आता थेट हवेतून तयार होईल अन्न, जमीन आणि पाणी दोन्हीची गरज नाही

आता थेट हवेतून तयार होईल अन्न, जमीन आणि पाणी दोन्हीची गरज नाही

आम्ही काय हवा खाऊन जगू का? असा प्रश्न आपण कधीकधी विचारतो. पण आता मात्र वैज्ञानिकांनी खरंच हे सिद्ध करून दाखवलं आहे. फिनलंडची एक कंपनी हवेच्या माध्यमातून सोलर फूड बनवणार आहे.

  • Share this:

मुंबई, ३० जुलै : विज्ञानाच्या चमत्कारावर विश्वास ठेवणं कधीकधी कठीण जातं. हा असाच एक शोध आहे. थेट हवेतून अन्न मिळेल यावर तुम्ही कधी विश्वास ठेवू शकाल का ? पण वैज्ञानिक प्रयोगांमध्ये आता हे सिद्ध झालं आहे.

शेती करायची तर त्यासाठी जमीन, पाणी आणि योग्य हंगाम हवा. पण हे अन्न बनवताना मात्र अशा कोणत्याच गोष्टींची गरज नाही.हे अन्न उपलब्ध झाल्यानंतर, आम्ही काय हवा खाऊन जगू का? असा प्रश्न कुणीच विचारू शकणार नाही.हवेतून

हवेतून सोलीन पावडर

फिनलंडची एक कंपनी हवेच्या माध्यमातून सोलर फूड बनवणार आहे. या अन्नाच्या निर्मितीसाठी कार्बन डाइऑक्साइड, पाणी आणि विजेची गरज असते. हवा, पाणी आणि विजेचा वापर करून सोलीन नावाची प्रोटीन पावडर बनवली जाणार आहे.

ही सोलीन प्रोटीन पावडर गव्हाच्या पिठासारखी असेल. या अन्नात 50 टक्के प्रोटीन, 5 ते 10 टक्के फॅट्स आणि 20 ते 25 टक्के कर्बजन्य पदार्थ असतील. ही पावडर वापरून अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतील.

अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. पहिल्यांदा मार्केटमध्ये हे प्रोटीन शेक आणि योगर्टच्या स्वरूपात आणलं जाईल.

सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या या बंगाली खासदाराच्या लग्नाची गोष्ट

हवामान बदलाच्या या काळात शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहणं आपल्याला शक्य नाही. त्यामुळे अशा पर्यायांचा संशोधक विचार करत आहेत.

सोलीन फूड बनवण्यासाठी हवेतून कार्बन डायऑक्साईड घेतलं जाईल. त्यानंतर यामध्ये पाणी, व्हिटॅमिन आणि पोषक घटक मिसळले जातील.

फिनलंडच्या कंपनीचा दावा आहे की अशा अन्नामुळे शेतीच्या मर्यादांवर मात करता येईल. सोलीन फूड ही नासाची ओरिजिनल आयडिया आहे. असं अन्न अंतराळवीरांसाठी तर खूपच उपयोगी ठरणार आहे.

फिनलंडची कंपनी हे सोलीन फूड 2021 मध्ये मार्केटमध्ये आणू शकते. याला कसा प्रतिसाद मिळतो ते मात्र पाहावं लागेल.

================================================================================================

तिहेरी तलाकच्या जोखडातून मुस्लीम महिलांची सुटका, हाच तो क्षण पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 08:02 PM IST

ताज्या बातम्या