उन्हाळ्याच्या त्रासाने बेजार? हे 3 घरगुती उपाय करून पाहा, ऋजुता दिवेकर यांनी दिल्यात खास टिप्स

उन्हाळ्याच्या त्रासाने बेजार? हे 3 घरगुती उपाय करून पाहा, ऋजुता दिवेकर यांनी दिल्यात खास टिप्स

Nutrienist Rujuta Divekar's tips for Summer- तुम्ही उन्हाळ्यात स्किन प्रॉब्लेमला कंटाळला असाल, तर सेलिब्रेटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिलेल्या सोप्या 3 टिप्स नक्की फॉलो करा.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल : कडक उन्हात जिथे सूर्य आग ओकत असतो तिथेच, अंगाची लाहिलाही (Sunburn) होत असते. घरात बसून काम करणंही मुश्कील होतं, इतक्या घामाच्या धारा लागतात. उन्हाळ्यात अनेक स्किन प्रॉब्लेम (Skin Problem) आणि आरोग्याशी संबंधित काही समस्या (Health Issue) सुरू होतात. उन्हामुळे अन्नपचन योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे अॅसिडीटी, डायरियासारखे पोटाचे विकार होतच असतात. त्यातच पिंपल्स, पुरळ, घोमोळ्या, गळू असे त्वचेशी निगडीत त्रासही होत असतात.

उन्हाळात होणाऱ्या याच समस्यांवर प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी काही टिप्स दिल्या आहेत. ऋजुता या सेलिब्रेटी डायटेशियन (Celebrity Dietitian Rujuta Divekar)तर आहेतच. त्याबरोबर त्या सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांसाठीही हेल्थ टिप्स देत असतात. पाहू या उन्हाळ्यातल्या प्रॉब्लेम्ससाठी हेल्दी, घरगुती टीप्स (Home Remedies)

उन्हाळ्यात स्कीन प्रॉब्लेमला कंटाळलात ?

बडिशेप सरबत

उष्म्यापासून मुक्तता मिळण्यासाठी तसेच बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त सारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी ऋजुता यांनी बडीशेपेचं सरबत पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते हे सरबत पिण्याने पचन सुधारतं. बद्धकोष्ठता,अपचन यासारख्या पोटाच्या समस्येवर बडिशेपचं सरबत एक उपाय आहे. हे सरबत मुड फ्रेश करतं. बडीशेपचे  सरबत प्यायल्याने तोंडाच्या दुर्गंधीतून मुक्तता मिळते. शरीराही डिटॉक्स करते.

वाळ्याचं पाणी

न्युट्रीशनिस्ट (Nutritionist)  ऋजुता म्हणतात की उन्हाळ्यामध्ये खस किंवा वाळा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी खसची काही मुळं पाण्याच्या बाटलीत घाला. तीन तासांनंतर बाटलीतून वाळा काढून टाका आणि पाणी प्या. एकदा वापरलेला वाळा उन्हात वाळवा आणि पुन्हा वापरा. हे पाणी तीन दिवस पिता येतं. हे सुगंधी पाणी प्यायल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं आणि हलकेपणा देखील जाणवेल. ऋजूता म्हणतात की, दुसऱ्यांदा खस वापरल्यानंतर हवं असल्यास तो बॉडी स्क्रबर म्हणून वापरता येतो. खस स्क्रबर म्हणुन वापरल्याने उन्हाळ्यात शरीरावर पुरळ उठत असेल तर फायदा होतो. रुजुताच्यामते उन्हाळ्यात कापडी पडद्याऐवजी खसचा पडदा वापरला तर घरात थंडावा राहतो.

चंदनाच्या पाण्याने आंघोळ

उन्हाळ्यात चंदनाने आंघोळ केल्यास शरीराला बरेच फायदे होतात. यासाठी चंदनाचं लाकूड उगाळून त्याचा लेप बनवा. हा लेप किंवा पेस्ट दोन मग पाण्यात मिसळा, आंघोळीच्या शेवटी या पाण्याने स्नान करा. यामुळे ताजेतवाने तर वाटेलच पण, त्वचेसंबंधी समस्याही दूर होतात. चंदनाच्या सुवासाने रिफ्रेश वाटते.

Published by: News18 Desk
First published: April 22, 2021, 4:14 PM IST

ताज्या बातम्या