्र करून घ्याव. एक चमचा ब्राह्मी, एक चमचा अश्वगंधा पावडर एकत्रित घ्यावी. शिळं अन्न खाऊ नये, जास्त मांसाहारी (नॉनवेज) आणि मसालेदार जेवण खाऊ नये, चहा आणि कॉफीचं  सेवन कमी करावं. या काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही नैराश्याशी नक्कीच सामना करू शकता.

Published by: News Digital
First published: April 16, 2021, 12:11 PM IST

ताज्या बातम्या