सावधान ! कोरोना रुग्णांना Steroids देणं घातक; भोगावे लागतील गंभीर परिणाम

सावधान ! कोरोना रुग्णांना Steroids देणं घातक; भोगावे लागतील गंभीर परिणाम

अमृतसरच्या एका हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना स्टेरॉईड (Steroids) दिल्याने कोरोना रुग्णांची तब्येत बिघडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे स्टेरॉइसारखं औषध देताना त्याचा डोस आणि आवश्यकता याचा विचार करायला हवा

  • Share this:

दिल्ली, 6 मे : कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Corona) भारतात सुरु आहे. मार्चमध्ये कोरोना पुन्हा वेगाने वाढायला सुरुवात झाली. कोरोना (Corona) आटाक्यात आण्यासाठी काही ठिकाणी संचारबंदी (Curfew), लॉकडाऊन (lockdown) असे उपाय करण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Second Wave of Corona) देशात वाईट परिस्थीती निर्माण केली आहे. दररोज 3 लाखापेक्षा जास्त रूग्ण आढळत आहेत. त्यातच देशात ऑक्सिजनची कमतरता (Lack of oxygen) असल्याने आणि बेड उपलब्ध होत नसल्याने मृत्यूंचा आकडा वाढलेला आहे. स्मशानामध्येही रांग लावायची वेळ आलेली आहे.

अशात कोरोनावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झालेली आहे. तरीही ठरावी उपचार पद्धती सांगता येत नाही. कोरोना पेंशटला बरं करण्यासाठी वेगवेगळे उपचार करावे लागत आहेत. कोरोना ट्रीटमेंटच्या 4 स्टेज असल्याचं तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. ऑक्सिजन थेरेपी (Oxygen Therapy), स्टेरॉईड (Steroids), अँटीकोआगुलंट (Anticoagulant) आणि रेमडेसिवीर(Remedesivir). यातल्या काही पद्धतींचे दुष्परिणामही होतात. त्यातलीच एक आहे स्टरॉईड. अमृतसरच्या एका हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना स्टेरॉईड (Steroids) दिल्याने कोरोना रुग्णांची तब्बेत बिघडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे स्टेरॉईसारखं औषध देताना त्याचा डोस आणि आवश्यकता याचा विचार करायला हवा.

(बापरे! यावर्षी कोरोनामुळे तब्बल 126 डॉक्टरांचा मृत्यू)

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सोशल मीडिया अकाऊंट (Social media account)वर असे अनेक व्हीडिओ (Video) आपल्याला मिळतील ज्यामध्ये स्टेरॉईड दिल्याने कोरोना रुग्ण बरे होतात असा दावा केला जातो. मात्र, स्टेरॉईडचे (Steroids) घातक परिणामही शरीरावर होत असतात.डॉक्टरांच्या सल्ल्याविना अशी औषधं घेऊच नयेत.

(राज्याच्या अडचणीत वाढ; कर्नाटकहून येणारा ऑक्सिजन पुरवठा केंद्राने थांबवला)

अमृतसरच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना रुग्णांना स्टेरॉईड दिलं गेलं. त्याच संदर्भात या रुग्णालयातले एनास्थेशिया डिपार्टमेंटचे प्रमुख डॉक्टर. जे. पी. अत्री (Dr.J.P.Atri) यांनी कोरोना रुग्णाला स्टेरॉईड देऊ नये असं सांगितलं आहे. कोरोना रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल चांगली राहण्यासाठी त्याला कृत्रीम ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र जर, कोरोना पेशंटची ऑक्सिजन लेव्हल सतत खाली जात असेल तर, त्यांनाच स्टेरॉईड द्यावं असं डॉक्टर अत्री सांगतात. स्टेरॉईड देण्याचा वाईट परिणाम कोरोना रुग्णाच्या बीपी आणि शुगर लेव्हलवर होतो. स्टेरॉईडने फुप्फुसातील संक्रमण कमी होत असलं. तरी, त्या रुग्णाची शुगर लेव्हल आणि बीपी वाढल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

(कोरोनाचा प्रकोप वाढतोय; कधीपर्यंत मिळणार दिलासा? तज्ज्ञांनी दिलं उत्तर)

याच संदर्भात जालंधरच्या पंजाब इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (PIMS) चे कोरोना यूनिटचे प्रभारी डॉ. कुलबीर शर्मा (Dr. Kulbir Sharma) यांनी कोरोना रुग्णाना स्टेरॉईड देऊ नये असा सल्ला दिला आहे, त्यांच्या मते, कोरोना रुग्णाला स्टेरॉईड दिल्यास त्याच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो. त्यातच कोरोना रूग्णाला बीपी (Blood presser ) किंवा शुगर (Blood sugar) चा त्रास असेल तर, शुगर लेव्हल चारशेपेक्षा वर जाऊ शकते असं सांगितलं आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांना स्टेरॉईडचा फायदा झाला आहे.

(VIDEO : कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची दारूपार्टी; बायकोने पाय खेचत काढलं बाहेर)

रुग्ण बरेही होत आहेत. तर, काही प्रकरणांमध्ये रुग्णांचा बीपी वाढणे, शुगर वाढणे हे परिणाम दिसले आहेत. कोरोना रुग्णाना स्टेरॉईड आणि ऍन्डीबायोटीक परिणामकराक आहेत. सुरवातीलाच्या काळात डेक्सामेथासोन सारख्या स्टेरॉईडच्या वापरावार WHO ने ही विश्वास दर्शवला होता मात्र, आता काहीच केसेमध्ये स्टेरॉईड वापराचा सल्ला दिला जात आहे.

Published by: News18 Desk
First published: May 6, 2021, 5:23 PM IST

ताज्या बातम्या