Home /News /heath /

रंगरूप, चवीप्रमाणे आरोग्यासाठीही उत्तम... फायदे जाणाल तर दररोज खाल हे फळ

रंगरूप, चवीप्रमाणे आरोग्यासाठीही उत्तम... फायदे जाणाल तर दररोज खाल हे फळ

फक्त रंग, आकार आणि चवीलाच ही स्ट्रॉबेरी उत्कृष्ट नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे. पण कशी खावी कधी खावी आणि किती खावी वाचा...

  थंडी सुरू होताच आपल्याला बाजारात लालबुंद स्ट्रॉबेरीज दिसू लागतात... स्ट्रॉबेरीजचा रंग आणि आकार आपल्याला आकर्षित करतो... अशी सुंदर दिसणारी Strawberry चवीलाही आंबट-गोड असते. त्यामुळे ज्याप्रमाणे उन्हाळ्यात आंबा त्याप्रमाणे थंडी स्ट्रॉबेरीजचा मोह काही आवरत नाही. फक्त रंग, आकार आणि चवीलाच ही स्ट्रॉबेरी उत्कृष्ट नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे. स्ट्रॉबेरीज खाण्याचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊयात.
  1. इतर फळांप्रमाणे स्ट्रॉबेरीमध्येही व्हिटॅमिन C असतं, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
  2. आर्थरायटिस फाऊंडेशनच्या मते, स्ट्रॉबेरीज खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते.
  3. स्ट्रॉबेरीजमुळे adiponectin आणि leptin या फॅट बर्निंग हार्मोनची निर्मिती वाढते. भूक, ब्लड शुगर कमी होते आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे वजन कमी होतं.
  4. स्ट्रॉबेरीजमध्ये फायबर भरपूर असतात ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि मलावरोधाची समस्या उद्भवत नाही.
  5. स्ट्रॉबेरीमधील वेगवेळी अँटीऑक्सिडंट केसगळती रोखतात. केसांना मॉईश्चराइझ करतात आणि केसातील कोंड्यापासून संरक्षण देतात.
  6. स्ट्रॉबेरीजमध्ये मॅलिक अॅसिड असतं, जो दात शुभ्र करणारा नैसर्गिक घटक आहे.
  7. स्ट्रॉबेरीमध्ये हृदयाला निरोगी ठेवणारे असे अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी होतो. रक्ताच्या गुठळ्या होत नाही, त्यामुळे स्ट्रोकचा धोका उद्भवत नाही.
  8. स्ट्रॉबेरीमध्ये आयोडिन, व्हिटॅमिन सी आणि फायटोकेमिकल्स असतात, ज्यामुळे nervous system चं कार्य चांगलं राहतं. मेंदूला योग्य रक्तपुरवठा होतो आणि मेंदूचं कार्य सुधारतं.
  9. स्ट्रॉबेरीमुळे हायपरपिग्मेंटेशन, अॅक्ने यांचं प्रमाण कमी होतं. शिवाय त्वचेवरील मृतपेशी (dead skin cells)देखील निघून जातात. फ्री रेडिकल्सपासून त्वचेचं संरक्षण होतं, परिणामी त्वचा तरुण दिसते.
  10. नियमित स्ट्रॉबेरी खाल्ल्याने कोरडे डोळे, डोळ्यांमधील नसांना हानी पोहोचणे, डोळ्यांमध्ये दोष अशा समस्या बळावत नाहीत.
  सोर्स - ऑर्गेनिक फॅक्ट टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
  अन्य बातम्या थंडीत ठणठणीत राहायचंय...मग फक्त चहात नव्हे, तर असंही वापरा आलं थंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाण्याचे 6 गुणकारी फायदे त्वचेच्या आजारावर सर्वोत्तम घरगुती उपाय! बहुगुणी कडुनिंबाचे 10 फायदे रोज गुळाचा एक खडा खाण्याचे 6 आरोग्यदायी फायदे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी रोज खायला हवीत 2 केळी
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Health, Lifestyle, Strawberry

  पुढील बातम्या